Homeताज्या बातम्या. दुःखाच्या प्रसंगी धावली 'रुग्ण हक्क संघर्ष समिती'; मोशीतील मृत महिलेचे संपूर्ण...

. दुःखाच्या प्रसंगी धावली ‘रुग्ण हक्क संघर्ष समिती’; मोशीतील मृत महिलेचे संपूर्ण हॉस्पिटल बिल आणि मेडिकल बिलात सवलत

पुणे/पिंपरी-चिंचवड:
मोशी येथील धनश्री हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मयत झालेल्या प्रतिभा बळीराम बोतकूलवार यांच्या कुटुंबीयांना ‘रुग्ण हक्क संघर्ष समिती’च्या तत्पर मध्यस्थीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. हॉस्पिटल प्रशासनाने मानवी दृष्टिकोन ठेवत संपूर्ण उपचाराचे बिल पूर्णपणे माफ केले, तर मेडिकलच्या बिलातही मोठी सवलत देत सर्वसामान्यांसाठी एक आदर्श उदाहरण समोर ठेवले आहे.
​नेमकी घटना काय?

प्रतिभा बळीराम बोतकूलवार यांचे पहाटेच्या सुमारास निधन झाले होते. मात्र, रुग्णालयाचे मोठे बिल भरले नसल्यामुळे हॉस्पिटल प्रशासनाकडून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जात नव्हता. दुःखात असलेल्या कुटुंबावर यामुळे मोठा मानसिक ताण आला होता.
​समितीची तत्परता आणि यशस्वी मध्यस्थी:
याबाबतची माहिती मिळताच रुग्ण हक्क संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संजय बावळेकर यांना तातडीने फोनवरून संपर्क साधण्यात आला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ हॉस्पिटल गाठले.
​यावेळी त्यांनी मयत प्रतिभा यांच्या मुली संगीताराणी महेश कौलवार आणि मुलगा संजय बळीराम बोतकूलवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली व त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट हॉस्पिटल प्रशासनाची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. समितीच्या प्रयत्नांना यश आले आणि हॉस्पिटलचे एकूण २,११,०५० रुपयांचे बिल पूर्णपणे माफ करण्यात आले. तसेच ५६,६०० रुपयांच्या मेडिकल बिलापैकी फक्त ४०,००० रुपये भरण्यास सांगण्यात येऊन उर्वरित १६,६०० रुपयांची मेडिकल बिलही माफ करण्यात आले.
​नातेवाईकांकडून कृतज्ञता व्यक्त:
कठीण प्रसंगी धावून आलेल्या ‘रुग्ण हक्क संघर्ष समिती’च्या पाठबळामुळे मृतदेह विनासायास व सन्मानपूर्वक ताब्यात मिळाल्याबद्दल बोतकूलवार कुटुंबाने आणि उपस्थित सर्व नातेवाईकांनी रुग्ण हक्क संघर्ष समितीचे मनःपूर्वक आभार मानले.
​मान्यवरांची उपस्थिती व सहभाग:
ही सामाजिक व मानवीय कारवाई यशस्वी करण्यासाठी संस्थापक विजय भाऊ पंडित, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संजय बावळेकर, पुणे शहर उपाध्यक्ष मुन्ना मैड, सचिव किरण बदे, उपशहर प्रमुख अमर जाधव, अमीर शेख, उदय कुलकर्णी, प्रशांत कुमावत, सागर उपासनी, अश्रू खवळे, आणि राजू सुलाखे यांच्यासह समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खेड तालुक्यातील वाडा येथील भांबुर्डेकर ज्वेलर्स दुकानात चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद; १० गुन्हे...

पुणे (ग्रामीण): खेड तालुक्यातील वाडा येथील भांबुर्डेकर ज्वेलर्स दुकानात डल्ला मारणाऱ्या दोन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व खेड पोलीस स्टेशनच्या पथकाने गजाड केले आहे....

औंध नगर आणि विद्यापीठ भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न;

औंध नगर आणि विद्यापीठ भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न; पुणे (शशिकांत पाटोळे) : औंध नगर आणि विद्यापीठ भागातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वार्षिक...

बाणेरमध्ये जबरी चोरी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला पोलिसांकडून जेरबंद; सोन्याचे दागिने व रोकड हस्तगत

पुणे: पुण्यातील बाणेर परिसरात रात्रीच्या सुमारास नागरिकाला अडवून मारहाण करत सोन्याचे दागिने आणि ऑनलाईन पैसे जबरदस्तीने ट्रान्सफर करून लूटमार करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला बाणेर पोलीस...

बोपोडीतील वादग्रस्त ‘अॅनिमल इन्सिनरेटर’ प्रकल्प: नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न आणि तीव्र रोष

पुणे महानगरपालिकेच्या (PMC) मनमानी कारभाराचा आणि नियोजनाचा फटका आता पुन्हा एकदा उपनगरांना बसू लागला आहे. बावधन येथील तीव्र विरोधामुळे रखडलेला मृत प्राण्यांच्या दहनाचा प्रकल्प...

“७ अनाधिकृत होर्डिंग्ज नक्की कोण वाचवत आहे.? तक्रारीनंतरही आकाशचिन्ह विभाग मौन की मूक पाठिंबा?”

पुणे:- पुणे शहरातील शेकडो अनधिकृत होर्डिंग्जचा विषय पुणे महानगरपालिकेसाठी तापदायक ठरत असतानाच, प्रशासनाकडून काही ठराविक प्रकरणांमध्ये कारवाईबाबत जाणीवपूर्वक मौन धारण करण्यात येत असल्याचे गंभीर प्रकार...

error: Content is protected !!