Homeताज्या बातम्यासंकष्टी चतुर्थी विशेष दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी – श्री चिंतामणी मंदिर परिसरात...

संकष्टी चतुर्थी विशेष दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी – श्री चिंतामणी मंदिर परिसरात दिवसभर उत्साही वातावरण

आज मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थीनिमित्त चिंचवड येथील श्री चिंतामणी देवस्थानात पहाटेपासून भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. श्रींच्या दर्शनासाठी पहाटेच रांगा लागल्या होत्या. पहाटे पुजारी महेश आगलावे यांच्या हस्ते विधिवत पूजा पार पडली.,

देवस्थानच्या वतीने श्री चिंतामणीची महापूजा संपन्न झाली. यावेळी देवस्थानचे विश्वस्त मा. श्री केशव उमेश विद्वांस यांनी उपस्थित राहून संपूर्ण व्यवस्थेवर लक्ष ठेवले.

मंदिर परिसरात भाविकांच्या सोयीसाठी दर्शनबारी, पिण्याच्या पाण्याची सोय तसेच मंदिराबाहेर मांडवांची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी देवस्थानतर्फे उपवासाची खिचडी भाविकांना वाटण्यात आली.

सायंकाळी चिंतामणी भजनी मंडळाच्या सुमधुर साथीने ह.भ.प. फाळके महाराज, आळंदी यांच्या सुभाष्य कीर्तनाने भक्तिमय वातावरण रंगले. चंद्रोदयानंतर श्री चिंतामणींचा छबिना भाविकांच्या जयघोषात निघाला. छबिनानंतर ग्रामस्थांच्या वतीने भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.

गर्दीची शक्यता लक्षात घेऊन देवस्थानने जादा सुरक्षा यंत्रणा तैनात केली होती. तर ग्रामपंचायतीतर्फे पार्किंगची सोय करण्यात आली होती. दिवसभर मंदिर परिसरात भक्तिमय, शांत आणि उत्साही वातावरण अनुभवायला मिळाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्यस्तरीय मास्टर्स गेम्समध्ये वडगाव पाटोळेच्या चैताली पाटोळे यांची सुवर्णमय कामगिरी! नाशिक येथे पार पडलेल्या...

राज्यस्तरीय मास्टर्स गेम्समध्ये वडगाव पाटोळेच्या चैताली पाटोळे यांची सुवर्णमय कामगिरी! नाशिक येथे पार पडलेल्या स्पर्धेत पटकावली दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदके; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव राजगुरूनगर;...

कोंढव्यात पहाटे पार्किंगमधील वाहनांना आग; १८ वाहने जळून खाक

कोंढव्यात पहाटे पार्किंगमधील वाहनांना आग; १८ वाहने जळून खाक पुणे; दि. २२ (शशिकांत पाटोळे) : पुण्यातील कोंढवा परिसरातील भाग्योदय नगर येथील गल्ली क्रमांक ३४ मधील...

सिंहगडावर भरणार हवेली पंचायत समितीची मासिक सभा हवेलीच्या विकासप्रश्नांवर होणार चर्चा

सिंहगडावर भरणार हवेली पंचायत समितीची मासिक सभा हवेलीच्या विकासप्रश्नांवर होणार चर्चा पुणे | हवेली तालुका प्रतिनिधी. प्रसाद सोनवणे. पंचायत समितीच्या मासिक सभांचे ठरलेले ठिकाण बदलत हवेली पंचायत समितीची...

बेकायदा देशी दारू विकणाऱ्या तरुणावर पुणे गुन्हे शाखेची कारवाई; ७,४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त

बेकायदा देशी दारू विकणाऱ्या तरुणावर पुणे गुन्हे शाखेची कारवाई; ७,४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त ​पुणे: शहरातील गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे...

दुकानांचे शटर उचकटून १० ठिकाणी चोरी करणारे सराईत दोन आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट...

दुकानांचे शटर उचकटून १० ठिकाणी चोरी करणारे सराईत दोन आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट १ ची कारवाई ​पुणे, दि. २१ नोव्हेंबर २०२६: पुणे शहरातील गुन्हे शाखा...

error: Content is protected !!