Homeक्राईमअनोळखी मृतदेहाची ओळख पटवुन त्याचा खुन करुन पश्चिम बंगाल येथे पसार झालेल्या...

अनोळखी मृतदेहाची ओळख पटवुन त्याचा खुन करुन पश्चिम बंगाल येथे पसार झालेल्या आरोपीस ३६ तासाच्या आत पश्चिम बंगाल येथुन अटक

अनोळखी मृतदेहाची ओळख पटवुन त्याचा खुन करुन पश्चिम बंगाल येथे पसार झालेल्या आरोपीस ३६ तासाच्या आत पश्चिम बंगाल येथुन अटक

दिनांक १०/०२/२०२५ रोजी रात्री ००/३५ या चे पूर्वी स.नं. २८ तोरणा मोहर बिल्डिंग, चिंतामणी चौकाचे जवळ आंबेगाव पठार पुणे येथील बांधकाम चालू असलेल्या साईटच्या पहील्या मजल्यायर फ्लैट क्रमांक १०४ मध्ये कोणीतरी अज्ञात इसमाने, सदरचे अनोळखी इसमास, कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन, कोणत्यातरी हत्याराने, त्याचे डोक्यात मारुन, त्याग गंभीर जखमी करुन त्याचा खून केला आहे म्हणुन राहुल लक्ष्मण आवारी नेमणुक भारती विदयापीठ पोलीस स्टेशन पुणे यांनी सरकार तर्फे फिर्याद दिल्याने भारती विदयापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ११४/२०२५ भारतीय न्याय संहीता सन २०२३ चे कलम १०३ (१) अन्वये गुन्हा आला आहे.

दाखल गुन्हयातील मयत इसमाची बॉडी ही DICOMPOSE होवु लागल्यामुळे मयताचे चेहरा नीट दिसत नव्हता मयताबाचत घटनास्थळावरील नागरीकांकडे विचारणा केली असता मयत इसमाबाबत काही उपयुक्त माहीती मिळाली नाही. त्यामुळे मयत इसमास ओळखणे हे पोलीसांना कठीण झाले होते. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु. साळगांवकर यांनी तपास पथकाचे अधिकारी निलेश मोकाशी व तपास पथकाचे पोलीस अंमलदार यांना मयत इसमाची ओळख पटवुन आरोपीचा शोध घेणेबाबतच्या सुचना दिल्या. मा. वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी निलेश मोकाशी व तपास पथकाचे पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळावर मिळून आलेल्या रक्ताने माखलेल्या मोबाईल फोनचा तांत्रिक तपास केला असता त्यावरुन मयत इसमाचे नाव नयन गोरख प्रसाद, वय ४५ वर्षे, रा. मुळ रा. गाव दुमडा, तहसील तारवारा, जि. सिवान, विहार असे असल्याची खात्री झाली. त्यापुढे मयत इसम नयन गोरख प्रसाद याचे मोबाईल फोनचा तांत्रिक तपास केला असता त्यामध्ये मयत इसमाचे सोवत विरण सुबल करकर, ऊर्फे बिरण सुबल कर्माकर, वय ३० वर्षे, रा. बजे विंडोल, विंडोले, रायगंज, परीयाल, उत्तर दिनाजपुर, पश्चिम बंगाल ७३३१५६ हा इसम असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली. आरोपी बिरण सुबल करकर, ऊर्फे बिरण सुबल कर्माकर याचा शोध घेत असताना तो पश्चिम बंगाल येथे गेल्याची माहीती मिळाल्याने मा. वरीष्ठांचे मार्गदर्शनखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी, पोलस अंमलदार मंगेश पवार, अभिनय चौधरी यांनी पश्चिम बंगाल येथे जावुन नमुद आरोपीचा शोध घेतला असता तो हावडा रेल्वे स्टेशन भागात मिळुन आल्याने त्यास नमुद गुन्हयात गोलाबारी पोलीस स्टेशन, हावडा, पश्चिम बंगाल येथे दिनांक १२/०२/२०२५ रोजी अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा साो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. प्रविणकुमार पाटील सो, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. श्रीमती स्मार्तना पाटील सो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. विवेक मासाळ सो, पोलीस उप आयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे शाखा, पुणे मा. राहुल आवारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु. साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, व तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार चेतन गोरे, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सम्पाले, निलेश खखैरमोडे, सचिन गाडे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, यांच्या पथकाने केली आहे.

(

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केतन अग्रवाल मर्डर: ‘माझ्या हृदयाला त्याचा आत्मा सापडला’: केतन अग्रवालच्या हत्येपूर्वी, मंगेतर सिया गोयलचा...

पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल आणि त्यांची मंगेतर सिया गोयल यांचा हृदयस्पर्शी व्हिडिओ पुन्हा समोर आला आहे. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल आणि त्याची...

केतन अग्रवाल: जूनमध्ये हुडी, बाली ट्रिप, एक ‘साप कथा’: केतन अग्रवालच्या लोहगड हत्याकांडात पोलिसांनी...

पुण्याजवळील लोहगड किल्ल्यावरील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल आणि त्याची मंगेतर सिया गोयल या हुडीमध्ये एका व्यक्तीच्या सीसीटीव्ही फुटेजने पोलिसांना सुरुवातीला ट्रेकिंगचा अपघात...

मेट्रो लाइन 3 लाँच होण्यापूर्वी शेवटच्या-माईल कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा. पुणे बातम्या

मेट्रो लाइन-3 साठी फूट ओव्हरब्रिज पुणे : पुणे मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी (PMRDA) ने पुढील महिन्यात मेट्रो लाईन 3 चा टप्पा 1 लाँच...

पुरवठा घटल्याने टोमॅटोच्या किमती ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत पुणे बातम्या

पुणे : टोमॅटोच्या किमती गेल्या महिनाभरात वाढल्या आहेत, किरकोळ विक्रीचे दर आता प्रतिकिलो ६५-७० रुपये झाले आहेत - काही आठवड्यांपूर्वीच्या पातळीपेक्षा २०-३०%...

‘माझ्या वाढदिवशी तू मला सोडून गेलास’: हत्येच्या तपासादरम्यान केतन अग्रवालच्या लोहगड किल्ल्याचा मृत्यू झाल्यानंतर...

सिया गोयलने तिच्या मंगेतर केतन अग्रवालच्या मृत्यूच्या एका दिवसानंतर तिच्या इंस्टाग्रामवर एक भावनिक कथा पोस्ट केली (एआयसह स्क्रीनशॉट्स वाढवलेले) पुणे: सिया गोयलने तिचा...

error: Content is protected !!