Homeताज्या बातम्याकात्रज घाटात भीषण अपघात: एसटी बस–रिक्षा धडक, चालकाचा मृत्यू; तिघे जखमी

कात्रज घाटात भीषण अपघात: एसटी बस–रिक्षा धडक, चालकाचा मृत्यू; तिघे जखमी

पुणे, दि. 23 एप्रिल 2026 (प्रतिनिधी): आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कात्रज घाट बोगदा संपल्यानंतर पुण्याकडे येताना दुसऱ्या वळणावर आज सायंकाळी सुमारे 5:25 वाजता एसटी बस व ऑटो रिक्षामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 10 डीटी 2697 क्रमांकाची एसटी बस स्वारगेटवरून विटा (जि. सांगली)कडे जात होती. तर एमएच 12 जीएस 9695 क्रमांकाची ऑटो रिक्षा खेड शिवापूरकडून स्वारगेटच्या दिशेने येत होती. कात्रज घाट उतरताना बोगदा संपल्यानंतर दुसऱ्या वळणावर दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली.
या अपघातात रिक्षा चालक हनुमंत रमेश हंगरगे (वय 42, रा. सुखसागर नगर, बिबवेवाडी) यांचा मृत्यू झाला. तर खालील तिघे जखमी झाले आहेत:
राजेश इंगवले (वय 48, रा. गोकुळ नगर, कात्रज-कोंढवा रोड, पुणे)
दशरथ निरगुडे (वय 43, रा. ओसवाल हॉस्पिटल शेजारी, अप्पर बिबवेवाडी)
शहाजी लक्ष्मण शिवदे (वय 41, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी)
जखमींना तातडीने 108 रुग्णवाहिका सेवेद्वारे जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, एसटी बस चालक जालिंदर विष्णु शिंदे (वय 53, रा. शेडगेवाडी, ता. खानापूर, जि. सांगली) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून आंबेगाव पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
घटनेमुळे कात्रज घाट परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
अपघाताचे कारण, वेग आणि निष्काळजीपणा याबाबत पोलिस अधिक तपास करत असून, संबंधितांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुरुष सहकाऱ्याच्या तक्रारीवरून TCS नाशिकच्या चार कर्मचाऱ्यांना २९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे....

नाशिक : अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस.व्ही. लाड यांच्या न्यायालयाने शुक्रवारी कंपनीतील त्यांच्या एका पुरुष सहकाऱ्याने केलेल्या तक्रारीत लैंगिक छळ आणि धार्मिक बळजबरी केल्याच्या आरोपाखाली...

सातारा, सांगली जिल्ह्यांत पावसाने दिलासा दिला. पुणे बातम्या

कोल्हापूर/नाशिक: सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील काही भागात शुक्रवारी सायंकाळी सुमारे 10 ते 15 मिनिटे पावसाने हजेरी लावली. 30-40 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह अचानक आलेल्या...

राज्य भाषा आदेशानंतर कॅब, ऑटो चालकांसाठी मोफत मराठी वर्ग देणार आहे. पुणे बातम्या

पुणे: मराठी भाषा शिकणे अनिवार्य करण्याच्या किंवा त्यांचे परवाने रद्द होण्याची शक्यता निर्माण करण्याच्या निर्णयानंतर राज्य सरकार ऑटोरिक्षा आणि कॅब चालकांना मराठी...

पोलिसांच्या पुढाकाराने नगरसेवक त्यांचे क्षेत्र अंमली पदार्थांच्या समस्येपासून मुक्त करण्यासाठी मदत करतील: सीपी |...

पुणे : पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी सामाजिक साफसफाईची गरज अधोरेखित केली आणि जाहीर केले की विभाग लवकरच ड्रग मुक्त...

विश्रांतवाडी येथे पुणे पॅंथर सेनेकडून Donald Trump यांच्या फोटो ला जोडे मारून ‘जोडे मारो’...

विश्रांतवाडी येथे पुणे पॅंथर सेनेकडून Donald Trump यांच्या फोटो ला जोडे मारून ‘जोडे मारो’ आंदोलन केले पुणे : विश्रांतवाडी परिसरात पुणे पॅंथर सेना व संस्थापक...

error: Content is protected !!