स्पायसर चौक परिसरात वेश्या व्यवसायावर पोलिसांची कारवाई; ३ महिला ताब्यात
पिंपरी-चिंचवड |
पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत येणाऱ्या दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात वेश्या व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत तीन महिलांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई ५ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मौजे कुरुळी गावच्या हद्दीत स्पायसर चौकाजवळ, पुणे-नाशिक रोडवरील वेलकम लॉजसमोर काही महिला संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने घटनास्थळी छापा टाकून कारवाई केली.
पोलिसांच्या तपासात आरोपी महिला या वेश्या व्यवसाय करण्याच्या उद्देशाने अश्लील व लैंगिक हावभाव करून सार्वजनिक शिष्टाचाराचा भंग करत असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ अंतर्गत कलम ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी भाऊसाहेब लालु पवार (पोलीस शिपाई, ब. नं. ४६३०) यांनी फिर्याद दिली असून, ६ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ४.२२ वाजता गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संबंधित तीन महिला आरोपींना भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम ३५(३) नुसार नोटीस देण्यात आली आहे.
सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून, पुढील तपास सुरू आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























