Homeताज्या बातम्या​पुणे पोलिसांची मोठी कारवाई: कुख्यात निलेश घायवळ टोळीतील मोक्का आणि मर्डर गुन्ह्यातील...

​पुणे पोलिसांची मोठी कारवाई: कुख्यात निलेश घायवळ टोळीतील मोक्का आणि मर्डर गुन्ह्यातील फरार गुंड कोथरूडमधून जेरबंद

पुणे, २५ जून २०२६:
पुणे शहर पोलिसांच्या कोथरूड पोलीस ठाण्यातील तपास पथकाने धडक कारवाई करत कुख्यात निलेश घायवळ टोळीतील एका सराईत आणि पाहिजे असलेल्या गुंडाला अटक केली आहे. निलेश उर्फ चांग्या हरिशंकर शर्मा (वय ३८ वर्षे, रा. गुजरात कॉलनी, आदर्श मित्र मंडळाजवळ, वृंदावन सोसायटी, कोथरूड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर मोक्का (MCOCA) आणि मर्डर (खुनाचा गुन्हा) यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असून तो बऱ्याच काळापासून पोलीस यंत्रणेला गुंगारा देत फरार होता.
​सुतार हॉस्पिटल जवळील मंडईत सापळा
​मिळालेल्या माहितीनुसार, २४ जून २०२६ रोजी कोथरूड पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे प्रमुख पोलीस उप-निरीक्षक मोहन चव्हाण व त्यांचे अंमलदार पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. पेट्रोलिंग दरम्यान पोलीस अंमलदार विष्णू राठोड, आकाश वाल्मिकी आणि वैभव शितकाल यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून अत्यंत खात्रीशीर माहिती मिळाली की, निलेश घायवळ टोळीतील फरार आरोपी निलेश उर्फ चांग्या हरिशंकर शर्मा हा सुतार हॉस्पिटल येथील मंडईमध्ये संशयास्पद रित्या बसलेला आहे.
​मिळालेल्या गुप्त बातमीच्या अनुषंगाने, कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरुण घोडके यांच्या आदेशान्वये तपास पथकाने तातडीने सुतार हॉस्पिटल आणि मंडई परिसरात वेढा घातला. पोलिसांनी अत्यंत शिताफीने व नियोजनबद्ध रीतीने सापळा रचून आरोपी निलेश उर्फ चांग्या शर्मा याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली, त्यानंतर त्याला रीतसर अटक करण्यात आली.
​भयानक गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि लागलेली कलमे
​अटक करण्यात आलेला गुंड निलेश उर्फ चांग्या शर्मा हा अत्यंत गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला आरोपी होता. त्याच्यावर पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात गंभीर गुन्हे नोंद आहेत:
१) कोथरूड पोलीस स्टेशन (गु.र.नं. २७७/२०२५): या गुन्ह्या अंतर्गत त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १११ (२) [संघटित गुन्हेगारी], १८९(१), १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ३२९ (४), ३०८(२), ३०८(४), ३०८(५), ३५२, ३५१(२)(३), २९६ सह आर्म अॅक्ट कलम ३ (२५), तसेच क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ३, ७ आणि अत्यंत कडक मानला जाणारा मोक्का (MCOCA) कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे.
२) जामखेड पोलीस स्टेशन (अहमदनगर) (गु.र.नं. १२२/२०२६): जामखेड येथील मर्डर (खून) प्रकरणातही तो मुख्य पाहिजे असलेला आरोपी होता. या प्रकरणी त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३ (१), १०३ (२), ३ (५) [मर्डर/खून] अन्वये गुन्हा नोंद आहे.
​वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कामगिरी
​सदरची अत्यंत कौतुकास्पद व धडक कारवाई पुणे शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पूर्ण झाली. यामध्ये मा. अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर) श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उपायुक्त (परिमंडळ ३, पुणे शहर) श्री. सागर कवडे, आणि मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (कोथरूड विभाग, पुणे शहर) श्रीमती सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाचा समावेश होता.
​तसेच, कोथरूड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरुण घोडके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. अनिल माने, आणि श्री. सुनील कारोटे यांच्या थेट सूचना व नियोजनानुसार या कारवाईला यश आले.
​तपास पथकातील शूर अंमलदार
​कुख्यात टोळीच्या गुंडाला बेड्या ठोकणाऱ्या प्रत्यक्ष कारवाईत तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक मोहन चव्हाण, पोलीस अंमलदार विष्णू राठोड, आकाश वाल्मिकी, वैभव शितकाल, मंगेश शेळके, मयुर पांढरे, श्रीकांत दगडे आणि दत्ता सोनवणे यांनी महत्त्वाची व शौर्याची भूमिका बजावली.
​पुढील तपास:
सदर गुन्ह्याचा आणि आरोपीचा पुढील सविस्तर तपास मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (कोथरूड विभाग) श्रीमती सुजाता तानवडे या स्वतः करत आहेत. या धडक कारवाईमुळे कोथरूड परिसर आणि गुन्हेगारी जगतात पोलिसांचा मोठा दबदबा निर्माण झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘हॅपी बर्थडे’ स्क्रीन, केक आणि नाईट क्लब सेलिब्रेशन: केतन अग्रवाल मृत्यूच्या चौकशीदरम्यान सिया गोयलचा...

तिचा मंगेतर केतन अग्रवालच्या मृत्यूच्या तपासादरम्यान खुनाची आरोपी सिया गोयल तिचा वाढदिवस एका नाईट क्लबमध्ये साजरा करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे (एआयसह वर्धित)...

तज्ञांनी प्रोबायोटिक्स, आतड्यांवरील उपचारांचा विज्ञान-आधारित वापर करण्याचे आवाहन केले आहे. पुणे बातम्या

किण्वन आणि मायक्रोबायोम थेरप्यूटिक्स कॉन्फरन्समधील उपस्थित पुणे : आरोग्यसेवेचे भवितव्य केवळ रोगावर उपचार करण्यामध्ये नाही तर मानवी आतड्यांसंबंधीच्या परिसंस्थेचे सखोल ज्ञान आणि प्रोबायोटिक्सच्या...

गद्दार खासदारांविरोधात शिवसेना पुणे आक्रमक; रस्ता पेठेत तिरडी आंदोलनाने परिसर दणाणला

पुणे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मशाल चिन्हावर निवडून आलेल्या सहा फुटीर खासदारांनी जनादेशाशी आणि शिवसैनिकांच्या भावनांशी केलेल्या विश्वासघाताच्या निषेधार्थ शिवसेना पुणे शहराच्या कंटोनमेंट...

केतन अग्रवाल खून प्रकरण: महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी सरकारला एसआयटी स्थापन करण्यास सांगितले. पुणे बातम्या

महाराष्ट्र विधानसभेचे पीठासीन अधिकारी राजू खरे यांनी गुरुवारी राज्य सरकारला पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन...

लोहगड किल्ला हत्याकांड: केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर ‘प्रेमी’ सिया गोयल-चेतन चौधरी आता एकमेकांकडे बोटे दाखवत...

केतन अग्रवाल (आर), सिया गोयल (सी), चेतन चौधरी (एल) पुणे: पुण्याचे रिअल इस्टेट संचालक केतन अग्रवाल यांना लोहगड किल्ल्यावरून कथितरित्या त्याच्या मृत्यूस ढकलल्यानंतर,...

error: Content is protected !!