Homeताज्या बातम्याथेऊर येथे ट्रकने दिलेल्या धडकेत 9 दुचाकींचा चक्काचूर; ट्रक चालकावर गुन्हा दाखल

थेऊर येथे ट्रकने दिलेल्या धडकेत 9 दुचाकींचा चक्काचूर; ट्रक चालकावर गुन्हा दाखल

थेऊर येथे ट्रकने दिलेल्या धडकेत 9 दुचाकींचा चक्काचूर; ट्रक चालकावर गुन्हा दाखल

थेऊर

कोलवडी रस्त्यावर ट्रकने 9 दुचाकींना धडक दिल्याची घटना घडली आहे. ही घटना थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमीजवळ बुधवारी (ता. 26) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही
जीवितहानी झालेली नाही परंतु, 9 दुचाकींचा चक्काचूर झाला आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.श्रीराम संतराम वरपे (वय 25, रा. कोरडेवाडी, पोस्ट विदा, जिल्हा बिड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. याप्रकरणी अजय मनोहर पवार (वय 33, रा. पाण्याच्या टाकी शेजारी थेऊर ता. हवेली जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजय पवार हे थेऊर येथील एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी गेले होते. पवार यांनी थेऊर स्मशानभुमीच्या बाहेर थेऊर ते कोलवडी रस्त्याच्या कडेला दुचाकी पार्क केली होती. तसेच गावातील इतर नागरीकांनीही त्या ठिकाणी मोटार सायकली पार्क केल्या होत्या. तेवढ्यात स्मशान भूमीच्या बाहेर रोडवर जोरात गाड्या धडकल्याचा आवाज आला. त्यावेळी सर्वजण पळत स्मशानभुमीच्या बाहेर आले. तेव्हा कोलवडीकडून थेऊरकडे जाणाऱ्या मोठ्या ट्रकने दुचाकींना जोराची धडक दिली होती.दरम्यान, या अपघातात विजय पवार, विकास आण्णासो व्यवहारे व इतर 5 ते 6 जणांच्या मोटार सायकलींचा चक्काचूर झाला होता. ट्रकचालक श्रीराम वरपे याने त्याच्या ताब्यातील ट्रक हा वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करुन, ट्रक भरधाव वेगाने चालवून तसेच इतरांच्या जीवीतास धोका निर्माण होईल अशा रितीने वाहन चालवून 9 मोटार सायकलींना धडक देऊन या अपघातास व वाहनांच्या नुकसाणीस कारणीभूत ठरला आहे.लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ट्रकचालक श्रीराम वरपे याच्यावर भारतीय न्याय संहिता 281,324 (4),324 (5) व मोटार वाहन अधिनियम 184,119 व 177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बारगजे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विश्रामबाग पोलीस स्टेशनची मोठी कारवाई: १० लाख रुपये किंमतीच्या १४ मोटार सायकली हस्तगत

​पुणे शहरातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने विधीसंघर्षीत बालक आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पुणे व इतर ठिकाणांहून चोरी केलेल्या एकूण १० लाख...

आंबेगाव पोलीस स्टेशनची धडक कारवाई: गोळीबार करणाऱ्या रेकॉर्डवरील पाच गुन्हेगार जेरबंद; तीन गावठी पिस्टल...

पुणे शहरात आंबेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या वादातून फिर्यादीच्या मुलावर गोळीबार करून पसार झालेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि आंबेगाव...

पुणे महानगरपालिका सफाई कर्मचारी कारवाईत भेदभाव प्रकरण: युवक काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

​पुणे: पुणे महानगरपालिकेच्या परिमंडळ क्रमांक ५ चे उपायुक्त माधव जगताप यांच्या मनमानी आणि भेदभावयुक्त कारभाराविरुद्ध युवक काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिस्तीच्या नावाखाली गरीब...

मुंढवा पोलिसांची धडक कारवाई: १,३०,०००/- रुपये किमतीच्या दोन चोरीच्या रिक्षा जप्त; एक आरोपी अटकेत

​पुणे: मुंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवत चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला आहे. मुंढवा पोलीस...

१०० पेक्षा अधिक वाहन चोरीचे गुन्हे करणारा २ वर्षांपासून पाहिजे असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद

​पुणे: पुणे शहरात गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबतच्या उपाययोजना व गुन्ह्यातील पाहिजे व फरार आरोपींचा गुन्हे शाखा युनिट २ मधील पोलीस अधिकारी व अंमलदार विशेष मोहिमे...

error: Content is protected !!