Homeताज्या बातम्याविना परवानगी पवनचक्की रस्ता खोदकाम प्रकरणाची अपर तहसीलदारांकडून चौकशी; काम थांबवून कारवाईची...

विना परवानगी पवनचक्की रस्ता खोदकाम प्रकरणाची अपर तहसीलदारांकडून चौकशी; काम थांबवून कारवाईची रुग्ण हक्क संघर्ष समिती कडून मागणी

विना परवानगी पवनचक्की रस्ता खोदकाम प्रकरणाची अपर तहसीलदारांकडून चौकशी; काम थांबवून कारवाईची रुग्ण हक्क संघर्ष समिती कडून मागणी

लातूर | औसा प्रतिनिधी
औसा तालुक्यातील मौजे तळणी येथे पवनचक्कीकडे जाण्यासाठी विना परवानगी रस्ता तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारीची अपर तहसीलदार, किल्लारी यांना रुग्ण हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड विजयभाऊ पंडित फोनवर कल्पना दिली त्यांची गंभीर दखल घेतली असून संबंधित महसूल अधिकाऱ्यांना तात्काळ स्थळपाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
अपर तहसीलदार, किल्लारी (जमा-१ विभाग) यांनी 17 जुलै 2026 रोजी काढलेल्या पत्रानुसार, मंडळ अधिकारी, किल्लारी तसेच ग्राम महसूल अधिकारी, तळणी यांना या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
संबंधित विभागाला कारवाई साठी श्री. दिक्षित अशोक दिंगबर (रा. तळणी) यांनी 15 जुलै 2026 रोजी आणि सौ. सुनीता श्रीनिवास महामुनी (रा. तळणी) यांनी 16 जुलै 2026 रोजी सादर केलेल्या अर्जांच्या अनुषंगाने तक्रार करण्यात आली.
तक्रारीनुसार, मौजे तळणी येथील सर्व्हे क्रमांक 100 व 138/3/1 मधून पवनचक्कीकडे जाण्यासाठी कोणतीही शासकीय परवानगी न घेता दोन ते तीन जेसीबी आणि सुमारे दहा ट्रॅक्टरच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात उत्खनन व रस्ता तयार करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर अपर तहसीलदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना उत्खनन व माती वाहतुकीसाठी आवश्यक परवानगी घेण्यात आली आहे का, याची तातडीने पडताळणी करण्याचे निर्देश दिले होते. परवानगी घेतलेली नसल्यास संबंधित काम तात्काळ बंद करून प्रत्यक्ष स्थळपाहणी करावी तसेच झालेल्या कामाचा सविस्तर पंचनामा व अहवाल विनाविलंब कार्यालयात सादर करावा, असे आदेश पत्रात नमूद करण्यात आले आहेत.
या प्रकरणामुळे तळणी परिसरात चर्चेला उधाण आले असून तब्बल आकरा दिवसांनी संबंधित तलाठी यांनी केला पंचनामा चौकशीनंतर विनापरवानगी प्रत्यक्ष ८ फुटाचा रस्ता कोरुन २५ ते ३० फुटाचा केला आहे ३० ट्रिप ट्रॅक्टरच्या सहाय्याने मुरुम हि टाकण्यात आले व आजुबाजूच्या शेतकर्यांचे बांधही कुठलीच परवानगी घेतली नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. संपूर्ण तालुक्यात अनेक शेतरस्ते याच पद्धतीने केली नसतील का आत्ता पुढे काय कारवाई होईल याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. प्रत्यक्ष गुन्हा दाखल होतो आणि संबंधितांवर कोणती प्रशासकीय कारवाई होते, याकडे रुग्ण हक्क संघर्ष समिती महाराष्ट्र लातूर चे लक्ष असुन योग्य कारवाई नाही झाली तर आंदोलनाचा इशारा दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विश्रामबाग पोलीस स्टेशनची मोठी कारवाई: १० लाख रुपये किंमतीच्या १४ मोटार सायकली हस्तगत

​पुणे शहरातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने विधीसंघर्षीत बालक आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पुणे व इतर ठिकाणांहून चोरी केलेल्या एकूण १० लाख...

आंबेगाव पोलीस स्टेशनची धडक कारवाई: गोळीबार करणाऱ्या रेकॉर्डवरील पाच गुन्हेगार जेरबंद; तीन गावठी पिस्टल...

पुणे शहरात आंबेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या वादातून फिर्यादीच्या मुलावर गोळीबार करून पसार झालेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि आंबेगाव...

पुणे महानगरपालिका सफाई कर्मचारी कारवाईत भेदभाव प्रकरण: युवक काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

​पुणे: पुणे महानगरपालिकेच्या परिमंडळ क्रमांक ५ चे उपायुक्त माधव जगताप यांच्या मनमानी आणि भेदभावयुक्त कारभाराविरुद्ध युवक काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिस्तीच्या नावाखाली गरीब...

मुंढवा पोलिसांची धडक कारवाई: १,३०,०००/- रुपये किमतीच्या दोन चोरीच्या रिक्षा जप्त; एक आरोपी अटकेत

​पुणे: मुंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवत चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला आहे. मुंढवा पोलीस...

१०० पेक्षा अधिक वाहन चोरीचे गुन्हे करणारा २ वर्षांपासून पाहिजे असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद

​पुणे: पुणे शहरात गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबतच्या उपाययोजना व गुन्ह्यातील पाहिजे व फरार आरोपींचा गुन्हे शाखा युनिट २ मधील पोलीस अधिकारी व अंमलदार विशेष मोहिमे...

error: Content is protected !!