Homeताज्या बातम्यायेवलेवाडी परिसरात बेकायदेशीर गौणखनिज उत्खनन – नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका

येवलेवाडी परिसरात बेकायदेशीर गौणखनिज उत्खनन – नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका

येवलेवाडी परिसरात बेकायदेशीर गौणखनिज उत्खनन – नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका

पुणे :
येवलेवाडी (हवेली तालुका, पुणे) परिसरात डोंगरकपारीवर गौणखनिज (गोटा/दगड/मुरुम) चे मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर उत्खनन सुरू असल्याचे समोर आले आहे.

दिनांक 05 सप्टेंबर 2025 रोजी घेतलेल्या छायाचित्रांमधून दिसते की, JCB/पोकलँड मशीनद्वारे डोंगर फोडून दगड व मुरुम काढले जात आहेत. यामुळे संपूर्ण परिसरात गंभीर पर्यावरणीय व भू-रचना धोक्यात आली आहे.
प्रमाणावर बेकायदेशीर गौणखनिज उत्खनन सुरू आहे.

JCB आणि पोकलँड मशिनने डोंगर फोडून दगड व मुरुम काढले जात आहेत. या ठिकाणी परवानगी नसताना सुरू असलेले उत्खनन नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण करत आहे.

डोंगराच्या पायथ्याशी घरे असून, कोणत्याही क्षणी भूस्खलन होऊन मोठा अपघात घडू शकतो. नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या तरीही प्रशासन मात्र डोळेझाक करत असल्याचा आरोप आहे.

स्थानिक नागरिकांची ठाम मागणी आहे – हे उत्खनन तातडीने थांबवून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी.

पाहा… प्रशासन काय भूमिका घेते!”

गंभीर मुद्दे

1. हे उत्खनन शासनाची परवानगी न घेता, नियमांचा भंग करून सुरू आहे.

2. या ठिकाणी कोणतेही सुरक्षा उपाय, बंधारे वा परवाना बोर्ड लावलेले नाहीत.

3. डोंगरकपारीखालीच निवासी घरे असून, सततच्या उत्खननामुळे भूस्खलन व अपघाताचा गंभीर धोका नागरिकांना निर्माण झाला आहे.

4. महाराष्ट्र गौणखनिज उत्खनन नियमावली, पर्यावरण संरक्षण कायदा तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाचा सरळसरळ भंग होत आहे.

5. प्रशासन व पोलीस यंत्रणा याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

नागरिकांची मागणी

तातडीने प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन बेकायदेशीर उत्खनन थांबवावे.

संबंधित JCB/पोकलँड मशीन जप्त करून, गुन्हे दाखल करावेत.

जबाबदारांवर फौजदारी कारवाई करून पर्यावरणीय नुकसानभरपाई वसूल करावी.

भविष्यात अशा प्रकारचे उत्खनन रोखण्यासाठी कडक नियंत्रण यंत्रणा उभारावी.

” नागरिक सतत तक्रारी करत आहोत. तरीही प्रशासनाचे डोळे झाक करून हे उत्खनन सुरू आहे. एखादा मोठा अपघात घडल्यावर प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल स्थानिक रहिवाशांनी उपस्थित केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पीएमसीच्या १३ प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद भाजपकडे; राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे....

पुणे: जानेवारी महिन्यात झालेल्या पीएमसी निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून भाजपने 15 पैकी 13 प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद मिळवून नागरी प्रशासनावरील आपले नियंत्रण आणखी...

पीसीएमसी मेट्रो स्थानकात फीडर बस सेवा सुरू; प्रवाशांना कामकाजात सातत्य हवे. पुणे बातम्या

पुणे: महा मेट्रो आणि PMPML ने PCMC मेट्रो स्टेशनपासून अनेक मार्गांवर फीडर बस सेवा सुरू केली आहे, ज्यामुळे शेवटच्या मैलाची कनेक्टिव्हिटी सुधारली आहे, आतापर्यंत...

हैदराबाद मॉडेलवर अवलंबून राहण्यासाठी पीएमसीचे ओव्हरहेड केबल्सचे धोरण. पुणे बातम्या

पुणे: शहरातील गोंधळलेल्या केबल नेटवर्कचे नियमन करण्यासाठी नागरी प्रशासनाने मंगळवारी मानक कार्यप्रणाली (SOP) तयार करण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की नागरी संस्थेने हैदराबादचे मॉडेल...

नळांमधून गढूळ, दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याने जनवादी जनता वसाहतच्या रहिवाशांचा निषेध, प्रदूषण दूर करण्यासाठी...

पुणे: जनवादी जनता वसाहत आणि परिसरात संताप आणि चिंतेचे वातावरण पसरले असून, गेल्या अनेक दिवसांपासून गढूळ, विरंगुळ्याचे पाणी येत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली असून,...

निरोप सभारंभात प्राचार्य सौ. शाहेदा कश्मीरी मॅडम यांना भावपूर्ण निरोप पुणे (वानवडी) : दि....

पुणे (वानवडी) : दि. 21 एप्रिल 2026 रोजी वानवडी बाजार, पुणे-40 येथील महादजी शिंदे हायस्कूलमध्ये प्राचार्य सौ. शाहेदा कश्मीरी मॅडम यांचा सप्रेम निरोप समारंभ...

error: Content is protected !!