Homeताज्या बातम्याराहुरीत ३५ वर्षीय महिलेला फोनवरून अश्लील धमकी; गुन्हा दाखल

राहुरीत ३५ वर्षीय महिलेला फोनवरून अश्लील धमकी; गुन्हा दाखल

राहुरी (अहमदनगर) | क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
सहसंपादक – शिवाजी दवणे
मो. 9730170965
राहुरी शहर हद्दीत एका ३५ वर्षीय महिलेला मोबाईलवरून अश्लील व लैंगिक स्वरूपाची धमकी देत विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
काय आहे प्रकरण?
दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास पिडीत महिलेला ९६३७२८३३३३ या मोबाईल क्रमांकावरून फोन आला. आरोपीने महिलेची ओळख काढण्याच्या उद्देशाने “तू कोठे राहतेस?” अशी विचारणा करत तिचा पत्ता जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
यानंतर आरोपीने अत्यंत अश्लील, लैंगिक व अपमानास्पद भाषा वापरून महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे महिलेला मानसिक धक्का बसला असून तिने तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद नोंदवली.
गुन्हा दाखल
महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा रजि. नं. १३३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७८ व ७९ प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संबंधित मोबाईल क्रमांकधारकाचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदिप ठाणगे करीत आहेत. आरोपीचा मोबाईल नंबर कोणाच्या नावावर नोंदणीकृत आहे, याचा तपास सुरू असून लवकरच आरोपीचा माग काढला जाईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
महिलांनी सतर्क राहावे —
अशा प्रकारचे फोन कॉल आल्यास तत्काळ कॉल रेकॉर्ड, स्क्रीनशॉट जतन करून जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर सेलमध्ये तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोंढव्यात पहाटे पार्किंगमधील वाहनांना आग; १८ वाहने जळून खाक

कोंढव्यात पहाटे पार्किंगमधील वाहनांना आग; १८ वाहने जळून खाक पुणे; दि. २२ (शशिकांत पाटोळे) : पुण्यातील कोंढवा परिसरातील भाग्योदय नगर येथील गल्ली क्रमांक ३४ मधील...

सिंहगडावर भरणार हवेली पंचायत समितीची मासिक सभा हवेलीच्या विकासप्रश्नांवर होणार चर्चा

सिंहगडावर भरणार हवेली पंचायत समितीची मासिक सभा हवेलीच्या विकासप्रश्नांवर होणार चर्चा पुणे | हवेली तालुका प्रतिनिधी. प्रसाद सोनवणे. पंचायत समितीच्या मासिक सभांचे ठरलेले ठिकाण बदलत हवेली पंचायत समितीची...

बेकायदा देशी दारू विकणाऱ्या तरुणावर पुणे गुन्हे शाखेची कारवाई; ७,४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त

बेकायदा देशी दारू विकणाऱ्या तरुणावर पुणे गुन्हे शाखेची कारवाई; ७,४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त ​पुणे: शहरातील गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे...

दुकानांचे शटर उचकटून १० ठिकाणी चोरी करणारे सराईत दोन आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट...

दुकानांचे शटर उचकटून १० ठिकाणी चोरी करणारे सराईत दोन आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट १ ची कारवाई ​पुणे, दि. २१ नोव्हेंबर २०२६: पुणे शहरातील गुन्हे शाखा...

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त रक्तदात्यांचे शतक पार! शिवसेना-युवासेनेच्या रक्तदान शिबिरात १०७ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त रक्तदात्यांचे शतक पार! शिवसेना-युवासेनेच्या रक्तदान शिबिरात १०७ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान पुणे : हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना-युवासेना पुणे शहराच्या...

error: Content is protected !!