भांडण मिटविण्यासाठी गेलेल्या तरुणावर वाघजाई चौक येथे प्राणघातक हल्ला
पिंपरी (शशिकांत पाटोळे) : भांडण मिटवून तडजोड करण्यासाठी गेलेल्या एका तरुणावर कोयत्याने आणि दगडाने प्राणघातक हल्ला केला. ही घटना नवी सांगवीतील वाघजाई चौक येथे घडली. वेदांत मदने असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणी वेदांतच्या आईने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रथमेश गणेश शिंदे (रा. राजाराम नगर, नवी सांगवी) याला अटक केली असून, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
अंशुमन कागडा आणि विकास उर्फ विशु कांबळे यांच्यातील भांडण मिटवण्यासाठी फिर्यादी यांचा मुलगा वेदांत मदने आणि इतर मित्र गेले होते. त्यावेळी आरोपींनी वेदांतवर कोयत्याने वार केले. तसेच दगडाने, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























