Homeताज्या बातम्याकर्जफेडीसाठी चुलत भावाच्या घरी घरफोडी करणारा आरोपी २४ तासांत अटकेत;

कर्जफेडीसाठी चुलत भावाच्या घरी घरफोडी करणारा आरोपी २४ तासांत अटकेत;

मुंढवा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
कर्जफेडीसाठी चुलत भावाच्या घरी घरफोडी करणारा आरोपी २४ तासांत अटकेत;
२२.९९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या २४ तासांत छडा लावत मुंढवा पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, गुन्ह्यातील सुमारे २२ लाख ९९ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
या संदर्भात सविस्तर वृत्त असे की, मुंढवा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ३२/२०२६, बी.एन.एस. कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(५) अन्वये दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजेपासून ६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ४.१५ वाजेपर्यंत, सर्व्हे नंबर ९४/बी, मुंढवा, पुणे येथील फिर्यादी यांच्या राहत्या फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्याने घरफोडी करून
३७९ ग्रॅम सोन्याचे दागिने, १ किलो चांदी व २ लाख रुपये रोख असा एकूण २२,९९,००० रुपये किमतीचा ऐवज चोरीस नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
या गुन्ह्याच्या तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता, हा प्रकार ओळखीच्या व्यक्तीने केल्याचा संशय बळावला. त्या अनुषंगाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदारांच्या माहितीच्या आधारे तपास करण्यात आला.
तपासादरम्यान फिर्यादी यांचा नातेवाईक व चुलत भाऊ आशुतोष अशोक कासवा, रा. सर्व्हे नं. ९४/बी, मुंढवा, पुणे याला ताब्यात घेण्यात आले. कसून चौकशीत आरोपीने कर्जाची परतफेड करण्यासाठी चोरी केल्याची कबुली दिली.
आरोपीच्या राहत्या घरातून चोरीस गेलेले सर्व सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २२.९९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पुढील तपास सुरू आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ६, श्री. राजकुमार शिंदे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. अतुलकुमार नवगिरे यांच्या अधिपत्याखाली करण्यात आली.
तसेच मुंढवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्मिता वासनिक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पिंग्वाले, पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण, सहाय्यक पोलीस फौजदार राजू कदम, पोलीस हवालदार शिवाजी जाधव, योगेश गायकवाड, राहुल मोरे, राहुल धोत्रे, शिवाजी धांडे, तसेच पोलीस अंमलदार अक्षय धुमाळ, स्वप्नील रासकर व योगेश राऊत यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नोंदणी विभाग जिल्ह्यातील कोणत्याही उपनिबंधक कार्यालयातून भाडेकरू करारनामा क्लिअर करण्याचा विचार करतो. पुणे बातम्या

पुणे: राज्य मालमत्ता नोंदणी विभाग ऑनलाइन रजा आणि परवाना (भाडेकरू) करारनामे विशिष्ट तालुका कार्यालयांपुरती मर्यादित न ठेवता जिल्ह्यातील कोणत्याही उपनिबंधक कार्यालयाकडून मंजूर करण्याचा विचार...

उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; अधिकारी एसीमध्ये तर आंदोलनकर्ते उन्हात – दोन दिवसांपासून उपोषण सुरू

पुणे, दि. — पुणे शहरात सुरू असलेल्या उपोषण आंदोलनाकडे प्रशासनाकडून गंभीर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. दोन दिवसांपासून प्रखर उन्हात बसून आंदोलन...

मास कॉपी: संपूर्ण महाराष्ट्रात HSC आणि SSC परीक्षांमध्ये कॉपी करण्यास मदत करणाऱ्या शिक्षकांना, शाळेच्या...

पुणे: सध्या सुरू असलेल्या एचएससी आणि एसएससी परीक्षांमध्ये परीक्षेतील गैरप्रकारांची तब्बल 81 प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामुळे राज्यभरातील केंद्रांवर सामूहिक कॉपी आणि...

ब्रह्मकुमारी बोपोडी तर्फे महिला दिनानिमित्त डॉ. आम्रपाली मोहिते यांचा सन्मान

पुणे, दि. — जागतिक महिला दिनानिमित्त समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने ब्रह्मकुमारी केंद्र, बोपोडी यांच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन...

इजरायल संसदेत वक्तव्य प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या चौकशीची मागणी

पुणे | दि. 9 मार्च 2026 पंजेतन पवित्र संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा. हनिफ भाई शेख यांनी भारताचे पंतप्रधान Narendra Modi यांच्या कथित वक्तव्याच्या चौकशीची...

error: Content is protected !!