Homeताज्या बातम्याआळंदी रोडवर ‘झाडू मारा आंदोलन’; खोदकामामुळे अपघातांची मालिका, ठेकेदारावर कारवाईची मागणी

आळंदी रोडवर ‘झाडू मारा आंदोलन’; खोदकामामुळे अपघातांची मालिका, ठेकेदारावर कारवाईची मागणी

पुणे | प्रतिनिधी
पुण्यातील आळंदी रोडवरील मेंटल कॉर्नर चौक येथे केबल टाकण्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामानंतर रस्ता अपूर्ण अवस्थेत सोडण्यात आल्याने परिसरात अपघातांची मालिका सुरू झाली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बारीक खडी व दगड विखुरलेले असल्याने वाहनचालकांच्या गाड्या घसरत असून रात्रभरात सुमारे दहा अपघात घडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
खोदकामानंतर रस्ता पूर्ववत न केल्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते सचिन भोसले यांनी ‘झाडू मारा आंदोलन’ करत स्वतः झाडू मारून रस्ता स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चौकात सतत सुरू असलेल्या वाहतुकीमुळे संपूर्ण साफसफाई करणे शक्य झाले नाही.
सचिन भोसले यांनी पुणे महानगरपालिका येथे अधिकृत तक्रार दाखल केली असून संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करून ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी केली आहे. “रातोरात केबल टाकून काम पूर्ण केल्याचा दिखावा करण्यात आला, मात्र रस्ता दुरुस्त न करता नागरिकांच्या जीवाशी खेळ करण्यात आला आहे,” असा आरोप त्यांनी केला.
या आंदोलनावेळी सामाजिक कार्यकर्ते राजीव नाईक, नवरे महेश राऊत, राजेश शेलार व सनी राव उपस्थित होते. संबंधित ठेकेदारावर तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं? ६ हल्लेखोरांनी अवघ्या ३० सेकंदात केले १५ वार!

पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं? ६ हल्लेखोरांनी अवघ्या ३० सेकंदात केले १५ वार! पुणे; दि. २५ (शशिकांत पाटोळे) : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टासमोर गोळीबार झाल्याची...

रॅपिडोवर (RTO) ची कडक कारवाई; बाईक टॅक्सी सेवा बंद करण्याचे आदेश!

रॅपिडोवर (RTO) ची कडक कारवाई; बाईक टॅक्सी सेवा बंद करण्याचे आदेश! पुणे; दि. २४ (शशिकांत पाटोळे) : पुण्यात वैध बाईक टॅक्सी...

पुणे हिंजवडी २७ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता तरुणीचा प्रेम संशयातून प्रियकराकडून खून!

पुणे हिंजवडी २७ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता तरुणीचा प्रेम संशयातून प्रियकराकडून खून! पुणे; दि. २४ (शशिकांत पाटोळे) : पुण्याच्या आयटी नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात...

राज्यस्तरीय मास्टर्स गेम्समध्ये वडगाव पाटोळेच्या चैताली पाटोळे यांची सुवर्णमय कामगिरी! नाशिक येथे पार पडलेल्या...

राज्यस्तरीय मास्टर्स गेम्समध्ये वडगाव पाटोळेच्या चैताली पाटोळे यांची सुवर्णमय कामगिरी! नाशिक येथे पार पडलेल्या स्पर्धेत पटकावली दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदके; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव राजगुरूनगर;...

कोंढव्यात पहाटे पार्किंगमधील वाहनांना आग; १८ वाहने जळून खाक

कोंढव्यात पहाटे पार्किंगमधील वाहनांना आग; १८ वाहने जळून खाक पुणे; दि. २२ (शशिकांत पाटोळे) : पुण्यातील कोंढवा परिसरातील भाग्योदय नगर येथील गल्ली क्रमांक ३४ मधील...

error: Content is protected !!