Homeताज्या बातम्यापुणे शहर गुन्हे शाखा युनिट ३ ची धडक कारवाई: सिंहगड रोड परिसरातून...

पुणे शहर गुन्हे शाखा युनिट ३ ची धडक कारवाई: सिंहगड रोड परिसरातून सव्वा लाखांच्या परदेशी दारूचा साठा जप्त, दोघांना अटक

​पुणे:
पुणे शहर गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी सिंहगड रोड परिसरातील साईनगर, हिंगणे खुर्द येथे छापा टाकून बेकायदेशीरपणे विक्रीसाठी साठवून ठेवलेला १,२४,६३५ रुपये किमतीचा देशी-परदेशी दारूचा मुदद्माल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाईसाठी त्यांना सिंहगड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
​कारवाईची सविस्तर माहिती:
​दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट ३ चे पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत अन्वतकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदू व पोलीस अंमलदार युनिट-०३ च्या कार्यक्षेत्रात अवैध धंद्यांवर कारवाई करणे, तसेच पाहिजे आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासत होते.
​त्यादरम्यान रात्री ३:०० वाजता पोलीस अंमलदार पंढरीनाथ शिंदू व कोकरे यांना त्यांच्या बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, साईनगर, हिंगणे खुर्द, सिंहगड रोड, पुणे येथील एका इमारतीच्या खोलीवर देशी, परदेशी कंपनीची दारू अवैधपणे विक्रीसाठी ठेवली आहे. सदर माहितीनुसार नमुद ठिकाणी जाऊन एका पत्र्याच्या खोलीवर छापा टाकून एका इसमाला ताब्यात घेतले. त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव 1) अंकितकुमार सुरजेन बिंद (वय २० वर्षे, रा. साई नगर हिंगणे खुर्द, सिंहगड रोड, पुणे) असल्याचे सांगितले. त्याच्या खोलीमध्ये बेकायदेशीरपणे ठेवलेला देशी परदेशी दारूचा एकूण १,२४,६३५ रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला.
​सदर अवैध दारूबाबत अंकितकुमार बिंद याच्याकडे विचारपूस केली असता, त्याने सदर अवैध दारू ही त्याचा मित्र 2) आदित्य राजु शिंगू (रा. गल्ली नं. ८६, शंकर मंदिराजवळ, जनता वसाहत पुणे) याची असल्याचे सांगितल्याने त्याला ताब्यात घेऊन, सदर अवैध दारूबाबत खात्री करून त्यांच्या ताबेतून एकूण १,२४,६३५ रुपये किमतीचा देशी परदेशी दारू मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यानंतरवरील दोन्ही इसम व मुद्देमाल पुढील कार्यवाहीकरिता सिंहगड पोलीस स्टेशनच्या ताण्यात देण्यात आले आहेत.
​मार्गदर्शक व तपास पथक:
​सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्रीमती तेजोमय सातपुते, पोलीस उपायुक्त गुन्हे श्री. गौहर हसन, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-२ श्री. राजेंपु मूडीक यांच्या मार्गदर्शनखाली गुन्हे शाखा युनिट-३ चे पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत अन्वतकर यांच्या सूचनांप्रमाणे खालील पोलीस अंमलदारांनी केली आहे:
​सहाय्यक पोलीस निरीक्षक: नानासाहेब कदम
​पोलिसाधिकारी व अंमलदार: पंढरीनाथ शिंदू, राजेंपु नलायबदे, वाघमारे, कोकरे, किशोर शिंदू, लिमभण, जगनाडे, बोडरे, गुन्ले, खेंड्रे आणि राऊंड.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात पोलिसांवर हल्ला करून फरार झालेल्या दरोडेखोरांना छत्रपती संभाजीनगरच्या जंगलातून अटक; गुन्हे शाखा युनिट-५...

पुणे: डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीट मार्शलवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोन सराईत दरोडेखोरांना पुणे शहर गुन्हे शाखा...

कल्याणीनगर ट्रम्प टॉवरसमोर जबरी चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना येरवडा पोलिसांकडून अटक; ६० हजारांचा...

पुणे: कल्याणीनगर येथील ट्रम्प टॉवरसमोर फोनवर बोलत थांबलेल्या नागरिकाला "रागाने का पाहतोस" असे म्हणून जीवे मारण्याची धमकी देत रोख रक्कम लुटणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना येरवडा...

कोथरूड पोलिसांची धडक कारवाई: विक्रीसाठी आणलेली २ पिस्तुले आणि २ जिवंत काडतुसांसह एकास अटक;...

​पुणे: कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीररीत्या पिस्तूल विक्रीसाठी आणणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. आरोपीकडून २ पिस्तुले आणि २ जिवंत काडतुसे असा...

जास्त परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या महिलेला बेळगावातून अटक; शिवाजीनगर पोलिसांची कारवाई

​पुणे: गुंतवणूकदारांना शेअर ट्रेडिंगमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका महिलेला शिवाजीनगर पोलिसांनी बेळगाव (कर्नाटक) येथून जेरबंद केले आहे. राजश्री राजेश तुडयेकर...

हातचलाखीने ज्वेलर्समधून दागिने लांबवणारी टोळी लोहगाव पोलिसांच्या जाळ्यात; ५ जणांना अटक, अडीच लाखांचा मुद्देमाल...

पुणे: लोहगाव परिसरातील एका ज्वेलर्सच्या दुकानातून हातचलाखीने चांदीचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीला लोहगाव पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने शिताफीने जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी पाच...

error: Content is protected !!