पुणे, दि. २० :
पुणे महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत येत्या गुरुवारी, दि. २२ जानेवारी २०२६ रोजी काढण्यात येणार आहे. नगरविकास विभागाच्या अधिकृत पत्रानुसार, ही आरक्षण सोडत नगरविकास राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय, मुंबई येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत राज्यातील सर्व संबंधित महानगरपालिकांसाठी महापौर पदाचे आरक्षण निश्चित केले जाणार असून, त्यानंतर अधिकृतरीत्या आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे. महापौर पदाचे आरक्षण जाहीर होणार असल्याने राज्यातील महापालिका राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे.
विशेषतः पुणे, मुंबई, नागपूर, पिंपरी-चिंचवड आणि ठाणे या प्रमुख महानगरपालिकांतील महापौर पदाच्या आरक्षणाकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. आरक्षणाच्या आधारे पुढील राजकीय समीकरणे ठरणार असल्याने इच्छुक उमेदवार व पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे.
पुणे महानगरपालिकेत यापूर्वी २०१७ साली महापौर पदाचे आरक्षण खुल्या गटासाठी होते. त्यामुळे यंदा कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर होणार, याबाबत शहरातील राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
महापौर पदाचे आरक्षण निश्चित झाल्यानंतर संबंधित महापालिकांतील पुढील निवडणूक रणनीती, आघाड्या व राजकीय डावपेच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या या सोडतीकडे राज्यभरातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























