Homeताज्या बातम्याखडकी स्टेशनचा नवा गेट — विकासाचं नवं दार, विरोध फक्त राजकारणासाठी!

खडकी स्टेशनचा नवा गेट — विकासाचं नवं दार, विरोध फक्त राजकारणासाठी!

खडकी स्टेशनचा नवा गेट — विकासाचं नवं दार, विरोध फक्त राजकारणासाठी!

*सेंट थॉमस स्कूलचं नाव पुढे करून काहीजण राजकीय खेळ खेळत आहेत; पण वास्तवात शाळेला मागच्या बाजूने पुरेसा सुरक्षित प्रवेश उपलब्ध आहे.*

*सुरेश कलमाडी आणि चंद्रकांत छाजेड यांच्या योजनांमुळे आज खडकी स्टेशनला नवं आयुष्य मिळालं — हा गेट म्हणजे त्या दूरदृष्टीचा परिणाम.*

*खडकी स्टेशनला जंक्शन बनवण्याचं स्वप्न आता साकारतेय — आणि काही जण मात्र विकासाच्या नावावर राजकारण खेळत आहेत*

*लेखक : अन्वर शेख (राजकीय विश्लेषक व समाजसेवक)*
*Mob 8459867838*

औंध रोडवरील सेंट थॉमस चर्च चौकाजवळ खडकी रेल्वे स्टेशनसाठी नुकतंच बांधण्यात आलेलं नवं प्रवेशद्वार काही जणांच्या विरोधाचं कारण बनलं आहे. मात्र वास्तव असं आहे की हा विरोध विकासाविरोधी आहे आणि काही राजकीय हेतूने प्रेरित आहे.

खडकी स्टेशन हे लवकरच पुणेचं महत्त्वाचं जंक्शन बनणार आहे. इथून इतर शहरांकडे जाणाऱ्या गाड्यांचा थांबा होणार असून, चार नवीन प्लॅटफॉर्मची उभारणी सुरू आहे. स्टेशनला आधुनिक रूप देण्यासाठी आणि नागरिकांना सोयीस्कर प्रवेश मिळावा म्हणून हे नवं गेट आवश्यक होतं.

आधी खडकी स्टेशनकडे फक्त मुंबई–पुणे रोडवरूनच प्रवेश होता, जिथे पार्किंग, वाहनांची थांबण्याची जागा आणि प्रवाशांसाठी सुविधा नव्हत्या. नवीन गेटमुळे ही समस्या सुटणार आहे आणि खडककी, बोपोडी, औंध परिसरातील नागरिकांना थेट रेल्वे सुविधा मिळणार आहे.

🔹 *हे स्वप्न प्रत्यक्षात आणणारे दूरदर्शी नेते होते पुण्याचे खासदार आणि तत्कालीन रेल्वे राज्य मंत्री श्री. सुरेश कलमाडी आणि बोपोडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार व पर्यटन मंत्री चंद्रकांत छाजेड.*
त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आज खडकी रेल्वे स्टेशन जंक्शन बनण्याच्या मार्गावर आहे.
जे लोक आजपर्यंत पुणे स्टेशनपर्यंत गाडी पकडण्यासाठी जात होते, ते आता थेट खडकीतून रेल्वे गाडी पकडू शकतील — ही सामान्य प्रवाशांसाठी मोठी सोय ठरणार आहे.

म्हणून उलट खडकी, बोपोडी आणि औंध परिसरातील नागरिकांनी कलमाडी साहेब आणि छाजेड साहेब यांच्या दूरदृष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे.

पण काहीजण मात्र शाळेच्या नावाखाली आणि “सुरक्षेच्या” आडून हा विरोध करून स्वतःचा राजकीय अजेंडा राबवत आहेत.
वास्तवात शाळेला आधीपासूनच पर्यायी प्रवेशद्वार उपलब्ध आहे आणि शाळेच्या परिसरात मुलांच्या येण्या-जाण्याची पुरेशी जागा आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न उचलून धरणं हे फक्त दिशाभूल करणं आहे.

रेल्वे प्रशासनाने आधीच नागरिकांच्या सूचनांचा आदर करून तिकीट काउंटर आत हलवला आहे, त्यामुळे रस्त्यावर गर्दी होणार नाही. प्रशासन जबाबदारीने काम करतंय, आणि हेच दाखवते की हा निर्णय लोकांच्या सोयीचा आहे, राजकीय नव्हे.

नवीन गेटमुळे —
➡️ प्रवाशांचा प्रवास सुकर होईल,
➡️ स्थानिक व्यापार वाढेल,
➡️ आणि खडककी परिसर पुण्याच्या विकासाच्या नकाशावर नव्या उंचीवर पोहोचेल.

म्हणून माझं स्पष्ट मत असं आहे की —
खडकी स्टेशनचं नवं प्रवेशद्वार हे फक्त एक गेट नाही, तर प्रगतीकडे जाणारं दार आहे.
विकासाला विरोध करणं म्हणजे शहराच्या भविष्याला अडथळा आणणं.

*लेखक : अन्वर शेख (राजकीय विश्लेषक व समाजसेवक)*
*Mob 8459867838*

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात. पुणे बातम्या

शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करणार असल्याच्याही अटकळ सुरू आहेत. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी दिल्लीत...

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते. पुणे बातम्या

पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

भव्य सायकल टूर मार्गांवर खड्डे दिसू लागल्याने कार्यकर्त्यांनी ऑडिटची मागणी केली. पुणे बातम्या

फर्ग्युसन कॉलेज रोडवर खड्डे पडले आहेत पुणे : या वर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या उद्घाटनाच्या भव्य सायकल टूरसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुनर्संचयित केल्यानंतर शहरातील अनेक...

कल्याणीनगर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तीन नवीन रस्ते जोडले. पुणे बातम्या

कल्याणीनगर आणि वडगाव शेरी येथील रहिवाशांनी नगरसेवक योगेश मुळीक यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या मांडल्या.कल्याणीनगर आणि वडगाव शेरी येथील रहिवाशांनी नगरसेवक योगेश मुळीक...

भारती विद्यापीठ हॉस्पिटलला रुग्ण हक्क संघर्ष समितीचा दणका: ४३ हजार रुपयांचे बिल कमी करत...

पुणे: पुण्यातील नामांकित भारती हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीबाबत रुग्ण हक्क संघर्ष समिती महाराष्ट्र, पुणे शाखेने यशस्वी पाठपुरावा करत एका गरीब गरजू रुग्णाला...

error: Content is protected !!