Homeताज्या बातम्यापुणे मनपा कर्मचारी उपाशी, भाजप नगरसेवक तुपाशी …. भाजप कार्यालयास आणि व्यायामशाळेस...

पुणे मनपा कर्मचारी उपाशी, भाजप नगरसेवक तुपाशी …. भाजप कार्यालयास आणि व्यायामशाळेस भाडे सवलत पण पुणे मनपा कर्मचाऱ्यांसाठी आयुक्तांना हे का नाही उमजत…

पुणे मनपा कर्मचारी उपाशी, भाजप नगरसेवक तुपाशी ….
भाजप कार्यालयास आणि व्यायामशाळेस भाडे सवलत पण पुणे मनपा कर्मचाऱ्यांसाठी आयुक्तांना हे का नाही उमजत…

पुणे:- प्रभाग क्रमांक २९ मधे भाजपचे माजी नगरसेवक, शहराध्यक्ष भाजप मा धीरज घाटे यांच्या ताब्यात असलेल्या पुणे मनपा च्या मालकीच्या अंदाजे ५०० प्रति चौरस फूट कार्यालयास आणि ३००० प्रति चौरस फूट व्यायामशाळेस आयुक्तांनी दिलेल्या मासिक भाड्यातील ७० टक्के सुट याच न्यायाप्रमाणे महानगरपालिकेने सेवकांच्या घरभाड्यात कपात करण्या संदर्भात काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज पुणे महानगरपालिका आयुक्त श्री राजेंद्र भोसले यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात पुणे महानगरपालिके च्या सेवेत काम करणारे चतुर्थ श्रेणीमधील स्वच्छता कर्मचारी, विविध विभागातील कर्मचारी यांच्यासाठी पुणे महानगर पालिकेच्या वतीने राहण्यासाठी टाऊन प्लानिंग नुसार सदाशिव पेठ येथे सानेगुरुजी नगर,आंबील ओढा कॉलनी बांधण्यात आली, पण तेथे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून (HRA) एच आर ए च्या माध्यमातून १२ ते १५ हजार रुपये घरभाडे कापले जाते, पण त्यामानाने त्यांना पुणे मनपा कडून अपुऱ्या सुख सुविधा दिल्या जातात, आजही कर्मचाऱ्यांच्या मुलांना खेळण्यासाठी मैदाने नाहीत, अस्वच्छतेने कॉलनी भरून गेली आहे, दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर पाणी पोहचत नाही, सार्वजनिक शौचालय ची अवस्था वाईट झाली आहे, सुरक्षा नाही, अशी व्यवस्था असताना अपूर्या सुविधा असताना ही पुणे मनपा कर्मचारी तिथे राहत आहेत .
पुणे महानगर पालिकेच्या वतीने सानेगुरुजी नगर आंबील ओढा सदाशिव पेठ पुणे येथील बांधण्यात आलेली व्यायामशाळा आणि भाजप नगरसेवक यांच्या कार्यालयाची मालमत्ता विभागाने काढलेली किंमत ३ कोटीच्या दरम्यान आहे, पुणे मनपा क्रीडा विभागाने कै भानुदास गेजगे व्यायामशाळेचे तसेच स्थानिक भाजप नगरसेवकाच्या कार्यालयाचे भाडे पुणे मनपाच्या नियमानुसार ५२०००/- ₹ होत असताना फक्त मनपा कर्मचाऱ्यांच्या सेवकांच्या मुलांसाठी ही व्यायामशाळा आहे असे दाखवून पुणे मनपा आयुक्तांनी ते भाडे २०,००० केले आहे.
त्यामुळे तोच नियम सेवकांना लागू करावा आणि घरभाड्यात ७०% कपात करावी. तसेच आज गेली ५० वर्षाहून अधिक काळ इथे अनेक सेवकांची कुटुंब वास्तव्यास आहेत, २०११ च्या आधीच्या वास्तव्याचा पुरावा दिल्यास झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना त्यांचे हक्काचे घर शासनाकडून दिले जाते तर मग ह्या सेवकांना त्यांची राहती घरे मालकी हक्काची करून द्यायची तजबीज व्हावी. त्यांना त्यांचे राहते घर मालकी हक्काचे करण्यास उपाययोजना करावी आणि त्यांचे जागेवरच पुनर्वसन करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी बोलताना युवक काँग्रेस चे सागर धाडवे म्हणाले की पुणे आयुक्त यांनी लाडका नगरसेवक योजना राबविण्यापेक्षा लाडके पुणे महापालिका स्वच्छता सेवक योजना राबवून त्यांना न्याय द्यावा, भारतीय संविधानातील कलम १४ नुसार कायद्यापुढे सर्व समान या महत्वपूर्ण सिद्धांतानुसार योग्य न्याय द्यावा, वेगवेगळा न्याय देऊन सामाजिक दरी निर्माण करू नये.

शिवसेना प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत म्हणाले की भाडे कमी करण्याचा आयुक्तांचा नियम जो भाजप नगरसेवकाला लागू केला आहे तो त्याच टी पी स्किम मधल्या सानेगुरुजी नगर मधील सेवकांना लागू करावा आणि सर्वांना समान न्याय मिळावा, तीन कोटीची मालमत्ता खिरापत वाटल्यासारखी आयुक्तांनी वाटप केले आहे व्यायामशाळेच्या भाड्यातच नगरसेवकाचे कार्यालय बसविण्याचा प्रकार पुणे मनपा क्रीडा विभागाने आणि विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाने केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी ‘लहुजी शासन ग्रुप’ आक्रमक; समाज कल्याण आयुक्तांना साकडे

पुणे: अनुसूचित जातींमधील (SC) आरक्षणाचे उपवर्गीकरण लवकरात लवकर लागू करावे, या मागणीसाठी 'लहुजी शासन ग्रुप'च्या वतीने आज समाज कल्याण आयुक्तांना निवेदनाद्वारे साकडे घालण्यात आले. मातंग...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई: चतुःश्रृंगी परिसरातून १९.५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एकाला अटक

पुणे: पुणे शहर पोलीस दलाच्या चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनने अवैध आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई केली आहे. गोखलेनगर परिसरातून तब्बल १९,५१,१५०/- रुपये किमतीचा...

बाणेर पोलिसांची मोठी कारवाई: क्रेनमधील बॅटरी चोरणाऱ्या टोळीला ५ तासांत अटक; ५.६० लाखांचा मुद्देमाल...

​पुणे: बाणेर परिसरात उभ्या असलेल्या क्रेनमधून महागड्या बॅटऱ्यांची चोरी करणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना बाणेर पोलिसांनी अवघ्या ५ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत चोरीला...

लोणीकंद पोलिसांची मोठी कारवाई; ३५ लाखांच्या ‘एमडी’ ड्रग्जसह ६ आरोपींना बेड्या

पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवली जात असताना, लोणीकंद पोलिसांनी गेल्या आठवड्यात धडाकेबाज कामगिरी केली आहे. अमली...

महाराष्ट्रात 1 मार्चपासून वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या 95 रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे बातम्या

पुणे : राज्यभरात तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने महाराष्ट्रात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आरोग्य विभागाने 1 मार्च ते 29 एप्रिल या कालावधीत उष्माघाताची...

error: Content is protected !!