Homeताज्या बातम्यासेवा हक्क दिनी पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचा राज्यस्तरीय सन्मान

सेवा हक्क दिनी पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचा राज्यस्तरीय सन्मान

पुणे, दि. 28 एप्रिल: महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियम, 2015 ची प्रभावी अंमलबजावणी तसेच माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरिकांना जलद, पारदर्शक व सुलभ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे महानगरपालिकेने राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल पुणे महापालिका आयुक्त मा. श्री. नवल किशोर राम यांचा “द्वितीय सेवा हक्क दिन” निमित्त आयोजित राज्यस्तरीय सोहळ्यात सन्मान करण्यात आला.
दि. 28.04.2026 रोजी मुंबई येथील सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे हा सोहळा पार पडला. राज्याचे मा. मुख्य सचिव श्री. राजेश अग्रवाल यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे मा. प्रमुख श्री. मनुकुमार श्रीवास्तव हे प्रमुख उपस्थित होते.
हा राज्यस्तरीय कार्यक्रम सामान्य प्रशासन विभाग आणि महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
पीएमसी 360 उपक्रमाची राज्यस्तरावर दखल
पुणे महानगरपालिकेमार्फत नागरिकांना अधिक गतिमान, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित सेवा देण्यासाठी PMC 360 ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अंतर्गत विविध डिजिटल सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
यामध्ये पुढील सेवा समाविष्ट आहेत:
अधिकृत संकेतस्थळ
सेवा पोर्टल
तक्रार निवारण प्रणाली
DBT पोर्टल
ऑनलाईन पेमेंट सुविधा
ई-स्वाक्षरी (eSign)
QR Code प्रमाणीकरण
WhatsApp BOT
आपले सरकार पोर्टल
PMC Care इंटरफेस
नागरिकाभिमुख सेवांना गती
मागील वर्षभरात या सर्व प्रणाली अद्ययावत करण्यात आल्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची अंमलबजावणी अधिक सुलभ, परिणामकारक आणि नागरिकाभिमुख झाली असल्याचे सांगण्यात आले.
आयुक्तांच्या नेतृत्वाचे कौतुक
सदर उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी मा. आयुक्त श्री. नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून, त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य सेवा हक्क आयुक्तांनी अभिनंदन केले आहे.
या सन्मानामुळे पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनिक कार्यक्षमतेला आणि डिजिटल सेवांना राज्यस्तरावर मोठी मान्यता मिळाल्याचे मानले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोहगाव पोलिसांची मोठी कारवाई: बंगल्याच्या गार्डनमध्ये गांजाची लागवड करणाऱ्या इसमाला अटक

पुणे: अमली पदार्थांच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी पुणे शहर पोलिसांनी 'गांजाच्या मुळावर घाव' घालण्यास सुरुवात केली आहे. लोहगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका भाड्याने घेतलेल्या...

हडपसरमध्ये बँकेच्या रिकव्हरी एजंटकडून थकित कर्जदाराला मारहाण; तिघांना अटक

हडपसरमध्ये बँकेच्या रिकव्हरी एजंटकडून थकित कर्जदाराला मारहाण; तिघांना अटक पुणे, दि. २८ एप्रिल २०२६ : हडपसर येथे इंडसइंड बँकेच्या रिकव्हरी एजंटांनी थकित क्रेडिट कार्ड कर्जदाराकडे कर्जापेक्षा...

मोबाईल चोरीच्या गुन्हेगारास ०४ तासात पकडून ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त

पुणे शहरातील चंदननगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने तत्पर कारवाई करत मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीस अवघ्या ०४ तासांच्या आत ताब्यात घेत ६६ हजार रुपयांचा...

मराठी न येणाऱ्या चालकांचे लायसन्स रद्द? पँजतन पवित्र संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. हनीफ...

मराठी भाषा न येणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांचे लायसन्स रद्द करण्याच्या कथित निर्णयाविरोधात निवेदन; मुख्यमंत्री व पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे पँजतन पवित्र संघटनेची तक्रार पुणे, दि. 28 एप्रिल: मराठी...

बंगालच्या उपसागराचा महासागर 92 दशलक्ष वर्षांपूर्वीचा आहे: IISER अभ्यास | पुणे बातम्या

प्रतिनिधी प्रतिमा" decoding="async" fetchpriority="high"/> पुणे: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) पुणे च्या संशोधकांनी केलेल्या एका नवीन अभ्यासात असे आढळून आले...

error: Content is protected !!