Homeताज्या बातम्यामनपा इमारतींमध्ये अग्निसुरक्षा धोक्यात, अग्निशमन विभागाचे धक्कादायक पत्र

मनपा इमारतींमध्ये अग्निसुरक्षा धोक्यात, अग्निशमन विभागाचे धक्कादायक पत्र

पुणे महानगरपालिकेच्या इमारतींतील अग्निशमन यंत्रणा अद्याप अपूर्ण
नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

पुणे महानगरपालिकेच्या सावकर भवन, शिक्षण मंडळ, मुख्य इमारत तसेच इतर विविध ठिकाणी असलेल्या महानगरपालिकेच्या इमारतींमधील अग्निशमन यंत्रणांची (Fire Fighting System) स्थिती गंभीर असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात मुख्य अग्निशमन अधिकारी, पुणे महानगरपालिका यांनी विद्युत विभागास अधिकृत पत्राद्वारे सूचित केले आहे.
या पत्रानुसार, पुणे महानगरपालिकेच्या अखत्यारीतील अनेक इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा अस्तित्वात असल्या तरी त्या कार्यरत नसल्याचे आढळून आले आहे. यापूर्वी देखील दोन वेळा अग्निशमन विभागाकडून फॉर्म ‘बी’ सादर करण्याची सूचना देण्यात आली होती. मात्र, आवश्यक दुरुस्ती, देखभाल व अद्ययावत यंत्रणा बसविण्याबाबत ठोस कार्यवाही झालेली नाही.
अग्निशमन विभागाने स्पष्टपणे नमूद केले आहे की,
सर्व मनपा इमारतींतील अग्निशमन यंत्रणांची तातडीने तपासणी करणे आवश्यक आहे.
आवश्यकतेनुसार नवीन यंत्रणा बसवणे किंवा जुन्या यंत्रणांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
यासाठी विद्युत विभागामार्फत आवश्यक निविदा प्रक्रिया राबविणे अपेक्षित आहे.
सर्व काम पूर्ण झाल्यानंतर अग्निशमन यंत्रणेचा तपशीलवार अहवाल अग्निशमन विभाग व भवन रचना विभागास सादर करणे बंधनकारक आहे.
महत्त्वाचे म्हणजे, सध्या अग्निशमन विभागाकडे नवीन यंत्रणा बसविण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद उपलब्ध नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी आपापल्या स्तरावर निधी उपलब्ध करून देत महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक व जीवितरक्षक उपाययोजना अधिनियम 2006 अंतर्गत नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
दरम्यान, महानगरपालिकेच्या महत्त्वाच्या प्रशासकीय इमारतींमध्येच अग्निसुरक्षा व्यवस्था अपुरी असल्याचे उघड झाल्याने कर्मचारी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा सवालही उपस्थित होत आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने तातडीने सर्व इमारतींमधील अग्निशमन यंत्रणांची तपासणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

युनिट-३ गुन्हे शाखा, पुणे शहरची मोठी कारवाई: गावठी पिस्टल व काडतुसांसह दोन सराईत आरोपी...

पुणे, दिनांक २२ सप्टेंबर २०२६: पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-३ ने गस्तीदरम्यान मोठी कारवाई करत अवैधरित्या बाळगलेले गावठी पिस्टल, जिवंत काडतुसे आणि दुचाकीसह दोन जणांना...

गणेशोत्सवात दहशत माजविणाऱ्या धारधार कोयता बाळगणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखेच्या युनिट-१ कडून जेरबंद

पुणे: पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने गणेशोत्सवामध्ये लोखंडी हत्यार घेऊन दहशत माजविणाऱ्या एका आरोपीस ताब्यात घेतले आहे. ही कारवाई हुजुरपागा शाळेसमोर, सार्वजनिक रोडवर,...

गणेशोत्सवात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची येरवडा पोलीस ठाण्याला भेट | नागरिकांशी मनमोकळा संवाद

गणेशोत्सवात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची येरवडा पोलीस ठाण्याला सदिच्छा भेट; रात्री ११ वाजता नागरिकांशी साधला मनमोकळा संवाद पुणे, दि. १९ सप्टेंबर २०२६ : गणेशोत्सवाच्या...

पुणे पोलिसांच्या ‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत मोठी कारवाई; चंदननगर हद्दीतून २ गावठी पिस्टल व जिवंत...

​पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपायुक्त, परिमंडळ-७ यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या 'मिशन क्रॅकडाऊन' मोहिमेत पोलिसांना मोठे यश आले आहे. चंदननगर पोलीस...

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या तब्बल २६ जणांवर मुंढवा पोलिसांची कायदेशीर कारवाई

पुणे: पुण्यातील मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या एकूण २६ जणांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. ​सप्टेंबर महिन्यामध्ये सोशल मीडियावरील ‘इन्स्टाग्राम’ (Instagram) माध्यमातून मुंढवा...

error: Content is protected !!