Homeक्राईम❝कर्तव्यात कसूर करणाऱ्या बीट अंमलदारांवर निलंबनाची मागणी; अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा❞

❝कर्तव्यात कसूर करणाऱ्या बीट अंमलदारांवर निलंबनाची मागणी; अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा❞

वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष गणेश पवार यांची तहसीलदार कार्यालयात निवेदनाद्वारे मागणीराहुरी (तालुका प्रतिनिधी) –
राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील बीट अंमलदार बाबासाहेब भागा शेळके व प्रवीण अशोक बागुल यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करावी, अन्यथा येत्या आठ दिवसांत पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र यांच्या दालनासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राहुरी तालुका उपाध्यक्ष गणेश पवार यांनी दिला आहे.

तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पोलिसांनी करायचं काम राहुरी फॅक्टरीतील स्थानिक महिलांनी आणि तरुणांनी करून दाखवलं असून, पोलिस कर्मचाऱ्यांचा नाकर्तेपणा यानिमित्ताने उघड झाला आहे. या बीटमध्ये अवैध दारू, मटका आणि जुगार यासारख्या गुन्हेगारी प्रकारांचा धुमाकूळ सुरु असून, संबंधित अंमलदारांचे या अवैध धंदेवाल्यांशी आर्थिक हितसंबंध असल्याचे आरोप त्यांनी केले.

निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, अलीकडेच दोन पोलिस कर्मचारी राहुरी फॅक्टरी येथे छापा टाकण्यासाठी गेले असता, खबऱ्यांमार्फत अवैध दारू विक्रेत्यांना माहिती देऊन सावध करण्यात आले. छाप्याच्या नावाखाली पोलिसांनी केवळ नाटक केले आणि महिलांची फसवणूक केली. संतप्त महिलांनी नंतर स्वतःच अवैध दारू विक्रेत्यांवर छापा टाकून पोलिसांची नाकामी उघड केली.

या कारवाईचे छायाचित्रण करत असताना पत्रकार जालिंदर आल्हाट यांना अंमलदार बाबासाहेब शेळके यांनी धमकावून मोबाईल हिसकावून घेतल्याची तक्रारही निवेदनात नमूद करण्यात आली आहे.

यासह, संबंधित अंमलदारांचे व अवैध धंदेवाल्यांचे कॉल डिटेल्स तपासून त्यांच्यावर कठोर शिस्तभंग कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच प्रवीण बागुल यांचे पूर्व इतिहास व गुन्हेगारी व्यक्तींशी संबंध असल्यामुळे निवेदनकर्त्याच्या जीवाला धोका असल्याची भीतीही व्यक्त करण्यात आली.

या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करत न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही गणेश पवार यांनी दिला.

📞 संपर्क:
सहसंपादक – शिवाजी दवणे – 9730170965
📰 क्राईम महाराष्ट्र न्यूज

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हैदराबाद मॉडेलवर अवलंबून राहण्यासाठी पीएमसीचे ओव्हरहेड केबल्सचे धोरण. पुणे बातम्या

पुणे: शहरातील गोंधळलेल्या केबल नेटवर्कचे नियमन करण्यासाठी नागरी प्रशासनाने मंगळवारी मानक कार्यप्रणाली (SOP) तयार करण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की नागरी संस्थेने हैदराबादचे मॉडेल...

नळांमधून गढूळ, दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याने जनवादी जनता वसाहतच्या रहिवाशांचा निषेध, प्रदूषण दूर करण्यासाठी...

पुणे: जनवादी जनता वसाहत आणि परिसरात संताप आणि चिंतेचे वातावरण पसरले असून, गेल्या अनेक दिवसांपासून गढूळ, विरंगुळ्याचे पाणी येत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली असून,...

निरोप सभारंभात प्राचार्य सौ. शाहेदा कश्मीरी मॅडम यांना भावपूर्ण निरोप पुणे (वानवडी) : दि....

पुणे (वानवडी) : दि. 21 एप्रिल 2026 रोजी वानवडी बाजार, पुणे-40 येथील महादजी शिंदे हायस्कूलमध्ये प्राचार्य सौ. शाहेदा कश्मीरी मॅडम यांचा सप्रेम निरोप समारंभ...

कार खांबावर आदळली, चाकण वीज पुरवठा ठप्प | पुणे बातम्या

पुणे : चाकण एमआयडीसी परिसरात मंगळवारी सायंकाळी ५ वाजता सबस्टेशनच्या काही खांबांवर कारने धडक दिल्याने काही भागांचा वीजपुरवठा खंडित झाला. दुरुस्तीचे काम...

भाजी विक्रेता मॅच शोधण्यासाठी, आईला आनंद देण्यासाठी पोलिसांच्या नोकरीची कथा तयार करतो. पुणे बातम्या

पुणे: पोलिस हवालदाराची नोकरी, खाकीतील फोटो आणि सेलफोन मेसेजिंग ॲप्लिकेशनवर यापैकी एक चित्र प्रदर्शित करणारे चित्र असे पोस्टरमध्ये टोम-टोमिंग करण्यात आले आहे. नर्हे येथील...

error: Content is protected !!