Homeताज्या बातम्याचहा पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कागदी कपांवर बंदी नियम मोडल्यास 2 वर्षांपर्यंत कारावास...

चहा पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कागदी कपांवर बंदी नियम मोडल्यास 2 वर्षांपर्यंत कारावास व 1 लाख रुपये दंड

चहा पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कागदी कपांवर बंदी
नियम मोडल्यास 2 वर्षांपर्यंत कारावास व 1 लाख रुपये दंड
परभणी | प्रतिनिधी
कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरत असल्याची शक्यता लक्षात घेऊन परभणी जिल्ह्यात चहा पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कागदी कपांवर बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दोन वर्षांपर्यंत कारावास आणि एक लाख रुपयांपर्यंत दंडाची कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथील उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या पत्रानुसार, चहासाठी वापरले जाणारे कागदी कप तयार करताना ‘बीपीए’ (BPA) सारख्या रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो. गरम चहा ओतल्यानंतर कपाच्या आतील बाजूस असलेले प्लास्टिकचे सूक्ष्म कण वितळून पेयामध्ये मिसळण्याची शक्यता असते. हे कण शरीरात गेल्यास कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो, असे नमूद करण्यात आले आहे.
हा निर्णय सय्यद रफीक पेडगावकर, परभणी जिल्हाध्यक्ष यांनी दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी दिलेल्या निवेदनाच्या आधारे घेण्यात आल्याचे पत्रात नमूद आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कागदी कपांचा वापर होत असल्याने सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने तातडीने बंदी आवश्यक असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका प्रशासन तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाला आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत. हॉटेल चालक, टपरीधारक आणि चहा विक्रेत्यांनी तत्काळ पर्यायी सुरक्षित साधनांचा वापर करावा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे चहा विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांमध्ये चर्चा सुरू झाली असून, पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी पर्यायांचा अवलंब करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विनाअनुदानित महाविद्यालये खाजगी विद्यापीठांमध्ये रूपांतरित करण्यासाठी धोरण तयार करण्यासाठी तज्ञांची समिती. पुणे बातम्या

पुणे : अधिक स्वायत्तता आणि गती मिळावी यासाठी विनाअनुदानित सरकारी महाविद्यालयांचे खाजगी विद्यापीठांमध्ये रूपांतर करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्यासाठी महाराष्ट्र उच्च व तंत्रशिक्षण विभागाने...

पुण्यात रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर, रुळावरून घसरल्याच्या चौकशी अहवालाला महिनाभर लागू शकतो. पुणे बातम्या

पुणे : सोमवारी सायंकाळी सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने २४ तासांच्या विस्कळीत झालेल्या पुणे रेल्वे स्थानकावरील रेल्वे वाहतूक बुधवारी पूर्वपदावर आली.रुळावरून घसरलेला वंदे...

वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने रावेत, किवळे रहिवासी, नगरसेवक महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेटले. पुणे बातम्या

पुणे : रावेत आणि किवळे येथील रहिवाशांनी स्थानिक नगरसेविका ऐश्वर्या तरस यांच्यासह बुधवारी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण कंपनी लिमिटेड) च्या अधिकाऱ्यांची...

पुण्यातील जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरीन वायूची गळती; 24 रूग्णालयात दाखल पुणे न्यूज

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात गुरुवारी क्लोरीन वायू गळती झाल्याने २४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी...

चांगल्या नफ्यासाठी ऑनलाइन शेअर-ट्रेडिंगचे आमिष टेकनी 2.3cr | पुणे बातम्या

पुणे: हडपसरजवळील शेवाळवाडी येथील एका ३६ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंत्याने २६ जानेवारी ते ११ मार्चदरम्यान ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग घोटाळ्यात जास्त परताव्याच्या आमिषाला बळी पडून २.३ कोटी...

error: Content is protected !!