Homeताज्या बातम्यापुणे हिंजवडी २७ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता तरुणीचा प्रेम संशयातून प्रियकराकडून खून!

पुणे हिंजवडी २७ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता तरुणीचा प्रेम संशयातून प्रियकराकडून खून!

पुणे हिंजवडी २७ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता तरुणीचा प्रेम संशयातून प्रियकराकडून खून!

पुणे; दि. २४ (शशिकांत पाटोळे) : पुण्याच्या आयटी नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. प्रेमातील संशयाच्या जाळ्याने एका २७ वर्षीय उच्चशिक्षित आयटी अभियंता तरुणीचा बळी घेतला आहे. हिंजवडीतील एका नामांकित आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या कोमल राजेंद्र डहाके हिचा तिच्याच प्रियकराने केलेल्या अमानुष मारहाणीत दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आरोपी प्रियकर शुभम ज्ञानेश्वर काळबांडे याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

*संशयाने नात्यात विष कालवले..*
मूळची वर्ध्याची असलेली कोमल आणि परभणीचा शुभम यांची चार वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर आधी मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. कोमललाही हिंजवडीत नोकरी मिळाल्यानंतर दोघेही एकाच खासगी हॉस्टेलमध्ये वेगवेगळ्या रूमवर राहू लागले होते.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यात संशयाने विष कालवले होते. शुभमचे दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याचा संशय कोमलला होता आणि याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते.

*अमानुष मारहाणीत गेला जीव..*
रात्रीच्या दरम्यान शुभम कोमलच्या रूमवर आला होता. यावेळी पुन्हा जुन्याच कारणावरून दोघांमध्ये जोरदार वाद पेटला. वाद इतका विकोपाला गेला की संतापलेल्या शुभमने कोमलला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली, तिला जोरात धक्के दिले आणि दोघांमध्ये झटापट झाली. या अमानुष मारहाणीनंतर दोघेही तिथेच झोपी गेले, मात्र गंभीर मारहाणीमुळे कोमलचा मृत्यू झाला होता.

कोमलचा फोन बंद येत असल्याने काळजीपोटी तिच्या आईने पुण्यात राहणाऱ्या भाच्याला पीजीवर चौकशीसाठी पाठवले. सोमवारी (२३ नोव्हेंबर) सकाळी भाच्याने रूमचा दरवाजा ठोठावला असता आतून शुभमने दार उघडले. कोमलला उठवण्याचा प्रयत्न केला असता ती मृतावस्थेत आढळून आली.

घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि आरोपी शुभम काळबांडे याला अटक केली. उच्चशिक्षित प्रियकराच्या या क्रूर कृत्यामुळे पुण्याच्या आयटी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रॅपिडोवर (RTO) ची कडक कारवाई; बाईक टॅक्सी सेवा बंद करण्याचे आदेश!

रॅपिडोवर (RTO) ची कडक कारवाई; बाईक टॅक्सी सेवा बंद करण्याचे आदेश! पुणे; दि. २४ (शशिकांत पाटोळे) : पुण्यात वैध बाईक टॅक्सी...

राज्यस्तरीय मास्टर्स गेम्समध्ये वडगाव पाटोळेच्या चैताली पाटोळे यांची सुवर्णमय कामगिरी! नाशिक येथे पार पडलेल्या...

राज्यस्तरीय मास्टर्स गेम्समध्ये वडगाव पाटोळेच्या चैताली पाटोळे यांची सुवर्णमय कामगिरी! नाशिक येथे पार पडलेल्या स्पर्धेत पटकावली दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदके; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव राजगुरूनगर;...

कोंढव्यात पहाटे पार्किंगमधील वाहनांना आग; १८ वाहने जळून खाक

कोंढव्यात पहाटे पार्किंगमधील वाहनांना आग; १८ वाहने जळून खाक पुणे; दि. २२ (शशिकांत पाटोळे) : पुण्यातील कोंढवा परिसरातील भाग्योदय नगर येथील गल्ली क्रमांक ३४ मधील...

सिंहगडावर भरणार हवेली पंचायत समितीची मासिक सभा हवेलीच्या विकासप्रश्नांवर होणार चर्चा

सिंहगडावर भरणार हवेली पंचायत समितीची मासिक सभा हवेलीच्या विकासप्रश्नांवर होणार चर्चा पुणे | हवेली तालुका प्रतिनिधी. प्रसाद सोनवणे. पंचायत समितीच्या मासिक सभांचे ठरलेले ठिकाण बदलत हवेली पंचायत समितीची...

बेकायदा देशी दारू विकणाऱ्या तरुणावर पुणे गुन्हे शाखेची कारवाई; ७,४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त

बेकायदा देशी दारू विकणाऱ्या तरुणावर पुणे गुन्हे शाखेची कारवाई; ७,४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त ​पुणे: शहरातील गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे...

error: Content is protected !!