Homeताज्या बातम्याकर्नाटकला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या खुनाच्या प्रयत्नातील तीन आरोपींना पुणे गुन्हे शाखेकडून...

कर्नाटकला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या खुनाच्या प्रयत्नातील तीन आरोपींना पुणे गुन्हे शाखेकडून सिनेस्टाईल पाठलाग करून अटक

कर्नाटकला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या खुनाच्या प्रयत्नातील तीन आरोपींना पुणे गुन्हे शाखेकडून सिनेस्टाईल पाठलाग करून अटक
​पुणे: शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुनाच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या तीन आरोपींना पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली आहे. हे तिन्ही आरोपी खाजगी ट्रॅव्हल्स बसमधून कर्नाटक राज्यात पळून जात असताना पळसदेव (ता. इंदापूर, जि. पुणे) परिसरात सोलापूर महामार्गावर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

​नेमकी घटना आणि कारवाई:
शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०६/२०२६ मधील खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा गुन्हे शाखा युनिट २ चे अधिकारी व अंमलदार शोध घेत होते. तपासादरम्यान पोलीस अंमलदार कुंदन शिंदे, शंकर कुंभार आणि महेश मंडलिक यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील आरोपी मांजरी (पुणे) येथून खाजगी ट्रॅव्हल्सने कर्नाटक राज्यात पळून जात आहेत.
​या माहितीच्या आधारे युनिट २ च्या पथकाने तात्काळ सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषण केले. त्यानुसार आरोपी सोलापूर रोडने हुमनाबाद (कर्नाटक) येथे जात असल्याचे स्पष्ट झाले. पथकाने तातडीने पाठलाग करत दिनांक २८ नोव्हेंबर २०२६ रोजी पळसदेव (पुणे) येथे तिन्ही आरोपींना शिताफीने जेरबंद केले.
​अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे व पत्ते:
१) रोहित काशिनाथ धोंगडे (वय २२ वर्षे, रा. दिगंबर हाईट्स, गंधर्व मंगल कार्यालयाशेजारी, अंजलीनगर, कात्रज, पुणे)
२) कुमार शिवाजी गाडे (वय २५ वर्षे, रा. तानाजी निवास बिल्डिंग, गणेश मंदिराजवळ, कात्रज गावठाण, कात्रज, पुणे)
३) हर्षल ऊर्फ सोन्या रमाकांत साबळे (वय २४ वर्षे, रा. साबळे वाडा, किनारा हॉटेलच्या मागे, कात्रज, पुणे)
​या पथकाने केली यशस्वी कामगिरी:
ही संपूर्ण कामगिरी अपर पोलीस आयुक्त (अतिरिक्त कार्यभार, गुन्हे) संजय पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट २ गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या सूचनांप्रमाणे करण्यात आली. या कारवाईत महिला पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर नेवसे, तसेच पोलीस अंमलदार कुंदन शिंदे, शंकर कुंभार, महेश मंडलिक, सर्जेराव सरगर, संतोष टकले, विजयकुमार पवार, ओमकार कुंभार, नागनाथ राख, विद्या शिंदे, आशिष यादव आणि विनायक वगारे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मोक्का (MCOCA) गुन्ह्यात एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला पुणे गुन्हे शाखा युनिट २ कडून...

मोक्का (MCOCA) गुन्ह्यात एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला पुणे गुन्हे शाखा युनिट २ कडून अटक ​पुणे (दि. २९ नोव्हेंबर २०२६): मोक्का (MCOCA) सारख्या गंभीर गुन्ह्यात गेल्या...

व्यंगचित्रकारांची मुस्कटदाबी सहन करणार नाही – गौरव सर्जेराव ( व्यंगचित्रकार ) व्यंगचित्रकारांच्या हक्कासाठी...

व्यंगचित्रकारांची मुस्कटदाबी सहन करणार नाही - गौरव सर्जेराव ( व्यंगचित्रकार ) व्यंगचित्रकारांच्या हक्कासाठी मेटा विरोधात शिवसेना आक्रमक. पुणे- वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्यंगचित्रकारणासाठी...

वाकडीत भरदिवसा घरफोडी! सोन्याचे दागिने, रोकड अन् मोबाईल चोरीला घर बंद असल्याची संधी साधत...

वाकडीत भरदिवसा घरफोडी! सोन्याचे दागिने, रोकड अन् मोबाईल चोरीला घर बंद असल्याची संधी साधत लोखंडी कपाट फोडले; ६७ हजारांचा ऐवज लंपास वाकडी : घराला कुलूप...

येरमाळ्यातील ‘चंद्रकांत स्टील वर्क्स’मध्ये वारंवार चोऱ्या; सीसीटीव्ही फुटेज व पुराव्यांसह कारवाईची मागणी

येरमाळा (ता. कळंब, जि. धाराशिव): येरमाळा येथील येडशी रोडवरील पेट्रोल पंपासमोरील 'चंद्रकांत स्टील वर्क्स' या दुकानात जानेवारी २०२५ पासून ते जुलै २०२६ पर्यंत वारंवार...

मुरली अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्ह्यात सेवाकार्याचा जागर! रक्तदान, आरोग्यदान आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी...

मुरली अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्ह्यात सेवाकार्याचा जागर! रक्तदान, आरोग्यदान आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी अन्नधान्य मदत; भाजप वैद्यकीय आघाडीचा सक्रिय सहभाग वाघोली, प्रसाद सोनवणे,तालुका प्रतिनिधी,पुणे. : केंद्रीय...

error: Content is protected !!