Homeताज्या बातम्यानगर मनमाड राज्य मार्गाने घेतला आणखी एका तरुणा चा बळी

नगर मनमाड राज्य मार्गाने घेतला आणखी एका तरुणा चा बळी

क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज संपादक शिवाजी दवणे 9730170965
राहुरी शहर हद्दीत नगर मनमाड राज्य महामार्गावर आज दि. १० ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत एका तीस वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची घटना उघडकीस आली. राज्य महामार्ग आणखी किती बळी घेणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.
असलम बशीर सय्यद हा ३१ वर्षीय विवाहित तरुण राहुरी शहरातील तनपूरेवाडी रोड, महाल टेकडी येथील रहिवाशी असून तो सध्या राहुरी फॅक्टरी येथे राहत होता. तो विद्यापीठ येथील एका फळ विक्रेत्याकडे चालक म्हणून काम करत होता. असलम सय्यद हा आज दि. १० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ८.१५ वाजे दरम्यान राहुरी फॅक्टरी येथुन विद्यापीठकडे त्याच्या वाहनावर जात होता. त्यावेळी राहुरी शहर हद्दीतील सुतगिरणी परिसरात असलेल्या साई शिवराम पेट्रोल पंपाजवळ त्याच्या वाहनाला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या धडकेत असलम सय्यद याच्या डोक्याला जबर मार लागून तो जागीच ठार झाला. रवींद्र देवगीरे यांनी त्याला रुग्णवाहिकेतून तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकारी प्रवीण शिरसागर यांनी त्याला तपासुन उपचारापूर्वीच मयत घोषित केले. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय नवले यांनी पंचनामा केल्या नंतर मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले. या प्रसंगी पत्रकार अयुब पठाण, इस्माईल सय्यद, रफिक शेख, रियाज देशमुख, सलिम शेख, अमजद पठाण, दिपक रकटे, इम्रान खान आदिसह अनेकजण उपस्थित होते.
असलम सय्यद याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे त्याच्या अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. नगर मनमाड राज्य महामार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्याचे अत्यंत धिम्या गतीने व निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे. ठिकठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक सुरु आहे. त्यामुळे सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बनावट खाती (म्युअल अकाऊंट) उघडून १ कोटी ८० लाखांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ५...

​पुणे: महाराष्ट्र सायबर मुंबई यांचेकडून मनी ट्रेल, म्युअल बँक अकाऊंट तसेच चेक एटीएम विड्रालच्या फसवणुकीच्या तक्रारींची डेटा माहिती प्राप्त झाल्यामुळे, वानवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर...

. दुःखाच्या प्रसंगी धावली ‘रुग्ण हक्क संघर्ष समिती’; मोशीतील मृत महिलेचे संपूर्ण हॉस्पिटल बिल...

पुणे/पिंपरी-चिंचवड: मोशी येथील धनश्री हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मयत झालेल्या प्रतिभा बळीराम बोतकूलवार यांच्या कुटुंबीयांना 'रुग्ण हक्क संघर्ष समिती'च्या तत्पर मध्यस्थीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. हॉस्पिटल प्रशासनाने...

लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त शिवसेना प्रभाग क्रमांक २७च्या वतीने अभिवादन

पुणे : भारताचे माजी पंतप्रधान आणि स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेले लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना प्रभाग क्रमांक २७च्या वतीने त्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात...

वानवडीत रिक्षाला धडक देऊन अल्पवयीन शाळकरी मुलींसह रिक्षाचालकाला जखमी करणाऱ्या कारचालकावर गुन्हा दाखल

पुणे: पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रॉन्ग साईडने भरधाव वेगात येऊन शाळकरी मुलींच्या रिक्षाला धडक देणाऱ्या चारचाकी वाहनाविरोधात वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या...

error: Content is protected !!