Homeताज्या बातम्यापुणे महानगरपालिका सफाई कर्मचारी कारवाईत भेदभाव प्रकरण: युवक काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

पुणे महानगरपालिका सफाई कर्मचारी कारवाईत भेदभाव प्रकरण: युवक काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

​पुणे:
पुणे महानगरपालिकेच्या परिमंडळ क्रमांक ५ चे उपायुक्त माधव जगताप यांच्या मनमानी आणि भेदभावयुक्त कारभाराविरुद्ध युवक काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिस्तीच्या नावाखाली गरीब सफाई सेवकांवर अन्यायकारक कारवाई केली जात असून, राजकीय दबावामुळे वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळे निकष लावले जात असल्याचा गंभीर आरोप युवक काँग्रेसचे सरचिटणीस सागर धाडवे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी मनपा आयुक्तांना निवेदन देऊन सखोल निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
​कारवाईतील दुजाभाव आणि राजकीय हस्तक्षेप
उपायुक्त माधव जगताप यांनी आंबील ओढा आरोग्य कोठी येथे अचानक भेट देऊन तेथील १९ सफाई सेवकांवर कारवाईचे आज्ञापत्रक काढले होते. मात्र, या कारवाईदरम्यान सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकाच्या कुटुंबातील जवळची व्यक्ती सापडल्याने राजकीय दबावातून मूळ कारवाई बदलण्यात आली आणि केवळ नोटिसा बजावण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. याउलट, विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील बोंबील मार्केट आरोग्य कोठीतील ३ कर्मचारी आणि लक्ष्मी नगर आरोग्य कोठीतील ६ कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करून त्यांच्याविरुद्ध खातेनिहाय चौकशीचे आदेश देण्यात आले. एकाच प्रकारच्या कथित कसुरीसाठी प्रशासनाकडून असे दोन वेगवेगळे निकष का लावले जात आहेत, असा सवाल युवक काँग्रेसने उपस्थित केला आहे.
​युवक काँग्रेसच्या प्रमुख मागण्या
​आंबील ओढा आरोग्य कोठीतील कारवाईमध्ये राजकीय दबावामुळे झालेला बदल आणि फेरबदलाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.
​बोंबील मार्केट व लक्ष्मी नगर येथील निलंबित कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीने नाहक कारवाईचा सामना करावा लागला आहे, त्याच निकषांनुसार आंबील ओढा येथील कर्मचाऱ्यांबाबतही समान निर्णय घेण्यात यावा.
​निलंबीत कर्मचाऱ्यांना तत्काळ सेवेत रुजू करून घेण्यात यावे.
​केवळ चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांच्यावर देखरेख करणाऱ्या संबंधित मोकादम, आरोग्य निरीक्षक आणि वरिष्ठ आरोग्य निरीक्षक यांच्या प्रशासकीय जबाबदारीचीही कसून चौकशी करावी.
​उपायुक्तांनी फक्त सफाई सेवकांकडे लक्ष न देता आपल्या अखत्यारितील रस्त्यांवरील खड्डे, अनधिकृत बांधकामे, राजकीय दबावामुळे होणारी अतिक्रमणे आणि टेंडरमधील कथित अनियमितता याकडेही लक्ष देऊन समान तरतुदीनुसार कारवाई करावी.
​सफाई कर्मचाऱ्यांमध्ये भेदभावाची भावना निर्माण करणारा हा कारभार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. प्रशासनाने तात्काळ योग्य ती सुधारणा न केल्यास युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सरचिटणीस सागर धाडवे (मोबा: ९७६२७९२७६९) यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विश्रामबाग पोलीस स्टेशनची मोठी कारवाई: १० लाख रुपये किंमतीच्या १४ मोटार सायकली हस्तगत

​पुणे शहरातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने विधीसंघर्षीत बालक आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पुणे व इतर ठिकाणांहून चोरी केलेल्या एकूण १० लाख...

आंबेगाव पोलीस स्टेशनची धडक कारवाई: गोळीबार करणाऱ्या रेकॉर्डवरील पाच गुन्हेगार जेरबंद; तीन गावठी पिस्टल...

पुणे शहरात आंबेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या वादातून फिर्यादीच्या मुलावर गोळीबार करून पसार झालेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि आंबेगाव...

मुंढवा पोलिसांची धडक कारवाई: १,३०,०००/- रुपये किमतीच्या दोन चोरीच्या रिक्षा जप्त; एक आरोपी अटकेत

​पुणे: मुंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवत चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला आहे. मुंढवा पोलीस...

१०० पेक्षा अधिक वाहन चोरीचे गुन्हे करणारा २ वर्षांपासून पाहिजे असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद

​पुणे: पुणे शहरात गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबतच्या उपाययोजना व गुन्ह्यातील पाहिजे व फरार आरोपींचा गुन्हे शाखा युनिट २ मधील पोलीस अधिकारी व अंमलदार विशेष मोहिमे...

दरेगाव: मुगाच्या शेंगा तोडताना विषारी सर्पदंशाने शेतकरी महिलेचा मृत्यू; उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली

विशेष प्रतिनिधी / नायगाव नायगाव तालुक्यातील दरेगाव येथे शेतात मुगाच्या शेंगा तोडत असताना विषारी सर्पदंश झाल्यामुळे एका ४८ वर्षीय शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी...

error: Content is protected !!