Homeताज्या बातम्यारॅपिडोवर (RTO) ची कडक कारवाई; बाईक टॅक्सी सेवा बंद करण्याचे आदेश!

रॅपिडोवर (RTO) ची कडक कारवाई; बाईक टॅक्सी सेवा बंद करण्याचे आदेश!

पुणे; दि. २४ (शशिकांत पाटोळे) : पुण्यात वैध बाईक टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर परवान्याशिवाय सेवा सुरू ठेवल्याप्रकरणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) रॅपिडोची बाईक टॅक्सी सेवा बंद करण्याचे आदेश दिले असून कंपनीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

आदेशानंतरही सेवा सुरू असल्याचे समोर आल्यानंतर पुणे आरटीओने २३ नोव्हेंबर २०२६ रोजी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात रॅपिडोविरोधात तक्रार नोंदवली आणि सेवा तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले.

पुणे जिल्हाधिकारी तथा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे (RTA) अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी ऑक्टोबर २०२६ मध्येच आवश्यक परवानगी मिळेपर्यंत विनापरवाना बाईक टॅक्सी सेवा बंद करण्याचे निर्देश दिले होते. रॅपिडोची मूळ कंपनी रॉपेन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेसवर वैध परवान्याशिवाय आणि खाजगी नोंदणी असलेल्या दुचाकींचा व्यावसायिक प्रवासी वाहतुकीसाठी वापर केल्याप्रकरणी यापूर्वीही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

परवान्याशिवाय सेवा सुरू असल्याने प्रवाशांची सुरक्षितता, चालक पडताळणी, विमा आणि तक्रार निवारण यंत्रणेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

रिक्षा व टॅक्सी संघटनांनी बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवेमुळे आपल्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचा आरोप करत आंदोलनाचा इशारा दिला होता. आरटीओच्या कठोर कारवाईच्या आश्वासनानंतर २३ नोव्हेंबर रोजी रिक्षाचालकांनी पुकारलेला बंद तात्पुरता मागे घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे हिंजवडी २७ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता तरुणीचा प्रेम संशयातून प्रियकराकडून खून!

पुणे हिंजवडी २७ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता तरुणीचा प्रेम संशयातून प्रियकराकडून खून! पुणे; दि. २४ (शशिकांत पाटोळे) : पुण्याच्या आयटी नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात...

राज्यस्तरीय मास्टर्स गेम्समध्ये वडगाव पाटोळेच्या चैताली पाटोळे यांची सुवर्णमय कामगिरी! नाशिक येथे पार पडलेल्या...

राज्यस्तरीय मास्टर्स गेम्समध्ये वडगाव पाटोळेच्या चैताली पाटोळे यांची सुवर्णमय कामगिरी! नाशिक येथे पार पडलेल्या स्पर्धेत पटकावली दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदके; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव राजगुरूनगर;...

कोंढव्यात पहाटे पार्किंगमधील वाहनांना आग; १८ वाहने जळून खाक

कोंढव्यात पहाटे पार्किंगमधील वाहनांना आग; १८ वाहने जळून खाक पुणे; दि. २२ (शशिकांत पाटोळे) : पुण्यातील कोंढवा परिसरातील भाग्योदय नगर येथील गल्ली क्रमांक ३४ मधील...

सिंहगडावर भरणार हवेली पंचायत समितीची मासिक सभा हवेलीच्या विकासप्रश्नांवर होणार चर्चा

सिंहगडावर भरणार हवेली पंचायत समितीची मासिक सभा हवेलीच्या विकासप्रश्नांवर होणार चर्चा पुणे | हवेली तालुका प्रतिनिधी. प्रसाद सोनवणे. पंचायत समितीच्या मासिक सभांचे ठरलेले ठिकाण बदलत हवेली पंचायत समितीची...

बेकायदा देशी दारू विकणाऱ्या तरुणावर पुणे गुन्हे शाखेची कारवाई; ७,४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त

बेकायदा देशी दारू विकणाऱ्या तरुणावर पुणे गुन्हे शाखेची कारवाई; ७,४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त ​पुणे: शहरातील गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे...

error: Content is protected !!