आईच्या मित्रानेच केला लेकीवर अत्याचार; गुन्हा दाखल
पुणे (शशिकांत पाटोळे) | दि; २० फेब्रुवारी २०२६ : पुण्यात पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराचा प्रकार समोर आलाय. मी तुला शाळेत सोडतो असं सांगून १३ वर्षीय मुलीवर गाडी लावून लैंगिक अत्याचार केलाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी वारजे पोलीस स्टेशनमध्ये आईने तक्रार दाखल केली असून वारजे पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली.
ज्ञानेश्वर रायरीकर असं २९ वर्षे आरोपीचे नाव आहे.
पीडित मुलीची आई विधवा आहे ती आणि ज्ञानेश्वर मागील अनेक वर्षांपासून एकमेकांचे मित्र आहेत त्यामुळे दोघांमध्ये चांगली ओळख होती. आईचा ज्ञानेश्वर वर विश्वास होता आणि त्यामुळे मुलीला त्याच्यासोबत फिरण्यासाठी परवानगी दिली होती. त्यामुळे मुलीने शाळेत सोडण्यासाठी ज्ञानेश्वर याला बोलवलं आणि त्याने देखील मी शाळेत सोडतो म्हणून सांगून तिला डीपी रोडवर घेऊन गेला मात्र शाळेत न सोडताच गाडी डीपी रस्त्यावर थांबवली आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
मुलगी शाळेत पोहोचली की नाही याची माहिती घेत असताना ती शाळेत सात वाजताच्या ऐवजी साडेसात वाजता पोहोचली होती. त्यानंतर मुलगी घरी आल्यावर आईने अर्धा तास का उशीर झाला याची माहिती मुलीला विचारली आणि त्या मुलीने घाबरत उत्तर दिली. यावरून तिच्या आईच्या संशय वाढला आणि आईने थेट पोलिसात तक्रार दाखल केली . आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी पॉक्स अंतर्गत गुन्हा दाखल केलाय आणि ज्ञानेश्वर रायरीकर याला अटक देखील केली आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























