Homeताज्या बातम्याकोळवडी साष्ठेतील गौण खनिज गैरव्यवहारावर अनेक तक्रारीनंतरही दखल नाही; नागरिकाने 'आपलं सरकार'...

कोळवडी साष्ठेतील गौण खनिज गैरव्यवहारावर अनेक तक्रारीनंतरही दखल नाही; नागरिकाने ‘आपलं सरकार’ पोर्टलवर गंभीर तक्रार दाखल

पुणे – हवेली तालुक्यातील गट क्र. 72, कोळवडी साष्ठे येथील गौण खनिज उत्खननातील गैरव्यवहार, विकासकामांतील अनियमितता आणि शासकीय यंत्रणेच्या निष्काळजीपणाविरोधात नागरिक आमिर मोहम्मद शेख यांनी महाराष्ट्र शासनाच्या आपलं सरकार – Grievance Redressal Portal वर COM/GADO/2025/127 क्रमांकाची गंभीर तक्रार दाखल केली आहे.

अर्जदाराच्या मते, यापूर्वी अनेक वेळा लेखी तक्रारी, ईमेल, पोर्टलवरील नोंदी आणि थेट संबंधित अधिकाऱ्यांना कळवूनही कारवाई झाली नाही. या सततच्या दुर्लक्षामुळे शेवटचा पर्याय म्हणून “आपलं सरकार” पोर्टलवर तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

तक्रारीतील प्रमुख मुद्दे:

गट क्र. 72 मध्ये बेकायदेशीर गौण खनिज (मुरुम) उत्खनन सुरू असून, संबंधित ठिकाणी प्रशासनाकडे थेट पुरावे असूनही थांबवणूक कारवाई नाही.

विकासकामांमध्ये दोन वेगवेगळ्या ठेकेदारांना एकाच कामासाठी कंत्राट देण्यात आल्याचा संशय.

शासकीय अधिकारी आणि ठेकेदारांमध्ये संगनमत असल्याचे आरोप.

अनेक तक्रारी असूनही नागरिकांच्या प्रश्नांकडे सतत दुर्लक्ष.

या प्रकरणात IPC कलम 379 (चोरी), 420 (फसवणूक), 406 (विश्वासघात), 120B (कट रचणे) तसेच पर्यावरणीय आणि खनिज कायद्यांनुसार FIR नोंदवण्याची मागणी केली आहे.

अर्जदाराने स्पष्ट केले आहे की, “सरकारी यंत्रणेकडे वेळोवेळी तक्रारी केल्या तरी निष्पक्ष व वेळेत कारवाई होत नसल्याने आम्हाला आपल्या सरकार पोर्टल, RTI आणि उच्च पातळीवरील चौकशी आयोगाकडे जावं लागतं.”

या प्रकरणावर आता शासन व चौकशी आयोग कितपत जलद आणि ठोस पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिवाळीच्या पार्टीत चेतनशी भेट झाली, जवळीक वाढली, मग ‘स्क्रिप्टेड’ मंगेतराची हत्या: पोलिसांनी सिया गोयलचा...

पुणे ग्रामीण पोलिसांचा दावा आहे की सिया गोयल आणि चेतन चौधरी, ज्यांचे जवळचे नाते निर्माण झाले होते, त्यांनी त्याच्या मृत्यूची काटेकोरपणे योजना केली....

Chetan didn’t pay, Ketan didn’t return: Security guard at Lohagad Fort recalls chilling moments...

लोहगड किल्ल्यावरील सुरक्षा रक्षकाच्या (एल) खात्याने केतन अग्रवालच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या थंड घटनांवर प्रकाश टाकला आहे. पुणे: 18 जूनच्या सकाळी लोहगड किल्ल्यातील तिकीट...

​मौजमजेसाठी गाड्या चोरणारा गजाआड; आंबेगाव पोलिसांकडून ३ मोटारसायकल जप्त

पुणे: केवळ स्वतःच्या मौजमजेसाठी मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका सराईत चोराला आंबेगाव पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अत्यंत शिताफीने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून पोलिसांनी...

कोण होता केतन अग्रवाल? सक्सेस ग्रुप डायरेक्टर आणि वर-वधू यांची लोहगड ट्रिप शोकांतिकेत संपली....

पुण्यातील २६ वर्षीय उद्योजकाचा लोहगड येथे दुर्दैवी मृत्यू झाला पुणे: अलीकडच्या काही दिवसांत समोर आलेल्या सोशल मीडिया पोस्ट्समध्ये केतन विशाल अग्रवाल वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये...

2,000 कॉल्स, कॅफे मीट, फोर्ट प्लॉट: पुण्यातील रिअल्टरच्या हत्येपूर्वी सिया गोयलला ‘स्वतःसाठी अधिक वेळ’...

केतन अग्रवाल हत्येचा कट पुणे पोलिसांनी उघड केला आहे पुणे: 2,000 हून अधिक फोन कॉल्स, कथितपणे दिवाळीच्या पार्टीत सुरू झालेली मैत्री आणि एका...

error: Content is protected !!