Homeताज्या बातम्यापुणे-सातारा महामार्गावरील नवीन कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात

पुणे-सातारा महामार्गावरील नवीन कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात

पुणे (शशिकांत पाटोळे) | दि; ५ मार्च २०२६ : सातारा महामार्गावर नवीन कात्रज बोगद्याजवळील जांभुळवाडी दरी पुल परिसरात आज गुरुवारी दुपारी एक भीषण साखळी अपघात झाला. भरधाव कंटेनरने नियंत्रण सुटल्यानंतर समोर असलेल्या तीन ते चार वाहनांना जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या घटनेत सात ते आठ जण जखमी झाले असल्याची माहिती आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सातारा दिशेकडून पुण्याकडे येणारा कंटेनर अचानक नियंत्रणाबाहेर गेला. उतार असलेल्या या घाट रस्त्यावर कंटेनरने पुढे असलेल्या चारचाकी वाहनांना पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की, चार कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही वाहनांच्या काचा फुटल्या, तर गाड्यांचे सुटे भाग रस्त्यावर विखुरले गेले. परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

अपघातानंतर स्थानिक नागरिक, इतर वाहनचालक आणि प्रवाशांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे, तर बहुतेक किरकोळ जखमी आहेत.

या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. वाहनांची मोठी कोंडी लागली. पोलिस आणि वाहतूक पथकाने घटनास्थळावरील वाहने बाजूला करून वाहतूक हळूहळू सुरळीत केली. मात्र, अपघातग्रस्त परिसरात अजूनही काही प्रमाणात वाहतूककोंडी कायम आहे.

*अपघातांचा ‘हॉटस्पॉट’*

पुणे-सातारा महामार्ग हा अपघातांचा ‘हॉटस्पॉट’ म्हणून ओळखला जातो. नवले पुल आणि जांभुळवाडी दरी पुल परिसरात उतार, वळण आणि वेगामुळे असे अपघात वारंवार घडतात. पोलिसांनी अपघाताचे कारण तपास सुरू केले असून, कंटेनर चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा संशय आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामती हवाई पट्टीजवळ प्रशिक्षण विमान कोसळले, पायलट किरकोळ जखमी होऊन बचावला. पुणे बातम्या

पुणे: रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीचे एक विमान बुधवारी सकाळी 8.50 च्या सुमारास पुणे जिल्ह्यातील बारामती हवाई पट्टीजवळ क्रॅश लँड झाले आणि प्रशिक्षणार्थी वैमानिक किरकोळ...

रहिवाशांच्या विरोधानंतर PCMC स्थायी समितीने पुनावळे शाळेच्या जमीन भाडेपट्ट्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे पाठवला. पुणे...

पुणे : रहिवाशांच्या तीव्र विरोधाला तोंड देत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी पुनावळे येथील शैक्षणिक संस्थेसाठी आरक्षित असलेला भूखंड खासगी संस्थेला भाडेतत्त्वावर देण्याचा...

एसआयटीने ज्योतिषी अशोक खरात यांच्याविरुद्ध दोन लैंगिक गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल केले. पुणे बातम्या

नाशिक : ज्योतिषी अशोक खरात यांच्याविरुद्ध लैंगिक छळ, फसवणूक आणि खंडणीच्या गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) बुधवारी नाशिक येथील न्यायालयात...

सातारा आणि कोल्हापुरात पावसाने दिलासा दिला. पुणे बातम्या

कोल्हापूर : सातारा जिल्ह्यातील काही भागात बुधवारी सायंकाळी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह अचानक आलेल्या पावसाने 22 शेळ्या आणि एक गाय विजेच्या...

वानोवरी आणि पुणे कॅन्टमध्ये पावसाळ्यातील पूर टाळण्यासाठी पीएमसीने भैरोबा नाल्यातील गाळ काढण्यास सुरुवात केली....

पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून जाणाऱ्या भैरोबा नाल्यावरील पावसाळ्याला जेमतेम आठवडे उरले असताना पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) गाळ काढण्याचे आणि गाळ काढण्याचे काम...

error: Content is protected !!