व्हॉट्सअॅप स्टेटसवर महात्मा फुले दांपत्यांचा अवमान
पुणे (शशिकांत पाटोळे) | दिनांक ; २० फेब्रुवारी २०२६ : व्हॉट्सअॅप स्टेटसवर समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी विंश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्त्या तसेच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या आदिती गणेश बाबर यांनी तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादीनुसार, नाशिक जिल्ह्यातील बॉम्बे नाका परिसरातील महात्मा फुले दांपत्यांच्या स्मारकाजवळ एका युवकाने व्हिडिओ चित्रित करून त्यामध्ये महापुरुषांबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप आहे. संबंधित व्हिडिओ व्हॉट्सअॅप स्टेटसवर प्रसारित करण्यात आला होता.
आदिती बाबर या येरवडा येथील पोरवाल पार्क परिसरात कुटुंबासह वास्तव्यास असून सामाजिक कार्य करतात. कृष्णा चौधरी (वय अंदाजे २७, रा. मालेगाव, जि. नाशिक) याचा मोबाईल क्रमांक त्यांच्या फोनमध्ये सेव्ह असल्याने दोघांना एकमेकांचे व्हॉट्सअॅप स्टेटस दिसत होते. दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ८ वाजता त्यांनी संबंधित स्टेटस पाहिल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
सदर कृत्य हे महापुरुषांचा जाणीवपूर्वक अवमान करून त्यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. या घटनेप्रकरणी कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पोलीसांकडे केली आहे.
“यापुढे कोणत्याही महामानवाचा अपमान करण्याचा प्रयत्न झाल्यास तो कदापिही सहन केला जाणार नाही,” असा इशाराही बाबर यांनी दिला. तक्रार नोंदविताना संध्या शिंदे व महेश पाटील हे उपस्थित होते. पुढील तपास विंश्रांतवाडी पोलीस करत आहेत.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























