पुणे:
महाराष्ट्र सायबर मुंबई यांचेकडून मनी ट्रेल, म्युअल बँक अकाऊंट तसेच चेक एटीएम विड्रालच्या फसवणुकीच्या तक्रारींची डेटा माहिती प्राप्त झाल्यामुळे, वानवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ११२(२), ६१(२), ३१८(४), ३(५) सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल करून पोलिसांनी ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.
गुन्ह्याची पार्श्वभूमी व पद्धत:
या गुन्ह्यातील आरोपींनी स्वतःच्या नावाचे म्युअल अकाऊंट (बनावट खाते) केवायसी कागदपत्रांच्या आधारे सुरू केले. या खात्यांवर एकूण ६,०९,७३०/- रुपयांचे आर्थिक व्यवहार करून भारतभरातील एकूण १९ नागरिकांची मिळून तब्बल १,८०,१५,७९५/- रुपयांची (एक कोटी ऐंशी लाख पंधरा हजार सातशे पंचानव रुपये) आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे.
तपासादरम्यान समोर आले की, या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार श्रवण राजेंद्र अंकुशे हा आपल्या हस्तक हरिओम हरीराम साहू यास नागरिकांची फसवणूक करण्यासाठी अनेक खातेधारकांची खाती ट्रान्झॅक्शनसाठी गोळा करण्यास सांगत होता. त्यापोटी सूत्रधार श्रवण हा प्रत्येक खातेमागे हस्तकास ३,०००/- रुपये कमिशन देत असे, तसेच प्रत्येक खातेधारकाला ५,०००/- रुपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार हरिओम साहू याने त्याच्या संपर्कातील सौद इदफान शेख, साहील रौफ शेख, तालीब नुरमोहम्मद शेख, उबेद शेख व इतर लोकांना हेरले. त्यांना बँकेत स्वतःच्या नावे खाते उघडून ते वापरण्यास दिल्यास ५,०००/- मोबदला देण्याचे आमिष दाखवून विविध ठिकाणी बँक खाती सुरू करायला लावली. ही सर्व खाती टोळीचा मुख्य सूत्रधार श्रवण अंकुशे याला ऑनलाइन फ्रॉड करण्यासाठी वापरण्याकरिता देण्यात आली होती.
आज अखेरपर्यंत भारतभरातील १९ नागरिकांची १,८०,१५,७९५/- रुपयांची रक्कम या बनावट बँक खात्यांवर जमा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी सर्व आरोपींचा सहभाग निश्चित करून त्यांना दिनांक २८/०८/२०२६ रोजी रात्री २२:३० वाजता अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे व पत्ते:
१. श्रवण राजेंद्र अंकुशे (वय २५ वर्षे, रा. देवाची उंड्री, धनगर वस्ती, पुणे) – मुख्य सूत्रधार
२. श्री. हरीओम हरीराम साहू (वय २४ वर्षे, रा. सिध्दार्थनगर लेन नं. १२, रुम नं. १०८, साळुंके विहार एमआयबीएम रोड, पुणे)
३. सौद इदफान शेख (वय २३ वर्षे, रा. सर्व्हे नं. १४, जय जवाननगर, डेक्कन कॉलेज रोड, अप्पो-डॉ. शाह क्लिनीक, चांदणी चौक, येरवडा, पुणे)
४. साहील रौफ शेख (वय २५ वर्षे, रा. जय जवाननगर, बंजारा चौक, येरवडा, पुणे)
५. तालीब नुरमोहम्मद शेख (वय २५ वर्षे, रा. डी. एस. पार्क, फ्लॅट १६ सी, मोहनवाडी, येरवडा, पुणे) (टीप: याशिवाय तपासात उबेद शेख या अन्य व्यक्तीचे नाव देखील निष्पन्न झाले आहे.)
पोलिसांची यशस्वी कामगिरी:
सदर धडक कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील आणि मा. पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-५, पुणे शहर श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली; मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग श्री. रामदास इंगवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. पंडीत रेजितवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कैलास डाबेराव यांच्या नेतृत्वात तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शेखर मोकाटे, समाधान उगले, आणि पोलीस अंमलदार गणेश आगम, अमोल पिलाणे, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, दया शेगर, आशिष कांबळे, दिपक क्षीरसागर, विठ्ठल चोरमले, बालाजी वाघमारे, अभि चव्हाण, गोपाळ मदने, विष्णू सुतार तसेच महिला पोलीस अंमलदार चैत्राली यादव व रुपाली दिवटे यांनी पार पाडली आहे.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























