Homeताज्या बातम्यावडमुखवाडीत पुन्हा कारवाई; अगत्य लॉजसमोर वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

वडमुखवाडीत पुन्हा कारवाई; अगत्य लॉजसमोर वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी परिसरात वेश्या व्यवसायावर पुन्हा एकदा पोलिसांनी कारवाई करत महिला आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. सततच्या कारवाईमुळे या परिसरातील बेकायदेशीर प्रकारांवर पोलिसांनी अंकुश ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.

ही कारवाई ६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.५० वाजण्याच्या सुमारास अगत्य लॉजसमोर, वडमुखवाडी येथील सार्वजनिक रस्त्यावर करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे घटनास्थळी छापा टाकण्यात आला.

तपासादरम्यान संबंधित महिला आरोपी ही वेश्याव्यवसाय करण्याच्या उद्देशाने अश्लील व लैंगिक हावभाव करत तसेच शब्द उच्चारून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण करत असल्याचे निष्पन्न झाले. या कृत्यामुळे सार्वजनिक शिष्टाचार व सभ्यतेचा भंग होत असल्याने तिच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ च्या कलम ८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, ६ एप्रिल २०२६ रोजी रात्री ९.०१ वाजता गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ बाळु खळसुडे (ब. नं. ३०६३) यांनी तक्रार दिली आहे.

संबंधित महिला आरोपीस भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम ३५(३) अन्वये नोटीस बजावण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गपाट यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

​जीवे मारण्याची व बांधकाम पाडण्याची भीती दाखवून १० लाखांची खंडणी मागणाऱ्या भीम संघर्ष संघटनेच्या...

पुणे: ममता फाउंडेशन संस्थेच्या इमारतीचे व घरांचे बांधकाम पाडण्याची आणि जीवे मारण्याची भीती दाखवून तब्बल १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपींना पुणे शहर पोलिसांच्या भारती...

पुण्यात गुन्हे शाखेची मोठी कारवाई: आंबेगाव पठार परिसरातून बेकायदेशीर पिस्टल व जिवंत काडतुसांसह एकाला...

​पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ने बेकायदेशीर हत्यारे बाळगणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत एका सराईत इसमाला अटक केली आहे. आरोपीकडून एक बेकायदेशीर पिस्टल...

लोहागड खून प्रकरण: पुणे पोलिसांनी केतन अग्रवालने जीवघेण्या ट्रेकिंग ट्रिप दरम्यान वापरलेल्या इलेक्ट्रिक कारची...

कारचा एक व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर समोर आला होता, ज्यामध्ये केतन अग्रवाल आणि त्यांची मंगेतर सिया गोयल सनरूफ उघडून गाडी चालवताना दिसत आहेत....

केतन अग्रवाल खून प्रकरण: सिया गोयलच्या पालकांनी चेतनला ओळखत असल्याचं नाकारल्यानंतर पोलिसांना ‘क्रिकेट लिंक’...

पुण्यातील व्यापारी केतन अग्रवाल यांच्या मृत्यूच्या सुरू असलेल्या तपासात मुख्य आरोपी सिया गोयल आणि सहआरोपी चेतन चौधरी हे गोयल कुटुंबीयांच्या वर्तुळाचा भाग कसे...

प्रोटान संघटनेच्या वतीने ५ जुलै रोजी पुण्यात राज्यस्तरीय शिक्षण परिषद आणि महारॅलीचे आयोजन

प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 'प्रोटान' फुंकणार आंदोलनाचे रणशिंग ​पुणे: राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रणीत प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी विंग (प्रोटान)...

error: Content is protected !!