Homeआरोग्यकोळवडी साष्ठे गावात गौणखनिज उत्खननाचा प्रकार उघड – दोन ठेकेदार, दोन यंत्रणा,...

कोळवडी साष्ठे गावात गौणखनिज उत्खननाचा प्रकार उघड – दोन ठेकेदार, दोन यंत्रणा, शासनाच्या मालमत्तेची खुलेआम लूट

कोळवडी साष्ठे गावात गौणखनिज उत्खननाचा प्रकार उघड – दोन ठेकेदार, दोन यंत्रणा, शासनाच्या मालमत्तेची खुलेआम लूट

कोळवडी साष्ठे (ता. हवेली, जि. पुणे) येथील गट क्रमांक ७२ मध्ये रस्त्याचे काम सुरू असताना अनधिकृत गौणखनिज (soft stone) उत्खनन व शासकीय मालमत्तेची चोरी झाल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. विशेष म्हणजे, या एकाच कामासाठी दोन वेगवेगळ्या ठेकेदारांना – दोन वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांनी काम देऊन – शासनाचा निधी दुप्पट खर्च केल्याचे देखील समोर आले आहे.

🛠️ कोणते खोणखनिज?
गौणखनिज म्हणजे शासनाच्या जमिनीखालील सॉफ्ट स्टोन/भूसंपत्ती, ज्याचा वापर रस्ता मजबुतीकरण, बांधकाम, पायाभूत सुविधा यासाठी केला जातो. याचे उत्खनन खनिकर्म विभागाची परवानगीशिवाय केल्यास तो गैरकायदेशीर व दंडनीय गुन्हा मानला जातो.
जिल्हा परिषद बांधकाम अभियंता थडकर साहेब यांची भूमिका थोडे गौणखनिज उत्खन घेतल्यामुळे काय झालं

🧱 दोन ठेकेदार – दोन कार्यालये:

1.ऋषिकेश एकनाथ काळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून काम

2. प्रतीक आव्हाळे – मंडळ अधिकारी कार्यालयाकडून काम
या दोघांनी गट क्र. ७२ मधून अनधिकृतपणे गौणखनिज काढून, यंत्रे वापरून ट्रकद्वारे वाहून नेल्याचे निदर्शनास आले आहे. ग्रामपंचायतीचा दि. १४ जुलै २०२५ चा अधिकृत अहवाल, जिल्हा परिषदेचे पत्र (दि. १८ जुलै २०२५), छायाचित्रे आणि ७/१२ उतारे यावरून हे स्पष्ट झाले आहे.

🚨 पत्रकार आमिर मोहम्मद शेख यांची पोलिसात तक्रार:
या प्रकरणात पत्रकार आमिर मोहम्मद शेख (क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज) यांनी पोलिसांकडे IPC 379, 420, 406, 120(B) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 आणि खनिकर्म कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची लेखी मागणी केली आहे.
🛑 प्रकरण वाघोली पोलिसांकडे वळवण्याचा दिशाभूल प्रयत्न?
सदर प्रकरण हवेली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असतानाही, काही अधिकाऱ्यांनी ते वाघोली पोलीस ठाण्याकडे वळवून तक्रार दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप पत्रकारांनी केला आहे. यामुळे कारवाईस विलंब झाला असून नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे.
📢 प्रमुख मागण्या:
गौणखनिज चोरीबाबत दोषी ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा
दोन्ही सरकारी कार्यालयांमधील समन्वयाचा अभाव व निधीचा दुरुपयोग याबाबत चौकशी करावी
संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी
८ दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

📞 संपर्क:
आमिर मोहम्मद शेख
पत्रकार – Crime Maharashtra Live News
📱 7744808833
📧 crimemaharashtra.live@gmail.com

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात पोलिसांवर हल्ला करून फरार झालेल्या दरोडेखोरांना छत्रपती संभाजीनगरच्या जंगलातून अटक; गुन्हे शाखा युनिट-५...

पुणे: डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीट मार्शलवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोन सराईत दरोडेखोरांना पुणे शहर गुन्हे शाखा...

कल्याणीनगर ट्रम्प टॉवरसमोर जबरी चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना येरवडा पोलिसांकडून अटक; ६० हजारांचा...

पुणे: कल्याणीनगर येथील ट्रम्प टॉवरसमोर फोनवर बोलत थांबलेल्या नागरिकाला "रागाने का पाहतोस" असे म्हणून जीवे मारण्याची धमकी देत रोख रक्कम लुटणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना येरवडा...

कोथरूड पोलिसांची धडक कारवाई: विक्रीसाठी आणलेली २ पिस्तुले आणि २ जिवंत काडतुसांसह एकास अटक;...

​पुणे: कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीररीत्या पिस्तूल विक्रीसाठी आणणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. आरोपीकडून २ पिस्तुले आणि २ जिवंत काडतुसे असा...

जास्त परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या महिलेला बेळगावातून अटक; शिवाजीनगर पोलिसांची कारवाई

​पुणे: गुंतवणूकदारांना शेअर ट्रेडिंगमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका महिलेला शिवाजीनगर पोलिसांनी बेळगाव (कर्नाटक) येथून जेरबंद केले आहे. राजश्री राजेश तुडयेकर...

हातचलाखीने ज्वेलर्समधून दागिने लांबवणारी टोळी लोहगाव पोलिसांच्या जाळ्यात; ५ जणांना अटक, अडीच लाखांचा मुद्देमाल...

पुणे: लोहगाव परिसरातील एका ज्वेलर्सच्या दुकानातून हातचलाखीने चांदीचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीला लोहगाव पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने शिताफीने जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी पाच...

error: Content is protected !!