पुणे | प्रतिनिधी
पुणे शहरात भविष्यात मोठा वैमानिक अपघात घडू शकतो अशी घोडचूक पुणे मनपा प्रशासनाकडून करण्यात येत आहे,
पुणे शहरातील बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. अनधिकृत आणि बनावट ATC एयर ट्रॅफिक कंट्रोल परवानग्यांच्या आधारे अनेक उंच इमारतींना मंजुरी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, यामुळे केवळ पुणे महानगरपालिकेची फसवणूक झाली नाही, तर देशाच्या सुरक्षेलाही संभाव्य धोका निर्माण झाल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे नेते स्व अजितदादा पवार यांचा विमान अपघात प्रकरण ताजेच असताना प्रशासनाने काळजी घेणे गरजेचे आहे. 
तक्रारदार अनंत घरत (शिवसेना, पुणे शहर प्रसिद्धी प्रमुख) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १७ नोव्हेंबर २०२० रोजी एयर ट्रॅफिक कंट्रोल कार्यालय लोहगाव यांकडून मिळालेल्या पत्राचा नुसार पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पी एम आर डी ए हद्दीतील अनेक बांधकामांना उंचीबाबत मंजुरी देण्यात आली परवानगी ही रद्द

समजण्यात यावी असे पत्र प्रशासनाला प्राप्त झालं आहे, त्यानुसार माहिती घेतली असता बिबेवाडी येथील १३ ऑगस्ट ची परवानगी तसेच आंबेगाव येथील ०३ मार्च २०२० ची परवानगी ही परवानगी संरक्षण मंत्रालयाकडून वैध नसून ती बनावट असल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे यावर प्रशासनाने माहिती घेतली असता गुजरात गांधीनगर येथील मुख्य कार्यालयातून ८ ऑगस्ट २०२० च्या पत्रानुसार आंबेगाव येथील परवानगी खोटी असल्याचे कळविण्यात आले आहे, यावरून हे सर्व त्याकाळात परवानग्या खोट्या लावून मोठी फसवणूक झाली असल्याचे समोर आले आहे, आणि आजही हा प्रकार सुरू असू शकतो त्यामुळे आयुक्तांनी तत्पर या विषयात लक्ष घालावे. 

विशेष म्हणजे बिबवेवाडी, सिंहगड रोड, आंबेगाव परिसरात अशा परवानग्यांच्या आधारे मोठ्या प्रमाणात बांधकामांना मंजुरी देण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात संबंधित विकासक, आर्किटेक्ट तसेच पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचा संगनमत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
या गंभीर प्रकरणाबाबत पुणे महानगरपालिका आयुक्त आणि मुख्य अभियंता (बांधकाम) यांच्याकडे दिनांक ६ एप्रिल २०२६ ला लेखी तक्रार देऊनही अनेक दिवस उलटून गेले असताना कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
तक्रारदार अनंत घरत म्हणाले:
“एयर ट्रॅफिक कंट्रोलची परवानगी ही विमान वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची असते. खोट्या परवानग्यांच्या आधारे उंच इमारतींना मंजुरी देणे म्हणजे थेट देशाच्या सुरक्षेशी खेळण्यासारखे आहे. पुण्याच्या आसपास NDA, दारुगोळा कारखाने, मिलेटरी शी संबंधित अनेक कार्यालये, यांसारखी संवेदनशील लष्करी ठिकाणे आहेत. त्यामुळे या प्रकरणात तातडीने चौकशी होणे अत्यावश्यक आहे.” अन्यथा शिवसेना सदर प्रकरणात आक्रमक भूमिका घेईल.
तसेच, त्यांनी पुण्याचे खासदार व केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणात तत्पर लक्ष घालून चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे.
या प्रकरणात खालीलप्रमाणे तातडीच्या कारवाईची मागणी करण्यात आली आहे:
• उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून संपूर्ण प्रकरणाची चौकशी
• बनावट ATC परवानगी सादर करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल
• भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा व IPC अंतर्गत कारवाई
• अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई (सील/पाडकाम)
• संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई
“जर या प्रकरणात तात्काळ आणि ठोस कारवाई झाली नाही, तर शिवसेना शैलीत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा देखील तक्रारदारांनी दिला आहे.
पुणे शहरातील बांधकाम क्षेत्रात सुरू असलेल्या या कथित गैरप्रकारामुळे प्रशासन, कायदा व्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. आता प्रशासन यावर कितपत तत्परतेने कारवाई करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,





















