मोक्का (MCOCA) गुन्ह्यात एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला पुणे गुन्हे शाखा युनिट २ कडून अटक
पुणे (दि. २९ नोव्हेंबर २०२६):
मोक्का (MCOCA) सारख्या गंभीर गुन्ह्यात गेल्या एक वर्षापासून फरार असलेल्या सराईत आरोपीला जेरबंद करण्यात पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ ला मोठे यश आले आहे. महादेव दामोदर ढोले (वय ३८, रा. फ्लॅट नं. २०४, स.नं. ४८/७/२/१, त्रिमूर्ती निवास, वडगाव बुद्रुक/हवेली, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २७ नोव्हेंबर २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस अधिकारी व अंमलदार पाहिजे असलेले फरारी आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेत होते. या गस्तीदरम्यान पोलीस अंमलदार महेश मंडलिक, सर्जेराव सरगर आणि संतोष टकले यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, स्वारगेट पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२६/२०२५ मधील पाहिजे असलेला आरोपी महादेव ढोले हा वडगाव बुद्रुक परिसरात फिरत आहे.
आरोपी महादेव ढोले याच्यावर स्वारगेट पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता (भा.द.वि.) कलम ४२०, ४०६, ४६७, ४६८, ४६९, ४७१, ४७२, ४७३, ४७४, ४०९, ३१ तसेच मोक्का (MCOCA) कायद्याच्या कलम ३ (१), ३ (२) आणि ३ (४) अन्वये गंभीर गुन्हा दाखल असून तो गेल्या एक वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत होता. मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले आणि अटक करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी स्वारगेट पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.
या पथकाने केली कामगिरी:
ही संपूर्ण कारवाई अपर पोलीस आयुक्त (अतिरिक्त कार्यभार, गुन्हे) श्री. संजय पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. गौहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गुन्हे शाखा युनिट २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे यांच्या सूचनांप्रमाणे महिला पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर नेवसे, तसेच पोलीस अंमलदार कुंदन शिंदे, शंकर कुंभार, महेश मंडलिक, सर्जेराव सरगर, संतोष टकले, विजयकुमार पवार, ओमकार कुंभार, नागनाथ राख, विद्या शिंदे, आशिष यादव आणि विनायक वगारे यांच्या पथकाने ही धडाकेबाज कामगिरी केली आहे.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























