Homeताज्या बातम्या११ अंश थंडीत ७:४५ ला गेट-बंदी; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मिस फरहा फाउंडेशनची तातडीने...

११ अंश थंडीत ७:४५ ला गेट-बंदी; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मिस फरहा फाउंडेशनची तातडीने कारवाईची मागणी

११ अंश थंडीत ७:४५ ला गेट-बंदी; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मिस फरहा फाउंडेशनची तातडीने कारवाईची मागणी

पुणे – शहरात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या तापमानातील घसरणीमुळे सकाळच्या वेळेत थंडी आणि दाट धुक्याचा प्रचंड त्रास होत आहे. तापमान ११ अंश सेल्सिअसपर्यंत खाली जात असताना अनेक शाळांमध्ये पहाटेच गेट-बंदीची सक्ती विद्यार्थ्यांसाठी नवीन संकट ठरत आहे. खडकी परिसरातील St. Joseph’s Boys High School आणि St. Joseph’s Girls High School येथे सकाळी ७:३० च्या नियोजित वेळेपेक्षाही लवकर म्हणजे ७:४० ते ७:४५ च्या दरम्यान गेट बंद केले जाते, अशी गंभीर तक्रार समोर आली आहे.

काही मिनिटांचा उशीर झाल्यास विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाकारून त्यांना परत पाठवले जाते. परंतु या परत जाण्याच्या प्रवासात विद्यार्थ्यांची, विशेषतः मुलींची सुरक्षा धोक्यात येते, असे मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशन, पुणे ने लक्षात आणून दिले आहे. पालकांच्या अनुपस्थितीत मुलांना एकट्याने रस्त्यावर उभे ठेवणे, किंवा घराकडे निघण्यास भाग पाडणे हे अत्यंत धोकादायक असून अनेक पालकांनी या मुद्द्यावर आवाज उठवला आहे.

फाउंडेशनने नमूद केले की, कमी तापमानात सकाळी लहान मुलांना वेळेवर उठणे, तयार होणे आणि शाळेत पोहोचणे हे मोठे आव्हान आहे. वाहतुकीची कोंडी, धुके, शारीरिक अस्वस्थता आणि दिवसभर चालणाऱ्या थंडीच्या लाटेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत आहे.

याच पार्श्वभूमीवर, फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. फरहा अन्वर हुसैन शेख यांनी मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, शिक्षण आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद पुणे आणि संबंधित अधिकाऱ्यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवत शाळांमधील वेळेत लवचिकता ठेवणे, थंडीच्या दिवसांत उपस्थितीबाबत सवलत, आणि सुरक्षा उपाययोजनांची कडक अंमलबजावणी यासाठी तातडीची मागणी केली आहे.

डॉ. शेख म्हणाल्या,
“शिस्त आणि नियम महत्त्वाचे आहेत; पण थंडी, वाहतूक आणि मुलांच्या सुरक्षिततेपेक्षा अधिक महत्त्वाचे नाहीत. सकाळच्या थंडीत काही मिनिटांच्या उशिरामुळे मुलांना गेटवरून परत पाठवणे अमानवी आणि धोकादायक आहे.”

महाराष्ट्र शासनाने पूर्वीच हवामान आणि इतर अडचणी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना सकाळच्या वेळेबाबत लवचिकता देण्याचे आदेश जारी केले होते, मात्र काही शाळांकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे फाउंडेशनने निदर्शनास आणले.

फाउंडेशनच्या या पुढाकाराचे अनेक पालकांनी स्वागत केले असून प्रशासनाने त्वरित तपास करून योग्य निर्देश जारी करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

—

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोंढव्यात पहाटे पार्किंगमधील वाहनांना आग; १८ वाहने जळून खाक

कोंढव्यात पहाटे पार्किंगमधील वाहनांना आग; १८ वाहने जळून खाक पुणे; दि. २२ (शशिकांत पाटोळे) : पुण्यातील कोंढवा परिसरातील भाग्योदय नगर येथील गल्ली क्रमांक ३४ मधील...

सिंहगडावर भरणार हवेली पंचायत समितीची मासिक सभा हवेलीच्या विकासप्रश्नांवर होणार चर्चा

सिंहगडावर भरणार हवेली पंचायत समितीची मासिक सभा हवेलीच्या विकासप्रश्नांवर होणार चर्चा पुणे | हवेली तालुका प्रतिनिधी. प्रसाद सोनवणे. पंचायत समितीच्या मासिक सभांचे ठरलेले ठिकाण बदलत हवेली पंचायत समितीची...

बेकायदा देशी दारू विकणाऱ्या तरुणावर पुणे गुन्हे शाखेची कारवाई; ७,४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त

बेकायदा देशी दारू विकणाऱ्या तरुणावर पुणे गुन्हे शाखेची कारवाई; ७,४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त ​पुणे: शहरातील गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे...

दुकानांचे शटर उचकटून १० ठिकाणी चोरी करणारे सराईत दोन आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट...

दुकानांचे शटर उचकटून १० ठिकाणी चोरी करणारे सराईत दोन आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट १ ची कारवाई ​पुणे, दि. २१ नोव्हेंबर २०२६: पुणे शहरातील गुन्हे शाखा...

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त रक्तदात्यांचे शतक पार! शिवसेना-युवासेनेच्या रक्तदान शिबिरात १०७ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त रक्तदात्यांचे शतक पार! शिवसेना-युवासेनेच्या रक्तदान शिबिरात १०७ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान पुणे : हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना-युवासेना पुणे शहराच्या...

error: Content is protected !!