Homeताज्या बातम्याशिरूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा मोठा छापा: २२ लाखांचा ११० ग्रॅम एम.डी. जप्त,...

शिरूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा मोठा छापा: २२ लाखांचा ११० ग्रॅम एम.डी. जप्त, राजस्थानच्या दोन तरुणांना अटक

शिरूर / पुणे:
‘नशामुक्त भारत’ व ‘ड्रग्ज फ्री महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि शिरूर पोलीस स्टेशनच्या पथकाने संयुक्त कारवाई करत मलठण येथे २२ लाख रुपये किमतीचा ११० ग्रॅम मेफेड्रोन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. या कारवाईत राजस्थानमधील दोन तस्करांना रंगेहाथ बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
​गोपनीय माहितीच्या आधारे मध्यरात्री कारवाई
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या आदेशानुसार अवैध धंद्यांवर कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शिरूर परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस हवालदार तुषार पंधारे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मलठण हद्दीतील राजवाडा चौकात दोन इसम एम.डी. ड्रग्ज विक्रीसाठी येणार आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने पोलिसांनी १८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२:१० च्या सुमारास सापळा रचून छापा टाकला.
​अटक आरोपी:
​सुरेंद्रसिंह भैरुसिंह राठोड उर्फ राजपूत (वय २४, सध्या रा. मनीष शिरोळे फार्म हाऊस, मलठण, ता. शिरूर, जि. पुणे; मूळ रा. गोगादेव की ढाणी, बांकियावास खुर्द, जि. बाडमेर, राजस्थान).
​श्रवण तेजाराम बिष्णोई (वय ३१, सध्या रा. मनीष शिरोळे फार्म हाऊस, मलठण, ता. शिरूर, जि. पुणे; मूळ रा. बांकियावास खुर्द, जि. बाडमेर, राजस्थान).
​२२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पोलिसांनी आरोपींकडून ११० ग्रॅम एम.डी. अंमली पदार्थ आणि एक मोटारसायकल असा एकूण २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायदा कलम ८ (क), २२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​कारवाई करणारे पोलीस पथक
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर (LCB), पोलीस निरीक्षक विनोद पाटील (शिरूर पो. स्टे.), सपोनि नितीन केनेकर, पोसई गोविंद खटिंग, तसेच अंमलदार संजय पड्याळ, तुषार पंधारे, जनार्दन शेळके, संजय जाधव, राजू मोमीन, विकास पाटील, सागर धुमाळ, चेतन पाटील, संदीप खेडकर, रवी काळे व ठोसरे यांनी केली. पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

२० वर्षे पोलिसांना हुलकावणी, अखेर कायद्याच्या कचाट्यात! येरवडा पोलिसांची यशस्वी कारवाई

पुणे पोलिसांची मोठी कारवाई! २० वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला येरवडा पोलिसांनी परळीतून केली अटक पुणे | प्रतिनिधी पुणे शहरातील येरवडा पोलीस ठाण्याच्या पथकाने गेल्या सुमारे २०...

जुन्नर तालुक्यात रात्रीच्या वेळी घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड; ३८ लाख ५० हजारांचा मुद्देमाल...

​पुणे : जुन्नर तालुक्यात आणि परिसरामध्ये रात्रीच्या वेळी घरफोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीला पुणे ग्रामीण एलसीबी (स्थानिक गुन्हे शाखा) आणि ओतूर पोलिसांनी...

खराडी पोलिसांची धडक कारवाई: वाहन चोरीचे ५ गुन्हे उघड; सराईत आरोपी अटकेत

पुणे: पुणे शहरातील वाहन चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांच्या पथकाने अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. खराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्याचा...

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बोपोडी येथे धम्मदीक्षा अनुकरण सोहळा उत्साहात संपन्न; भीमअनुयायांच्या उपस्थितीने परिसर धम्ममय!

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बोपोडी येथे धम्मदीक्षा अनुकरण सोहळा उत्साहात संपन्न; भीमअनुयायांच्या उपस्थितीने परिसर धम्ममय! पुणे (शशिकांत पाटोळे) : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक...

खेड तालुक्यातील वाडा येथील भांबुर्डेकर ज्वेलर्स दुकानात चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद; १० गुन्हे...

पुणे (ग्रामीण): खेड तालुक्यातील वाडा येथील भांबुर्डेकर ज्वेलर्स दुकानात डल्ला मारणाऱ्या दोन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व खेड पोलीस स्टेशनच्या पथकाने गजाड केले आहे....

error: Content is protected !!