पुणे
कोट्यवधींचा स्वच्छता निधी असताना पुणे स्वच्छतेसाठी CSR वर अवलंबून का? — PMC कडून ठोस उत्तर टाळण्याचा प्रयत्न
पुणे शहरातील स्वच्छतेसाठी सध्या एका खाजगी कॉर्पोरेट कंपनीकडून CSR (Corporate Social Responsibility) निधीतून उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत असले तरी, यामुळे पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरवर्षी स्वच्छतेसाठी पुणे महानगरपालिका कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करते. हजारो सफाई कर्मचारी, अधिकारी व ठेकेदार कार्यरत असतानाही शहरातील अनेक भागात कचऱ्याचे ढीग, नालेसफाईचा अभाव व अस्वच्छता कायम आहे.
या पार्श्वभूमीवर पत्रकार आमिर मोहम्मद शेख यांनी PMC कडे सविस्तर चौकशी अर्ज सादर करून —
स्वच्छता निधीचा वापर
ठेकेदार व करार
अधिकारी जबाबदारी
CSR उपक्रमासाठी PMC ची भूमिका
याबाबत माहिती मागितली होती.
मात्र PMC कडून आलेल्या उत्तरात
“CSR निधी हा खाजगी संस्थांचा विषय असून PMC चा आर्थिक सहभाग नाही”
असे सांगत मूळ प्रश्नांना बगल देण्यात आली आहे.
महत्त्वाचे म्हणजे, कोणताही CSR स्वच्छता उपक्रम सार्वजनिक ठिकाणी PMC च्या परवानगीशिवाय राबवता येत नाही. त्यामुळे PMC चा सहभाग नाही, हे उत्तर वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचे मत व्यक्त होत आहे.
“PMC ने स्वतःचा स्वच्छता निधी योग्य वापरला असता तर CSR ची गरजच का पडली?”
हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.
या प्रकरणी पुढील काळात RTI, लोकायुक्त व राज्य लेखा परीक्षकांकडे तक्रार दाखल केली जाणार असल्याचेही पत्रकार आमिर शेख यांनी स्पष्ट केले आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























