पुणे : युवक-युवतींसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण व नोकरीची सुवर्णसंधी; अविनाश बागवे यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे शहरात युवक व युवतींसाठी रोजगाराभिमुख तांत्रिक कौशल्य प्रशिक्षण उपक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
पुणे शहर यांच्या वतीने “सुवर्णसंधी” या नावाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून युवक-युवतींना मोफत प्रशिक्षणासोबत हमखास नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
या उपक्रमाचे प्रमुख आयोजक दिलशाद जुबेर शेख, जुबेर बाबू शेख व परवीन तांबोळी असून, वर्षा लांडे, तस्लीम शेख, काशिफ शेख, पंजेतन पवित्र संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा श्री हनिफभाई शेख
क्राईम महाराष्ट्र न्यूजचे संपादक श्री अमिरभाई शेख तसेच महिला कार्यकर्त्या व स्थानिक पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
या प्रशिक्षणामध्ये इलेक्ट्रिकल मेकॅनिक, सोलार पॅनल इंस्टॉलेशन, एसी व रेफ्रिजरेटर मेकॅनिक, पीसीबी असेंबली ऑपरेटर तसेच कॉम्प्युटर हार्डवेअर टेक्निशियन असे विविध तांत्रिक कोर्सेस समाविष्ट आहेत. प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असून प्रॅक्टिकल आधारित मार्गदर्शन दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या उपक्रमासाठी किमान १० वी उत्तीर्ण युवक-युवती पात्र असून वयोगट १८ ते ४० वर्षे आहे. प्रशिक्षण कालावधी ३ महिने (दररोज ३ तास) असा आहे.
कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि. १९ एप्रिल २०२६ ते मंगळवार दि. २१ एप्रिल २०२६ दरम्यान, सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत करण्यात आले आहे. स्थळ – जुबेर बाबू शेख जनसंपर्क कार्यालय, काशीदवाडी, भवानी पेठ, पुणे – ४२.
नोंदणीसाठी संपर्क क्रमांक – 88883 65586 / 96048 95606 / 77748 05786 / 93220 99560.
इच्छुक युवक-युवतींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























