पुणे ग्रामीण पोलीस दलाची धडक कारवाई; विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ८ पथकांद्वारे कसून तपास
पुणे (दि. ०५ ऑक्टोबर २०२६): पुणे ग्रामीण पोलीस दल अंतर्गत सुपा पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या एका अत्यंत गंभीर चोरी व दुहेरी हत्या प्रकरणाचा पुणे ग्रामीण पोलिसांनी यशस्वी उलगडा केला आहे. या गुन्ह्यात फिर्यादीच्या अंगावरील सोन्याचे दागिने बळजोरीने लुटून दोन वृद्ध महिलांची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या करणाऱ्या मुख्य आरोपीस जेदण्यात पोलिसांना यश आले आहे.
गुन्ह्याची पार्श्वभूमी व फिर्याद
सुपा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २१२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या (भा.न्या.सं.) कलम १०३(१), ३०९(४), ३३२(क) प्रमाणे दिनांक २९/०९/२०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील फिर्यादी गणेश मारूती लडकत (वय ४५ वर्षे, व्यवसाय: नोकरी, मूळ रा. शेरेची वाडी, ता. बारामती, जि. पुणे, सध्या रा. रम्यनगरी अपार्टमेंट, सातव चौक, तांदुळवाडी रोड, बारामती, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या राहत्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून कपाटातील सामानाची उचकापाचक केली. त्यानंतर घरासमोर ओट्यावर झोपलेल्या फिर्यादीच्या आई इंदुमती मारूती लडकत (वय ७५ वर्षे) आणि चुलत वहिणी कृष्णाबाई कुंडलीक लडकत (वय ५५ वर्षे, दोन्ही रा. शेरेचीवाडी, ता. बारामती, जि. पुणे) यांच्या अंगावरील एकूण ६,००,०००/- रुपये किमतीचे ५ तोळे सोन्याचे दागिने बळजोरीने काढून घेण्यात आले. तसेच धारदार हत्याराने त्यांच्या मानेवर व गळ्यावर गंभीर वार करून त्यांचा खून करण्यात आला.
उच्चस्तरीय मार्गदर्शनाखाली तपास पथकांची स्थापना
गुन्हा अत्यंत संवेदनशील आणि गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर श्री. रंजनकुमार शर्मा साहेब आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंग गिल्ल साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखा, सुपा पोलीस स्टेशन, दौंड पोलीस स्टेशन, बारामती शहर पोलीस स्टेशन व बारामती तालुका पोलीस स्टेशन यांना गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याच्या कडक सूचना दिल्या.
या निर्देशानुसार पोलीस अधिकारी व अंमलदार यांची एकूण ०८ पथके तयार करण्यात आली. या पथकांनी घटनास्थळाच्या आसपासचा परिसर व पंचक्रोशीतील संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासले. अशाच प्रकारचे गुन्हे करणाऱ्या सराईत आरोपींचा शोध घेण्यासाठी पथकांनी अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, बीड, कोल्हापूर आणि निपानी (कर्नाटक) येथे प्रत्यक्ष जाऊन २०० हून अधिक रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी केली. तसेच स्थानिक भागातील रेकॉर्डवरील गुन्हेगार, शेरेवाडी गावातील नागरिक आणि फिर्यादीच्या घराशेजारी राहणाऱ्या लोकांच्या हालचालींवर कसून नजर ठेवण्यात आली.
आरोपी निष्पन्न व गुन्ह्याची कबुली
तपास पथक कसून शोध घेत असताना शेरेवाडी गावातील एका इसमाची हालचाल संशयास्पद आढळून आली. पथकाने विकास उर्फ अप्पा राजेंद्र लडकत (वय २५ वर्षे, रा. शेरेवाडी, ता. बारामती, जि. पुणे) यास ताबात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली असता तो गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले. पोलिसांमार्फत अधिकची चौकशी करून त्याला विश्वासात घेतले असता, त्यानेच सोन्याचे दागिने चोरी करून आमच्या भावकीतील दोन्ही महिलांवर कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची कबुली दिली. आरोपीकडून चोरी केलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून, सुपा पोलीस स्टेशनमार्फत पुढील तपास सुरू आहे.
मार्गदर्शन करणारे वरिष्ठ अधिकारी
सदरची यशस्वी कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. रंजनकुमार शर्मा (कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर), पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंग गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक (बारामती विभाग) श्री. गणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि बारामती उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तपास पथकातील प्रमुख अधिकारी
गुन्ह्याचा तपास खालील अधिकाऱ्यांच्या पथकाने केला:
श्री. प्रमोद क्षीरसागर (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा)
श्री. शैलेश चिवडशेट्टी (पोलीस निरीक्षक, बारामती शहर पोलीस स्टेशन)
श्री. शशिकांत शेळके (सहायक पोलीस निरीक्षक, सुपा पोलीस स्टेशन — तपास अधिकारी)
महादेव शेलार (सपोनि, स्थानिक गुन्हे शाखा)
सुधिर वाळुंज, युवराज धोंडे, ज्ञानेश्वर राऊत, बाळासाहेब कारंडे (पोसई, स्थानिक गुन्हे शाखा)
शिवाजी मुंढे, उदय पवार (पोसई, सुपा पोलीस स्टेशन)
कदम (पोसई, दौंड पोलीस स्टेशन)
सहभागी पोलीस अंमलदार पथक
स्थानिक गुन्हे शाखा अंमलदार: शिवाजी निकम, सचिन घाडगे, असिप शेख, दिपक साबळे, संतोष तोडकर, राजु मोमीन, किशोर तेलंग, शैलेश स्वामी, गुलाब पाटील, पोपट नाळे, अजय घुले, योगेश नागरगोजे, स्वप्निल अहिवळे, निलेश शिंदे, गुरुनाथ गायकवाड, सुभाष राऊत, विकास कापरे, अक्षय यादव, विशाल भोराडे, महेश खारात, संतोष भापकर, अमोल शेडगे, सुलतान डांगे, रहिस मुलाणी, गणेश डेरे, तुषार चव्हाण, संदिप वारे, अक्षय नवले, अभिमन्यु मोटे, अतुल डेरे, चेतन पाटील, भारत मोहोळ.
सुपा पोलीस स्टेशन अंमलदार: महेंद्र गायकवाड, रुपेश साळुंखे, राहुल भाग्यवंत, संदीप लोंढे, विशाल गजरे, संतोष जावीर, तुषार जैनक, किसन ताडगे, महादेव साळुंखे, सचिन दरेकर, निहाल वनवे, भाउसाहेब चौधरी, आदेश मावळ, योगेश सरोदे, पियुष माळी, रुषिकेश वीर, अश्विनी चांदगुडे, प्रणाली भोसले.
बारामती शहर पोलीस स्टेशन अंमलदार: पोहवा/क्षीरसागर, पोहवा/झणझणे, पोहवा/काझी.
बारामती तालुका पोलीस स्टेशन अंमलदार: सुरेंद्र वाघ, मनोज पवार, अवधूत शिंदे.
दौंड पोलीस स्टेशन अंमलदार: पोहवा/बोराडे, पोहवा/गाढवे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास सुपा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. शशिकांत शेळके करत आहेत.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























