Homeताज्या बातम्यामाँ एज्युकेशन अ‍ॅण्ड स्पोर्ट्स सोशल फाउंडेशनच्या खेळाडूंचा दणदणीत पराक्रम; १५ खेळाडूंनी जिंकली...

माँ एज्युकेशन अ‍ॅण्ड स्पोर्ट्स सोशल फाउंडेशनच्या खेळाडूंचा दणदणीत पराक्रम; १५ खेळाडूंनी जिंकली तब्बल २५ पदके!

पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या गोल्ड बेल्ट कराटे चॅम्पियनशिप २०२६-२७ स्पर्धेत माँ एज्युकेशन अ‍ॅण्ड स्पोर्ट्स सोशल फाउंडेशन आणि आत्मरक्षा युद्ध कलाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. अवघ्या १५ खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेत एकूण २५ पदके (१२ सुवर्ण, ७ रौप्य, ६ कांस्य) पटकावत मोठे यश मिळवले.
या स्पर्धेत खेळाडूंनी काता आणि कुमिते या दोन्ही प्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. विशेष म्हणजे अनेक खेळाडूंनी एकाच स्पर्धेत दोन पदके जिंकत अष्टपैलू कामगिरी साकारली.
🌟 डबल मेडलिस्ट खेळाडू (सुवर्ण मानकरी):
कुमितेमध्ये सुवर्ण आणि कातामध्ये रौप्य पदक मिळवणारे खेळाडू:
प्रिया जाधव, रुद्र नेटके, आरती गायकवाड, नक्षत्रा सरतापे, स्वामिनी पाटील, साई अडागळे, गौरी देवकर
कातामध्ये सुवर्ण आणि कुमितेमध्ये पदक मिळवणारे:
जोतिबा बनसोडे (रौप्य), प्रज्ञा दारवटकर (कांस्य)
कुमितेमध्ये सुवर्ण आणि कातामध्ये कांस्य पदक मिळवणारे:
आदित्य कांबळे, शाहिद शेख, यश खंडाळे, पृथ्वीराज गायकवाड, श्रुतिका पाटील
तसेच साई मिसाळ यांनी कुमिते प्रकारात सुवर्ण पदक पटकावले.
या सर्व खेळाडूंना संस्थेचे संस्थापक व मुख्य प्रशिक्षक मोहित सुरजित सेटिया यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी शिस्त, आत्मविश्वास आणि कठोर सरावाच्या जोरावर ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली.
या यशाबद्दल बोलताना मोहित सेटिया म्हणाले,
“मैदानात घाम गाळणाऱ्या या मुलांच्या डोळ्यात मला उद्याचे आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्स दिसत आहेत. पालकांचा विश्वास आणि मुलांची मेहनत यामुळेच हे यश शक्य झाले आहे. आत्मरक्षा युद्ध कलेच्या माध्यमातून मुलांमध्ये आत्मविश्वास आणि शिस्त निर्माण करणे हेच आमचे ध्येय आहे.”
या दिमाखदार यशामुळे सर्व स्तरांतून खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भविष्यातही अशीच उल्लेखनीय कामगिरी करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महिना उलटला, मंत्र्याने कृषी विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केली. पुणे बातम्या

पुणे : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना पत्र लिहून 14 मार्च रोजी मृत्यू झालेल्या कृषी...

PAT पेपर लीक झाल्यानंतर SCERT ने 6 ऑनलाइन चॅनलविरोधात तक्रार दाखल केली. पुणे बातम्या

पुणे : परीक्षेपूर्वी सोशल मीडियावर नियतकालिक मूल्यांकन चाचणी (पीएटी) III च्या प्रश्नपत्रिका प्रसारित केल्याच्या आरोपावरून व्हिडिओ-सामायिकरण प्लॅटफॉर्मवर सहा चॅनेलच्या संचालकांविरुद्ध मंगळवारी गुन्हा...

पीएमसीच्या १३ प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद भाजपकडे; राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे....

पुणे: जानेवारी महिन्यात झालेल्या पीएमसी निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून भाजपने 15 पैकी 13 प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद मिळवून नागरी प्रशासनावरील आपले नियंत्रण आणखी...

पीसीएमसी मेट्रो स्थानकात फीडर बस सेवा सुरू; प्रवाशांना कामकाजात सातत्य हवे. पुणे बातम्या

पुणे: महा मेट्रो आणि PMPML ने PCMC मेट्रो स्टेशनपासून अनेक मार्गांवर फीडर बस सेवा सुरू केली आहे, ज्यामुळे शेवटच्या मैलाची कनेक्टिव्हिटी सुधारली आहे, आतापर्यंत...

हैदराबाद मॉडेलवर अवलंबून राहण्यासाठी पीएमसीचे ओव्हरहेड केबल्सचे धोरण. पुणे बातम्या

पुणे: शहरातील गोंधळलेल्या केबल नेटवर्कचे नियमन करण्यासाठी नागरी प्रशासनाने मंगळवारी मानक कार्यप्रणाली (SOP) तयार करण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की नागरी संस्थेने हैदराबादचे मॉडेल...

error: Content is protected !!