Homeताज्या बातम्यासारसबाग बंद करण्याच्या निर्णयावर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचा तीव्र निषेध सुरक्षेच्या नावाखाली...

सारसबाग बंद करण्याच्या निर्णयावर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचा तीव्र निषेध सुरक्षेच्या नावाखाली एका विशिष्ट समाजाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न; निर्णयाचा तात्काळ फेरविचार करा”

सारसबाग बंद करण्याच्या निर्णयावर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचा तीव्र निषेध सुरक्षेच्या नावाखाली एका विशिष्ट समाजाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न; निर्णयाचा तात्काळ फेरविचार करा”

पुणे | प्रतिनिधी

बकरी ईदनंतर “बासी ईद ” या पारंपरिक प्रथेनुसार अनेक मुस्लिम कुटुंबे आपल्या परिवारासोबत पुण्यातील बागा, उद्याने व पर्यटनस्थळांना भेट देत असतात. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या सामाजिक व कौटुंबिक परंपरेचा भाग म्हणून सारसबाग हे मुस्लिम समाजासाठीही एक महत्त्वाचे आकर्षण राहिले आहे. मात्र यावर्षी २८ व २९ मे २०२६ रोजी सारसबाग बंद ठेवण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी, संशयास्पद व भेदभावपूर्ण असल्याची प्रतिक्रिया मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने देण्यात आली आहे.

फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. फरहा अनवर हुसेन शेख व सामाजिक कार्यकर्ते अनवर हुसेन शेख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, जर खरोखरच सुरक्षेचा प्रश्न असेल तर मग फक्त ईदच्या दोन दिवसांनाच सारसबाग का बंद ठेवली जात आहे? २७, ३० किंवा ३१ मे रोजीही बंद का ठेवण्यात आली नाही? पुण्यातील इतर सर्व बागा सुरू असताना केवळ सारसबागच बंद ठेवणे हे एका विशिष्ट समाजाला लक्ष्य केल्याचा संशय निर्माण करणारे आहे.

दोन वर्षांपूर्वीही पुणेचे खासदार मेघा कुलकर्णी यांनी रमजान ईदनंतर “बासी ईद ” निमित्ताने सारसबागेत येणाऱ्या मुस्लिम कुटुंबांविरोधात भूमिका घेत पत्रव्यवहार केला होता व सारसबाग बंद ठेवण्याची मागणी केली होती. त्या वेळीही मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनने या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवला होता. आता पुन्हा त्याच पद्धतीने निर्णय घेतला जात असल्याने समाजात नाराजी व्यक्त होत आहे.

फाउंडेशनच्या वतीने पुण्याचे महापौर, उपमहापौर, पुणे महानगरपालिका आयुक्त, उद्यान विभागाचे आयुक्त व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना लेखी पत्र देण्यात आले असून, या निर्णयाचा तात्काळ फेरविचार करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पत्रात नमूद करण्यात आले आहे की, सार्वजनिक बागा या सर्व नागरिकांसाठी समान अधिकाराने खुल्या असतात. सुरक्षेच्या कारणास्तव जर काही अडचणी असतील, तर प्रशासनाने आवश्यक पोलीस बंदोबस्त व सुरक्षा व्यवस्था वाढवावी; मात्र एका समाजाच्या पारंपरिक कौटुंबिक भेटींवर निर्बंध आणणे योग्य नाही.

डॉ. फरहा शेख व अनवर शेख यांनी स्पष्ट केले की, जर प्रत्येक ईदच्या काळात अशा प्रकारे सारसबाग बंद ठेवून मुस्लिम समाजाला अप्रत्यक्षपणे रोखण्याचा प्रयत्न केला गेला, तर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने न्यायालयात याचिका दाखल करण्याचाही पर्याय विचाराधीन आहे.

डॉ. फरहा अनवर हुसेन शेख
अध्यक्षा, मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशन

अनवर हुसेन शेख
सामाजिक कार्यकर्ते व प्रतिनिधी
मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशन, पुणे
Mob 8459867838

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुरळक वीज खंडित झाल्यामुळे रहिवाशांना रात्रीची झोप येते, PMC हद्दीतील रस्त्यांवर डक्ट नसल्याबद्दल MSEDCL...

पुण्यातील रस्त्यावर केबल टाकताना महावितरणचे कर्मचारी. केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने फाइल चित्र पुणे:बँक व्यावसायिक निलाभ कश्यप आणि त्यांच्या कुटुंबासाठी सोमवारची रात्र जागृत करणारे स्वप्न...

बीड जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मरचे अवैध शिफ्टिंग करताना वीज पडून कामगाराचा मृत्यू झाला. पुणे बातम्या

AI वापरून प्रातिनिधिक प्रतिमा तयार केली बीड: महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात कथितरित्या ट्रान्सफॉर्मर हलवताना एका ३५ वर्षीय मजुराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची माहिती...

पुणेकरांनो लक्ष द्या! बकरी ईदनिमित्त उद्या गोळीबार मैदान परिसरातील वाहतुकीत मोठे बदल; ‘हे’ आहेत...

पुणे शहरात उद्या, दिनांक २८ मे २०२६ रोजी बकरी ईद अत्यंत उत्साहात साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने मुस्लिम बांधव आपापल्या भागातील मशीद आणि...

यंदाच्या जानेवारी-मार्चमध्ये पुणे कार्यालय भाडेतत्त्वावर मंदावले; पुरवठ्याच्या संकटामुळे भाडे वाढले | पुणे बातम्या

पुणे: 2026 च्या पहिल्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) पुण्यातील कार्यालयीन जागेची मागणी कमी झाली असून, गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 20 लाख चौरस फूट वरून...

वारकरी टिपण्णी : राष्ट्रवादीचे प्रवक्ते लवांडे यांना पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला. पुणे बातम्या

पुणे: वाघोली पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या वारकरी संप्रदायाशी संबंधित संत आणि धार्मिक व्यक्तींबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे...

error: Content is protected !!