गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा आमदार महेश लांडगे यांना दिव्य आशिर्वाद!
पुणे (शशिकांत पाटोळे) | दिनांक : १९ फेब्रुवारी २०२६ आमदार महेश लांडगे यांना आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचा व त्यांच्या करस्पर्शातून आशिर्वाद घेण्याचा दिव्य योग लाभला.गुरुदेवांच्या सान्निध्यात बसताना, ‘गुरू म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारी ज्योत आणि मनातील गोंधळ शांत करून आत्म्याशी भेट घडवणारा सेतू’ ही अनुभूती आमदार लांडगे यांनी प्रत्यक्ष जाणवली, असे त्यांनी सांगितले.
गुरुदेवांच्या स्मितहास्यातून मिळालेल्या करुणा आणि आश्वासक शक्तीमुळे मनातील सर्व ताण, भीती आणि संभ्रम क्षणात विरून जातात, असे आमदार लांडगे यांनी अनुभवाचे वर्णन केले.
या भेटीत श्री. श्रेअंश चौधरी, श्री. ओंकार सावंत, श्री. सूर्यकांत जाधव, श्री. अभिजित भानाप, श्री. गिरीश देशमुख तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक स्वामी प्रणवानंदजी उपस्थित होते.यावेळी आमदार लांडगे यांनी बेंगलुरु- कर्नाटक येथील ”श्री श्री गुरूकुलम” वेद आगम संस्कृत महापाठशाळेची पाहणी केली.
येथे विद्यार्थ्यांना वेद, आगम, संस्कृत, ज्योतिष, योग, संगीत, वैदिक गणित व शिल्पशास्त्र यांचा मोफत अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना गुरु-शिष्य परंपरेतून शिक्षण दिले जाते, जे प्राचीन भारतीय संस्कृती आणि जीवनमूल्यांचे संवर्धन करीत आहे.तसेच, आमदार लांडगे यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या श्री श्री गौशाला येथे भारतीय गोवंश संवर्धनाचे कार्य पाहिले. त्यांनी गौशाळेतील जैविक पद्धतीने चालणारे प्रकल्प आणि गोवंशापासून मिळणारी उत्पादने पाहून कौतुक व्यक्त केले.
आमदार लांडगे म्हणाले, ‘गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली समाजात प्रेम, शांतता आणि सकारात्मक जीवन मूल्ये रुजवण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगची कार्ये अत्यंत प्रेरणादायी आहेत. या भेटीमुळे मला समाजसेवेत नवीन दिशा व ऊर्जा मिळाली आहे.’
गुरुदेव श्री श्री रविशंकर यांची प्रत्यक्ष भेट आणि त्यांच्या आशिर्वादाने मनात एक अद्भुत स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली समाजात प्रेम, शांतता आणि आदर्श जीवनमूल्ये रुजवणे ही खरी प्रेरणा आहे. हा अनुभव केवळ व्यक्तिशः भेट नव्हता, तर अंतर्मनाचा एक दिव्य प्रवास होता, ज्याने माझ्या समाजसेवेला नवीन दिशा आणि ऊर्जा दिली आहे. गुरुदेवांच्या कृपेने अशक्यही शक्य होऊ शकते, आणि या भेटीने मला याचा अनुभव थेट अनुभवायला मिळाला.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833






















