Homeताज्या बातम्यापुण्यात पोलिसांवर हल्ला करून फरार झालेल्या दरोडेखोरांना छत्रपती संभाजीनगरच्या जंगलातून अटक; गुन्हे...

पुण्यात पोलिसांवर हल्ला करून फरार झालेल्या दरोडेखोरांना छत्रपती संभाजीनगरच्या जंगलातून अटक; गुन्हे शाखा युनिट-५ ची धडक कारवाई

पुणे:
डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीट मार्शलवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोन सराईत दरोडेखोरांना पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाने छत्रपती संभाजीनगरमधील अजिंठा येथील दुर्गम जंगलातून सापळा रचून जेरबंद केले आहे.
​घटनेची पार्श्वभूमी
दिनांक २४ ऑक्टोबर २०२४ रोजी डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अभिनव पथ येथे ६ इसम सशस्त्र दरोड्याच्या तयारीत जमले होते. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलीस बीट मार्शल यांनी त्यांना हटकले असता, आरोपींनी बीट मार्शल यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते. बचावासाठी बीट मार्शल यांनी आरोपींच्या दिशेने २ राऊंड फायर केले होते. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १७१/२०२४ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३१० (१), १२१ (१), १३२ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(२)(३)/१३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
​डोंगराळ व वनक्षेत्रात रचला सापळा
गुन्ह्यातील पाहिजे आरोपी राहत असलेला परिसर अत्यंत डोंगराळ व घनदाट वनक्षेत्र असल्याने त्यांना पकडण्यात पोलिसांना मोठ्या अडचणी येत होत्या. दरम्यान, गुन्हे शाखा युनिट-५ चे पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांना आरोपींविषयी गोपनीय माहिती मिळाली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छत्रपती संभाजीनगर येथील अजिंठा व स्थानिक पोलिसांच्या मदतीने जंजाळा (ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील दुर्गम भागात सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
​ताब्यात घेण्यात आलेले आरोपी
​शाहरुख कदीर खान पठाण (वय २८ वर्षे, रा. मु. पो. जंजाळा, ता. अजिंठा, जि. छत्रपती संभाजीनगर)
​फारुख कदीर खान पठाण (वय २६ वर्षे, रा. मु. पो. जंजाळा, ता. अजिंठा, जि. छत्रपती संभाजीनगर)
​तपास पथक व अधिकारी
सदरची धडक कामगिरी पुणे शहराचे पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त श्री. संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
​या कारवाईत गुन्हे शाखा युनिट-५ चे खालील अधिकारी व अंमलदार सहभागी होते:
​पोलीस निरीक्षक: संदीपान पवार, वाहीद पठाण
​पोलीस उपनिरीक्षक: अभिजीत पवार, दत्तात्रय काटम, संदीप जाधव
​पोलीस अंमलदार: शहाजी काळे, प्रताप गायकवाड, अकबर शेख, राहुल ढमढेरे, उमाकांत स्वामी, अमर चव्हाण, परमेश्वर कदम, नासेर देशमुख, सुधीर सोनवणे, अविनाश इंगळे, कुलदीप पवार, शशिकांत नाळे, राहुल गोसावी, नेत्रिका अडसुळ, जयश्री भालेराव, श्रीदेवी फाळके आणि मयुरी पालवे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जुन्नर तालुक्यात रात्रीच्या वेळी घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड; ३८ लाख ५० हजारांचा मुद्देमाल...

​पुणे : जुन्नर तालुक्यात आणि परिसरामध्ये रात्रीच्या वेळी घरफोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीला पुणे ग्रामीण एलसीबी (स्थानिक गुन्हे शाखा) आणि ओतूर पोलिसांनी...

खराडी पोलिसांची धडक कारवाई: वाहन चोरीचे ५ गुन्हे उघड; सराईत आरोपी अटकेत

पुणे: पुणे शहरातील वाहन चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांच्या पथकाने अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. खराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्याचा...

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बोपोडी येथे धम्मदीक्षा अनुकरण सोहळा उत्साहात संपन्न; भीमअनुयायांच्या उपस्थितीने परिसर धम्ममय!

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बोपोडी येथे धम्मदीक्षा अनुकरण सोहळा उत्साहात संपन्न; भीमअनुयायांच्या उपस्थितीने परिसर धम्ममय! पुणे (शशिकांत पाटोळे) : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक...

खेड तालुक्यातील वाडा येथील भांबुर्डेकर ज्वेलर्स दुकानात चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद; १० गुन्हे...

पुणे (ग्रामीण): खेड तालुक्यातील वाडा येथील भांबुर्डेकर ज्वेलर्स दुकानात डल्ला मारणाऱ्या दोन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व खेड पोलीस स्टेशनच्या पथकाने गजाड केले आहे....

औंध नगर आणि विद्यापीठ भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न;

औंध नगर आणि विद्यापीठ भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न; पुणे (शशिकांत पाटोळे) : औंध नगर आणि विद्यापीठ भागातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वार्षिक...

error: Content is protected !!