राहुरी फॅक्टरी बाह्य वळण रस्त्याला गती..!
प्रसादनगर ते गुंजाळ नाका शिव रस्त्याची संक्रांतीच्या मुहूर्तावर सर्कल पाहणी..!
राहुरी प्रतिनिधी गणेश भालके.8888942354
सहसंपादक शिवाजी दवणे 9730170965
देवळाली प्रवरा दि. १४ जानेवारी
प्रसादनगर मधील जड वाहतूक अन्यत्र वळविण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांनी राहुरीचे तहसीलदार यांना निवेदन देऊन देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर ते गुंजाळ नाका हा चिंचविहीरे शिव रस्ता खुला करण्यासाठी निवेदन दिले होते. त्यानुसार तहसीलदारांनी दिलेल्या आदेशानुसार आज मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर देवळाली प्रवरा मंडळ अधिकारी मंडलिक साहेब आणि तलाठी गरकळ भाऊसाहेब यांनी या शिव रस्त्याची आप्पासाहेब ढूस व स्थानिक शेतकऱ्यांसह सर्कल पाहणी केली..
प्रसंगी देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे काँग्रेस पक्षाचे गट नेते तुकाराम उर्फ दासू पठारे, नगरसेवक शरद वाळुंज, प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात प्रमुख चंद्रकांत कराळे, शहर प्रमुख प्रकाश वाकळे, संपर्क प्रमुख गणेश भालके, स्थानिक शेतकरी तथा उद्योजक विष्णुपंत गिते, शिवाजी गिते, देशमुख आदी उपस्थित होते.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























