: लोहगाव पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने एका मोठ्या कारवाईत मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम) अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील एका फरार आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. संबंधित आरोपी गेल्या एक वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत होता.
नेमकी घटना काय?
दिनांक १५ जुलै २०२६ रोजी लोहगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार जंगम हे हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गु.र.नं. ४०४/२०२५ मधील हवा असलेला आरोपी प्रणव शिंदे हा धानोरी येथील जकात नाक्याजवळील नाल्याजवळ उभा आहे. या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) आणि आर्म ॲक्टच्या विविध कलमांसह मोक्का कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलीस पथकाने त्वरित सापळा रचून सायंकाळी ५.०० च्या सुमारास आरोपी प्रणव भागवत शिंदे (वय १९ वर्षे, रा. चौधरीनगर लेन नं.१०, शिवशक्ती मित्रमंडळाजवळ, मुंजाबा वस्ती, धानोरी, पुणे) याला शिताफिने ताब्यात घेतले. अटकेनंतर आरोपीला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी विमानतळ पोलीस स्टेशनच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
कारवाईत यांचा सहभाग:
ही महत्त्वपूर्ण कारवाई पुणे शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:
मार्गदर्शक: श्री. मनोज पाटील (अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर), श्री. अबिनाश कुमार (पोलीस उपायुक्त, परिमंडळ ०७), आणि श्रीमती अनिता मोरे (सहाय्यक पोलीस आयुक्त, लोणीकंद विभाग, पुणे शहर).
नेतृत्व: श्रीमती मनीषा पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोहगाव पोलीस स्टेशन) आणि श्री. राकेश कदम (पोलीस निरीक्षक – गुन्हे) यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली.
तपास पथक: सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे यांच्यासह पोलीस अंमलदार अमित गायकवाड, अमोल आदलिंग, प्रितम जंगम, अल्पेश पोटकुले, दादासाहेब बर्डे, जोतीराम देवकाते, बाळासाहेब शिरसाठ, ज्ञानदेव आवारी, मोहन पालवे, शैलेश कुदळे, बबलु भिसे आणि दिनेश रसाळ यांनी या कारवाईत सहभाग नोंदवला.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























