पुणे, दिनांक ०६ नोव्हेंबर २०२६:
पुणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी पर्यावरण विभाग आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यातर्फे एक महत्त्वाची जाहीर सूचना जारी करण्यात आली आहे. मा. मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून दाखल केलेल्या जनहित याचिका क्र. ०१/२०२६ मध्ये दिनांक २२/०९/२०२६ व १५/१०/२०२६ रोजी दिलेल्या आदेशांनुसार आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिसूचना MPCB/UDNAPCYTB/B-००७३ (दि. ०३/१०/२०२४) नुसार, आवाज आणि वायू प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांची निर्मिती, विक्री किंवा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. 
सध्या वातावरणीय बदलांच्या समस्यांना सामोरे जावे लागत असून, हवेचे प्रदूषण हे त्याचे एक प्रमुख कारण आहे. सण-उत्सवांमध्ये फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांमध्ये कार्बन व सल्फरचे प्रमाण अधिक असल्याने विषारी वायू तयार होतात. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील नागरिकांना खालील मुद्द्यांचे काटेकोरपणे पालन करण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे:
सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास प्रतिबंध: सार्वजनिक रस्ते, चौक, गल्ली, पदपथ, उद्याने, टेरेस, बाल्कनी तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना व वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने फटाके फोडू नयेत.
शांतता क्षेत्रामध्ये फटाके फोडण्यास प्रतिबंध: रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये व इतर अधिसूचित शांतता क्षेत्रांच्या परिसरात फटाके फोडण्यास सक्त प्रतिबंध आहे.
ध्वनिवर्धक यंत्रणेसाठी परवानगी व अटींचे पालन: सार्वजनिक कार्यक्रम, मिरवणुका व इतर उत्सवांमध्ये ध्वनिवर्धक यंत्रणेचा वापर करण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच, परवानगीमधील सर्व अटी आणि ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, २००० मधील तरतुदींचे पालन करणे आवश्यक राहील.
ध्वनी व वायू प्रदूषण टाळा: फटाके व ध्वनिवर्धक यंत्रणांमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी सण व उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करावेत आणि फटाक्यांचा वापर टाळावा.
नागरिकांना आवाहन व आरोग्याची काळजी: सण-उत्सवांच्या काळात फटाक्यांमुळे होणारा आवाज आणि प्रदूषण लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच श्वसनविकार असलेल्या व्यक्तींच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकते. पर्यावरणाचे संरक्षण व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.
तक्रार व मदत हेल्पलाईन क्रमांक: नागरिकांच्या सोयीसाठी आणि तक्रारीकरिता हेल्पलाईन नंबर ०२०-२५५०१२६९ / २५५०८८०० आणि टोल-फ्री नंबर १८००१०३०२२२ उपलब्ध करून देण्यात आला आहे.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























