Homeताज्या बातम्याशांतिनगर–येरवडा परिसरात मुळा नदीत धार्मिक कचरा टाकण्यामुळे वाढते प्रदूषण; तातडीच्या उपाययोजनांची मागणी

शांतिनगर–येरवडा परिसरात मुळा नदीत धार्मिक कचरा टाकण्यामुळे वाढते प्रदूषण; तातडीच्या उपाययोजनांची मागणी

पुणे, दि. — शांतिनगर–येरवडा पुलाजवळील मुळा नदी परिसरात धार्मिक कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जात असल्यामुळे नदी प्रदूषणाची समस्या गंभीर होत चालल्याचे समोर आले आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ता व पुणे पँथर सेना अध्यक्ष सचिन भोसले यांनी प्रशासनाचे लक्ष वेधत तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे.
सदर भागात अनेक नागरिक नदीकाठी येऊन हार, फुले, अगरबत्ती, देवांचे फोटो, अन्नधान्य, चपाती, भाज्या तसेच इतर धार्मिक वस्तू थेट नदीत टाकत असल्याचे आढळून आले आहे. या प्रकारामुळे नदीचे पाणी प्रदूषित होत असून पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहेत. जलचर जीवांच्या अस्तित्वालाही धोका निर्माण झाला आहे, तसेच परिसरात दुर्गंधी व अस्वच्छता वाढत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नदीकाठची झाडे आणि पर्यावरणीय समतोलही धोक्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे पँथर संघटनेचे अध्यक्ष सचिन भोसले यांनी चिंता व्यक्त करत सांगितले की, “नद्या स्वच्छ ठेवण्यासाठी आणि पर्यावरण वाचवण्यासाठी आम्ही सातत्याने आंदोलन करत आहोत. मात्र नागरिकांमध्ये अद्याप अपेक्षित जनजागृती झालेली नाही. ती तातडीने वाढवणे गरजेचे आहे.”
ते पुढे म्हणाले, “जनजागृतीसोबतच योग्य पर्याय उपलब्ध करून देणेही अत्यंत आवश्यक आहे. नदीकाठी डस्टबिन आणि नर्माल्य संकलन केंद्र उभारण्यात आले, तर नागरिक धार्मिक कचरा योग्य ठिकाणी टाकतील आणि नदी प्रदूषण मोठ्या प्रमाणात टाळता येईल.”
सचिन भोसले यांनी नागरिकांना आवाहन करताना म्हटले की, “आपली नदी म्हणजे आपला जीव आहे. पुढील पिढीसाठी स्वच्छ पर्यावरण देणे ही आपली जबाबदारी आहे. धर्म जपत असताना पर्यावरणाचे रक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. दिल्लीसारख्या शहरांमध्ये प्रदूषणाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे; अशी वेळ पुण्यावर येऊ नये यासाठी आताच उपाययोजना करणे गरजेचे आहे.”
यासोबतच त्यांनी प्रशासनाकडे काही ठोस उपाययोजना सुचवल्या आहेत. त्यामध्ये नदीकाठी डस्टबिन व नर्माल्य संकलन केंद्र उभारणे, संकलित कचऱ्याचे कंपोस्टिंग किंवा योग्य विल्हेवाट लावणे, नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबवणे, पोस्टर-बॅनर व सोशल मीडियाद्वारे प्रचार करणे, कृत्रिम विसर्जन टाक्या उपलब्ध करून देणे, पर्यावरणपूरक धार्मिक साहित्याचा वापर वाढवणे तसेच संवेदनशील ठिकाणी देखरेख वाढवून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करणे यांचा समावेश आहे.
नदी व पर्यावरण संवर्धन ही केवळ प्रशासनाची नव्हे तर सर्व नागरिकांची सामूहिक जबाबदारी असल्याचे अधोरेखित करत सचिन भोसले यांनी सर्वांनी एकत्र येऊन पुण्यातील नद्या स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे पोलिसांची मोठी कारवाई: बंडगार्डन हद्दीतील सराईत वाहन चोरटा गुन्हे शाखेकडून जेरबंद; चोरीची अ‍ॅक्टिव्हा...

पुणे: बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहन चोरीचा गुन्हा करून पसार झालेल्या एका सराईत वाहन चोराला पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-३ ने मोठ्या शिताफीने अटक...

पोल्ट्री व्यवसाय आणि लग्नाच्या नावाने साडेतीन तोळे सोने लुबाडणारा २ वर्षांपासून फरार आरोपी नवी...

​पुणे: पोल्ट्री व्यवसायाचे आमिष दाखवून आणि घरगुती कार्यक्रमाचे कारण सांगून फिर्यादीच्या पत्नीचे साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे गंठण घेऊन त्याची मणप्पुरम गोल्ड लोनमध्ये परस्पर विल्हेवाट लावणारा आणि...

पुण्याच्या महिला अंध फुटबॉलपटूंची लवचिकता पडद्यावर पाहायला मिळते

पुणे : इयत्ता नववीत दीपाली कांबळे हिची दृष्टी गेली. तिने तिचे बहुतेक आयुष्य जवळजवळ आठ वर्षे घरामध्ये घालवले, भीती, एकटेपणा आणि नैराश्याने दबून. पुण्याच्या...

उष्मा, तहान, शांतता हा पुण्यातील पक्ष्यांसाठी धोकादायक हंगाम आहे

पुणे : काँक्रीटच्या इमारती, डांबरी रस्ते, दाट नागरी पायाभूत सुविधा आणि लुप्त होत चाललेले वृक्षतोड यामुळे पक्ष्यांना कडक उन्हाळ्यात जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.कबुतरे,...

“स्क्रॅच कार्डपासून मार्केटिंगपर्यंत” — डिजिटल पेमेंट कंपन्यांच्या भविष्यातील धोरणांवर सामाजिक कार्यकर्ते व पुणे पँथर...

“स्क्रॅच कार्डपासून मार्केटिंगपर्यंत” — डिजिटल पेमेंट कंपन्यांच्या भविष्यातील धोरणांवर सामाजिक कार्यकर्ते व पुणे पँथर सेना चे अध्यक्ष सचिन भोसले यांची शंका पुणे : अनेक वर्षांपूर्वी...

error: Content is protected !!