Homeताज्या बातम्यापुण्यात निवडणुकीचे कारण पुढे करून प्रशासकीय कामकाज ठप्प “Election Duty”चा बहाणा; नागरिकांच्या...

पुण्यात निवडणुकीचे कारण पुढे करून प्रशासकीय कामकाज ठप्प “Election Duty”चा बहाणा; नागरिकांच्या तक्रारींकडे अधिकाऱ्यांचे सर्रास दुर्लक्ष

पुण्यात निवडणुकीचे कारण पुढे करून प्रशासकीय कामकाज ठप्प
“Election Duty”चा बहाणा; नागरिकांच्या तक्रारींकडे अधिकाऱ्यांचे सर्रास दुर्लक्ष

पुणे | प्रतिनिधी
पुणे शहरात निवडणुका जाहीर झाल्यापासून अनेक शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी “आम्हाला Election Duty आहे” असे कारण देत नागरिकांच्या तक्रारी, अर्ज व दैनंदिन प्रशासकीय कामे स्वीकारण्यास टाळाटाळ करत असल्याचा गंभीर प्रकार समोर येत आहे. यामुळे पाणीपुरवठा, स्वच्छता, बांधकाम, अतिक्रमण, आरोग्य तसेच माहिती अधिकारासारख्या अत्यावश्यक सेवा थेट बाधित झाल्या आहेत.
नागरिकांनी ई-मेल, WhatsApp, फोन तसेच ऑनलाइन पोर्टलद्वारे तक्रारी केल्यानंतरही अनेक ठिकाणी दखल घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. “Election Duty”चा सरसकट उल्लेख करून कार्यालयीन जबाबदारी झटकणे हे कायदेशीरदृष्ट्या चुकीचे असून निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केवळ निवडणूक प्रक्रियेशी थेट संबंधित कर्मचारीच त्या कामासाठी नियुक्त असतात. उर्वरित प्रशासकीय यंत्रणा व अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू ठेवणे बंधनकारक आहे.
कायदा जाणकारांच्या मते, अशा प्रकारे तक्रार नोंदवण्यास नकार देणे किंवा अर्जांची दखल न घेणे हे कर्तव्यच्युती व शिस्तभंगास पात्र ठरते. माहिती अधिकार अधिनियम 2005 तसेच लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत निवडणूक काळातही अर्ज स्वीकारणे व ठराविक कालमर्यादेत उत्तर देणे अनिवार्य आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक विभागांत नियमांना हरताळ फासला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
या प्रकारामुळे सामान्य पुणेकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून “निवडणुकीच्या नावाखाली प्रशासन सुट्टीवर गेले आहे का?” असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. नागरिक व पत्रकारांनी वरिष्ठ स्तरावर ई-मेलद्वारे तक्रारी पाठवून संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
जर वेळेत दखल व कारवाई झाली नाही, तर निवडणूक आयोग, विभागीय आयुक्त, लोकसेवा हक्क आयोग तसेच न्यायालयीन स्तरावर दाद मागण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आता प्रशासन या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन जबाबदारीने कामकाज सुरू करते का, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुरली अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्ह्यात सेवाकार्याचा जागर! रक्तदान, आरोग्यदान आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी...

मुरली अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्ह्यात सेवाकार्याचा जागर! रक्तदान, आरोग्यदान आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी अन्नधान्य मदत; भाजप वैद्यकीय आघाडीचा सक्रिय सहभाग वाघोली, प्रसाद सोनवणे,तालुका प्रतिनिधी,पुणे. : केंद्रीय...

औंधमध्ये संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा

औंधमध्ये संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा पुणे (औंध), दि. २६ (प्रतिनिधी : शशिकांत पाटोळे) : ७७ वा भारतीय संविधान दिन औंध येथे...

कोंढव्यातील वनक्षेत्रातील कथित बेकायदा वृक्षतोडीविरोधात आंदोलनाला रुग्ण हक्क संघर्ष समितीचा जाहीर पाठिंबा!

पुणे : कोंढवा परिसरातील वनक्षेत्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर वृक्षतोडीविरोधात छेडण्यात आलेल्या आंदोलनाला 'रुग्ण हक्क संघर्ष समिती'ने आपला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...

शिवाजीनगर कोर्टाबाहेरील मंदार किवळे हल्लाप्रकरण: ६ आरोपी ताब्यात; पोलिसांची धडक कारवाई

शिवाजीनगर कोर्टाबाहेरील मंदार किवळे हल्लाप्रकरण: ६ आरोपी ताब्यात; पोलिसांची धडक कारवाई पुणे; दि. २६ (शशिकांत पाटोळे) : पुण्यातील शिवाजीनगर न्यायालय परिसरात बुधवारी (२५ नोव्हेंबर...

पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं? ६ हल्लेखोरांनी अवघ्या ३० सेकंदात केले १५ वार!

पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं? ६ हल्लेखोरांनी अवघ्या ३० सेकंदात केले १५ वार! पुणे; दि. २५ (शशिकांत पाटोळे) : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टासमोर गोळीबार झाल्याची...

error: Content is protected !!