Homeताज्या बातम्याशेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्या – क्रांतीसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्या – क्रांतीसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्या – क्रांतीसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज सहसंपादक शिवाजी दवणे 9730170965.

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कपाशी, सोयाबीन, मका, घास यांसारख्या प्रमुख पिकांचे हजारो हेक्टरवर नुकसान झाले असून अनेक शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे.

या पार्श्वभूमीवर क्रांतीसेना राज्य संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-निवेदन पाठवून राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई बरोबरच कर्जमाफी जाहीर करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, “अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी कष्टाने उभे केलेले पीक वाहून गेले असून काही भागांत पिके पूर्णतः नष्ट झाली आहेत. शेतकऱ्यांचे आर्थिक गणित विस्कळीत झाले असून त्यांच्या उपजीविकेवर घाला बसला आहे. शासनाने वेळेत मदत केली नाही तर शेतकरी बांधव हताश व निराश होतील.”

सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आतापर्यंतची मदत तुटपुंजी असल्याने, खरी गरज ही भरीव निधीची असल्याचा दावा केला. “मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी देवदूत ठरावे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी तातडीने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जाहीर करण्याचे निर्णय घ्यावेत.” अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

अशा मागण्या क्रांतीसेनेचे राज्य संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील, शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भागचंद औताडे, रंगनाथ माने, मच्छिंद्र जगताप, अरूण थोरात, पश्चिम महाराष्ट्र संघटक जालिंदर शेडगे, जिल्हाध्यक्ष सुभाष दरेकर, अविनाश कुरुमकर, संदीप उंडे, बाबासाहेब चेडे, शब्बीर शेख, शेखर पवार, शाम कदम, बाळासाहेब भोर, संदीप डेबरे, साजन शेख, सोमनाथ वने, प्रतिक गाडे, हर्षद धोंडे आदींसह शेतकऱ्यांनी केल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे शहरात विक्रीसाठी आणलेले ४ गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक...

पुणे शहर आयुक्तालयात विनापरवाना शस्त्र बाळगणारे, रेकॉर्डवरील पाहिजे, फरारी व तडीपार आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याबाबत मा. वरिष्ठांनी स्पष्ट आदेश दिले होते. या...

होमिओपॅथी प्रॅक्टिशनर्सच्या नियमनाबाबत राज्य आज अंतिम निर्णय देऊ शकते | पुणे बातम्या

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सायंकाळी उशिरापर्यंत चालली ज्यात होमिओपॅथी चिकित्सक आणि ॲलोपॅथी डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी युक्तिवाद केला. त्यानंतर दोन्ही...

PMC 75 नागरी शाळांचे आदर्श शाळांमध्ये रूपांतर करण्यासाठी पायाभूत काम सुरू करणार आहे. पुणे...

नागरी संस्थेच्या कार्यक्षेत्रात सुमारे 180 महापालिका शाळा इमारती आहेत, ज्यात विलीन झालेल्या भागांचा समावेश आहे. पुणे : मॉडेल स्कूल (आदर्श शाला) प्रकल्पांतर्गत ओळखल्या...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात. पुणे बातम्या

शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करणार असल्याच्याही अटकळ सुरू आहेत. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी दिल्लीत...

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते. पुणे बातम्या

पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

error: Content is protected !!